Home | Divya Marathi Special | First Indian Film and Literary Convention

महाराष्ट्र दिन विशेष : पहिला भारतीय चित्रपट व साहित्य संमेलन

दिव्य मराठी | Update - May 01, 2018, 06:53 AM IST

चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांनी नाशिकमध्ये १९१२ मध्ये ‘राजा हरिश्चंद्र' हा पहिला भारतीय सिनेमा तयार केला. महाराष्ट्र

 • First Indian Film and Literary Convention

  १९१२ राजा हरिश्चंद्र... फाळकेंची निर्मिती

  चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांनी नाशिकमध्ये १९१२ मध्ये ‘राजा हरिश्चंद्र' हा पहिला भारतीय सिनेमा तयार केला. महाराष्ट्र फिल्म कंपनी या देशातील पहिल्या चित्रपट निर्मिती कंपनीने १९२३ मध्ये ‘सिंहगड' आणि १९२५ मध्ये 'सावकारी पाश' या चित्रपटांची निर्मिती केली. तेव्हापासून भारतीय सिनेमाचे केंद्रबिंदू बनलेली मुंबई भारतीय चित्रपटसृष्टीचे केंद्र बनली.

  १९६५ पासून वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे यांच्या मराठीतील साहित्यकृती साहित्यातील प्रतिष्ठेच्या ज्ञानपीठ पुरास्कराच्या मानकरी ठरल्या.

  साहित्य संमेलनांचे रोपटे इथेच रुजले, आता शंभरीकडे वाटचाल

  मराठी साहित्य आणि साहित्यिक यांना एकत्र आणलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची परंपरा न्यायमूर्ती रानडे यांनी १८७८ पासून सुरू केली. तेव्हापासून सुरू झालेली ही परंपरा यंदाच्या वर्षी ९१ वे साहित्य संमेलन घेण्यापर्यंत पोहोचली. त्याचप्रमाणे १९०५ पासून आजतागायत महाराष्ट्राच्या पुढाकाराने ९७ अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलने झाली.

  कब्बडी : देशी खेळाला आंतरराष्ट्रीय दर्जा

  सध्या प्रो-कबड्डी म्हणून प्रसिद्ध झालेल्या देशी खेळास आधुनिक रूप देण्यात महाराष्ट्राचा महत्त्वाचा वाटा आहे. १९३१ मध्ये अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण परिषदेच्या अकोला येथे भरलेल्या चौथ्या अधिवेशनात भारतीय देशी खेळांचे नियम ठरवण्यासाठीची समिती नेमण्यात आली. १९३८ मध्ये अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण परिषदेच्या चौथ्या अधिवेशनात भारतीय ऑलिंपिक संघटनेने कबड्डीचा समावेश राष्ट्रीय खेळांमध्ये केला. १९८२ मध्ये अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण परिषदेच्या अकोला येथील चौथ्या अधिवेशनात एशियन कबड्डी असोसिएशन स्थापन होऊन एशियाडमध्ये कबड्डी पोहोचली.

 • First Indian Film and Literary Convention

Trending