Home | Divya Marathi Special | different profession and woman showed great work

10 नवी पावले: या महिलांनी संघर्ष करत वेगळ्या पेशात करून दाखवले उत्तम काम

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Mar 08, 2018, 09:04 AM IST

पतीच्या मृत्यूनंतर तीन मुलांचा सांभाळ करणे कठीण झाले तेव्हा मंजूने पतीचाच पेशा स्वीकारला. ३४ वर्षीय मंजू गेल्या पाच वर्ष

 • different profession and woman showed great work

  1) मंजू यादव, हमाल
  पतीच्या मृत्यूनंतर तीन मुलांचा सांभाळ करणे कठीण झाले तेव्हा मंजूने पतीचाच पेशा स्वीकारला. ३४ वर्षीय मंजू गेल्या पाच वर्षांपासून हे काम करत आहेत.

  पुढील स्‍लाइडर वाचा, इतर 9 महिलांच्‍या संघर्षकथा...

 • different profession and woman showed great work

  अवनी चतुर्वेदी, लढाऊ वैमानिक

  एकटीने लढाऊ विमान उडवणारी देशातील पहिली महिला. म. प्र. च्या  रिवा येथील २४ वर्षीय अवनीने हा विक्रम यंदा २४ फेब्रुवारीला केला. त्या २०१६ मध्ये लढाऊ तुकडीत आल्या.

 • different profession and woman showed great work

  के.सी. रेखा, परवानाधारी मासेमार

  ४५ वर्षीय रेखा यांनी १० वर्षांपूर्वी हे काम आपल्या चार मुलांचा सांभाळ करण्याच्या दृष्टीने पतीला मदत करण्यासाठी केले होते. परवाना असलेल्या त्या देशातील पहिल्या महिला मासेमार आहेत.

 • different profession and woman showed great work

  अलीशा अब्दुल्ला, रेसिंग ड्रा‌यव्हर

  चेन्नईच्या २८ वर्षीय अलीशाने १४ व्या वर्षी नॅशनल कार रेसिंगमध्ये पाचवे स्थान पटकावले होते. १९ व्या वर्षी बाइक रेसिंगमध्ये तिसरे स्थान मिळवले होते.

 • different profession and woman showed great work

  ममता देवी, बॉडीबिल्डर

  मणिपूरची ३५ वर्षीय ममता बॉडीबिल्डिंग स्पर्धांत भाग घेणारी देशाची पहिली महिला. वर्ल्ड बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप-२०१२ मध्ये कांस्यपदक मिळवले आहे.

 • different profession and woman showed great work

  जमीता, इमाम

  २६ जानेवारीला केरळमध्ये ३४ वर्षीय जमीतांनी शुक्रवारच्या नमाजमध्ये इमामाची भूमिका बजावली. वंदूरमध्ये कुराण सुन्नत सोसायटीच्या सरचिटणीस.

 • different profession and woman showed great work

  सीमा राव, कमांडो प्रशिक्षक

  मिलिटरी मार्शल अार्ट्समध्ये सेव्हन्थ डिग्री ब्लॅक बेल्टधारक सीमा देशातील एकमेव महिला कमांडो प्रशिक्षक. ४८ वर्षीय सीमा २० वर्षांपासून विनाशुल्क प्रशिक्षण देतात.

 • different profession and woman showed great work

  सुरेखा यादव, लोको पायलट

  सुरेखा यादव १९८८ मध्ये रेल्वेत भरती झाल्या होत्या. १९८९ मध्ये त्या  सहायक चालक झाल्या आणि २०१० मध्ये पॅसेंजर रेल्वेच्या चालक झाल्या.५२ वर्षीय सुरेखा कल्याणमध्ये  रेल्वेच्या चालकांना प्रशिक्षण देतात.

 • different profession and woman showed great work

  टेसी थॉमस, मिसाइल डेव्हलपर

  भारतीय क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या प्रमुख झालेली पहिली महिला. अग्नी-४ व अग्नी-५ च्या विकासात केरळच्या ५५ वर्षीय टेसी यांचे महत्त्वाचे योगदान होते.

 • different profession and woman showed great work

Trending