Home | Divya Marathi Special | Hazardous chemicals in sanitary napkins; Using a cotton cloth padded is good

सॅनिटरी नॅपकीनमध्ये घातक केमिकल्स; सुती कापडाचे घरगुती पॅड वापरणेच बरे

अश्विनी तडवळकर | Update - Dec 22, 2017, 10:55 AM IST

बदलत्या काळाची गरज म्हणून महिलांनी बाजारातील रेडिमेड सॅनिटरी नॅपकीन वापरण्यास सुरुवात केली.

 • Hazardous chemicals in sanitary napkins; Using a cotton cloth padded is good

  सोलापूर- बदलत्या काळाची गरज म्हणून महिलांनी बाजारातील रेडिमेड सॅनिटरी नॅपकीन वापरण्यास सुरुवात केली. यामागे कंपन्यांकडून करण्यात येणाऱ्या जाहिरातींचा भडीमारही होताच. परंतु, या नॅपकिनचा अतिवापर केल्याने महिलांच्या आरोग्यावर काही अंशी का असेना विपरीत परिणाम होत असल्याचे पुढे येत आहे. आग आग होणे, पुरळ येणे, ओटीपोटात अधिक दुखणे, खाज येणे असे अनेक प्रकार या नॅपकीनच्या अतिवापरामुळे होतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विविध प्रकारचे इन्फेक्शनचे मूळकारण या नॅपकिनचा अतिवापर हे आहे.

  देशातील ‘वुमेन्स व्हाईसेस फॉर अर्थ’ ही संस्था या संवेदनशील प्रकल्पावर काम करत आहे. त्यांच्या सर्वेक्षणानुसार केमिकलयुक्त, ब्लिचिंगयुक्त पॅडस घातक असल्याची माहिती पुढे येत आहे. महिलांच्या मासिक पाळीच्या काळात वापरले जाणारे पॅडस हे उत्तम दर्जाचे आहेत, असे वारंवार जाहिरातींच्या माध्यमातून बिंबविणाऱ्या कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा असते. या स्पर्धेच्या नादात नॅपकीनच्या प्रकारात केले जाणारे नवनवीन बदल हे विविध केमिकल, ब्लिचिंग, प्लास्टिक आणि विविध प्रकारचे थर यामुळे तयार करत आहेत. परंतु, त्याचा नकळत परिणाम हा महिलांच्या आरोग्यावर होतो आहे.

  पुरळ येणे, जळजळ होणे, दुर्गंधी येणे, नाजूक त्वचा लाल होणे आदी प्रकार घडत आहेत. त्यामुळे महिलांनी याचा वापर आवश्यक असेल तेव्हाच किंवा गरजेनुसारच करावा. घरी तयार केलेल्या सुती कापडाच्या नॅपकीत तयार करून वापराव्यात, असेही अनेक स्त्रीरोग तज्ज्ञांचे मत आहे.
  ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने गेल्या महिन्यात ‘त्या’ चार दिवसांसाठी हरितक्रांती अशी एक जागृती मोहीम आयोजित केली होती. त्या कार्य्रकमात मासिक पाळी त्यासंदर्भात सध्या महाराष्ट्रात विकल्या जाणाऱ्या विविध सॅनिटरी नॅपकीनच्या तयार होण्याची प्रक्रिया, त्यांच्यात असलेली घातक रसायने या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या मुद्द्यावर काम करणाऱ्या राजसी कुलकर्णी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यांनी सॅनिटरी नॅपकीनच्या अतिवापराचे परिणाम सांगितले. नोकरी करणाऱ्या महिलांनी याचा तासंतास आणि सातत्याने वापर करू नये, असा सल्ला दिला. त्यांच्या मते प्रादुर्भावाचे प्रमाण अधिक होऊ शकते.

  सॅनिटरी नॅपकीन वापर करताना त्याची स्वच्छतेच्या दृष्टीने काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. रात्रीच्या वेळी एकदा झोपण्यापूर्वी घेतलेले नॅपकीन हे पुन्हा रात्रीतून बदलणे गरजेचे आहे. त्यात काटकसर अथवा आळस करून चालत नसते. त्यामुळेदेखील परिणाम होण्याची शक्यता असते. रात्री शक्यतो हलक्या रंगाच्या डाय जास्त नसलेल्या स्वच्छ कापडाचा वापर करावा. त्याने त्वचेच्या कोणत्याही समस्या आणि परिणाम होत नाहीत. तीन तासांचा काळ पुरेसा असतो. या चार - पाच दिवसांत दर तीन तासांनंतर नॅपकीन बदलणे योग्य आहे. बहुधा तसे होताना दिसत नाही. जाहिरातींचा परिणाम आणि महिलांच्या व्यस्ततेचा भाग यात कारण ठरतो. त्यामुळे वेळेवर नॅपकीन बदलणे शक्य नसल्याने त्याचा थेट परिणाम हा अंतर्गत त्वचेवर होतो.

  ब्लिचिंगमुळे होतो त्रास
  कोणत्याही गोष्टीत असलेल्या ब्लिचिंग या घटकाचा त्रास मानवी शरीराला होतोच. ब्लिचिंग संदर्भातल्या गोष्टींचा जास्त प्रमाणावर वापर झाला की त्याचा त्वचेवर परिणाम हा होतोच.
  - डॉ. तृप्ती खटावकर, त्वचारोग तज्ज्ञ

  बाजारातील नॅपकीन त्रासदायक
  महिलांच्या त्या चार दिवसात कोणत्याही बाहेरच्या नॅपकीनचा वापर करण्यापेक्षा घरच्या सुती कपड्यांपासून नॅपकीन तयार करून ते वापरावेत. त्याने कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. मात्र बाजारमेड नॅपकीनने संसर्गजन्य रोग, त्वचेचे विकार आणि विविध प्रकारचे त्रास होतातच.
  - डॉ. गौरी कहाते, स्त्रीरोग तज्ज्ञ

  अतिवापर टाळा
  सुरक्षित वापर केल्यास याचा त्रास होणार नाही, मात्र यातील घटक हे काही अंशी आरोग्यावर परिणाम करतात. याचा अतिवापर टाळा. कारण केमिकलचे घटक शरीरावर परिणाम करतच असतात. त्या बदल्यात सुती कापड किंवा कॉटनच्या कप्सचा वापर करा.
  - डॉ. बाहुबली दोशी, स्त्रीरोग प्रसूतीतज्ञ

  वापरूच नका
  विविध संशोधने या सॅनिटरी नॅपकीनच्या संदर्भात सुरू आहेत. सध्या वुमेन्स व्हॉईसेस फॉर अर्थ या संस्थेच्या वतीने मासिक पाळी त्या संदर्भात असलेल्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात येत आहे. त्यानुसार या नॅपकीनमध्ये काही घातक घटक आहेत, जे आरोग्यावर परिणाम करतात. त्यामुळे हे नॅपकीन वापरण्यापेक्षा पर्यायी गोष्टींचा वापर करा.
  - राजसी कुलकर्णी, मासिक पाळीविषयक समुपदेशक संशोधिका

  पुढील स्‍लाइडवर वाचा, असे तयार होते नॅपकिन...नामवंत अभिनेत्रींचाही यल्‍गार...


 • Hazardous chemicals in sanitary napkins; Using a cotton cloth padded is good

  असे तयार होते नॅपकिन
  सर्वप्रथम साधा थर घेतला जातो. त्यात पातळ द्रव शोषुन घेण्यासाठी लाकडाचा भुस्सा आणि ते सगळे कापड पांढरे होण्यासाठी ब्लिंचिंग ग्लुच्या स्वरूपात असलेला चिकट पदार्थ असणारे केमिकल टाकले जाते. हे सारे काही एकत्र घेऊन मशीनने दाब दिला जातो. त्यावर नाजुक कापडासमान वाटणारे प्लास्टीकचे थर लावुन फिनिशिंग केले जाते. स्त्राव शोषुन घेण्यासाठी टाकले जाणारे केमिकल ब्लिचिंग याने जास्त समस्या उद्भवतात.

   

   

 • Hazardous chemicals in sanitary napkins; Using a cotton cloth padded is good

  अनेक नामवंत अभिनेत्रींचाही यल्गार
  देशात आणि परदेशात विविध प्रकारच्या संस्था याबाबत काम करत आहेत. संशोधनही सुरू आहे. मात्र, सामान्य महिलांना याची कल्पना नसते. सेलिब्रेटी म्हणून चंदेरी दुनियेत काम करणाऱ्या दिया मिर्झा, कंगना रनोट या दोन अभिनेत्रींनी चक्क जाहीर केले की, ‘मी सॅनिटरी नॅपकीनचा वापर करत नाही. कारण ते घातक आहेे.’ त्यामुळे बऱ्याच अंशी याची चर्चाही झाली. त्यावर पर्याय आहेत. त्याचा शोध घ्यावा. त्याचा वापर करा, असेही या दोघींनी महिलांना सांगितले आहे.

 • Hazardous chemicals in sanitary napkins; Using a cotton cloth padded is good

Trending