Home | Divya Marathi Special | iconic photos of woman empowerment

देश-जगभराच्या इतिहासात नारीशक्तीची रूपे दाखवणारी ही तीन छायाचित्रे

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Mar 08, 2018, 09:04 AM IST

सुमारे दहा वर्षांपूर्वीच्या या अांदाेलनातील हे छायाचित्र महिलांचे धाडस व दृढनिश्चयाचे प्रतिनिधित्व करणारे.

 • iconic photos of woman empowerment

  जेव्‍हा विषय हक्‍काचा होता...

  सुमारे दहा वर्षांपूर्वीच्या या अांदाेलनातील हे छायाचित्र महिलांचे धाडस व दृढनिश्चयाचे प्रतिनिधित्व करणारे. या अांदाेलनाच्या केंद्रस्थानी हाेती दिल्लीच्या वैद्यकीय महाविद्यालयाची २१ वर्षीय अर्पिता मजुमदार. या अांदाेलनाचा एक हिस्सा बनून ती रस्त्यावर उतरली हाेती. मात्र, तीच अांदाेलनाचा चेहरा बनून लक्षात राहिली.

  पुढील स्‍लाइडवर वाचा, जेव्हा विषय देशाचा हाेता...

 • iconic photos of woman empowerment

  जेव्हा विषय देशाचा हाेता

  या मुलीच्या साक्षीमुळे २६/११ च्या हल्ल्याचा अाराेपी कसाब याला काेर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. कसाबने तेव्हा या ९ वर्षीय देविकावर गाेळी झाडली हाेती, त्यामुळे तिच्या पायावर शस्त्रक्रिया केली हाेती. साक्ष द्यायला न्यायालयात जाताना ती छायाचित्रात दिसत अाहे. अाता १८ वर्षांच्या देविकाला पाेलिस अधिकारी व्हायचंय.

 • iconic photos of woman empowerment

  जेव्हा विषय भावनेचा हाेता

  २२ मार्च २०१६ राेजी ब्रुसेल्स विमानतळावर अतिरेकी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुंबईच्या निधी चाफेकरचे हे छायाचित्र तेव्हा जगभरात प्रसिद्ध झाले. गंभीर जखमी झालेली निधी पुन्हा चालू शकणार नाही, असे डाॅक्टरांनी सांगितले हाेते. मात्र, अाज ती सर्वसामान्यांप्रमाणे जगतेय. तिचा अात्मविश्वास कायम अाहे.

Trending