Home | Divya Marathi Special | In the country, the licenses of TV and mobile after their arrival: Venugopal Dhoot

देशात टीव्ही आणि मोबाइलचे युग आल्यानंतर त्यांचे घेतले परवाने: चर्चेत- वेणुगोपाल धूत

दिव्‍य मराठी | Update - Apr 07, 2018, 07:25 AM IST

आयसीआयसीआयच्या प्रकरणात वेणुगोपाल यांचे म्हणणे आहे की त्यांचे चंदा कोचर किंवा त्यांचे पती दीपक कोचर यांच्याशी काही देणे-

 • In the country, the licenses of TV and mobile after their arrival: Venugopal Dhoot

  आयसीआयसीआयच्या प्रकरणात वेणुगोपाल यांचे म्हणणे आहे की त्यांचे चंदा कोचर किंवा त्यांचे पती दीपक कोचर यांच्याशी काही देणे-घेणे नाही. मात्र, दीपक यांचे भाऊ राजीव यांना ओळखतो. राजीव त्यांचे मित्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव शरद उपासनींचे जावई आहेत. राजीव एव्हिस्टा अॅडव्हायझरी नावाने एक फर्मही चालवतात, जी व्हिडिओकॉन समूहाच्या सर्व कंपन्यांचे काम पाहते.


  वेणुगोपाल यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील नंदलाल अहमदनगरमध्ये कुटुंबाच्या उसाच्या शेतीचे काम पाहत होते. पुण्यात शिक्षण झाले होते. त्यांनी हिंमत करून १९५५ मध्ये गंगापूर साखर कारखाना (शुगर मिल) सुरू केला. तेव्हा वेणुगोपाल फक्त चार वर्षांचे होते. तेव्हा त्यांच्या वडिलांनी युरोपातून यंत्रे आयात केली होती. एका लहान गावात असा उद्योग हे साहसाचेच काम होते. नंतर ते मराठवाडा भागात औद्योगिक क्रांती आणण्यासाठी काम करू लागले. वेणुगोपाल यांचे बालपण असा उद्योग पाहूनच व्यतीत झाले. १९८० च्या दशकात त्यांनी तिन्ही मुलांना उद्योगात आणले, पण वेणुगोपाल यांना काही वेगळे करण्याची इच्छा होती. व्यवसायात काळासोबत नाडी पकडण्यात वेणुगोपाल वडिलांप्रमाणेच तरबेज आहेत.


  एशियाडनंतर देशात टीव्हीचा काळ सुरू झाला. वेणुगोपाल यांना उद्योगाची नाडी समजते. अनेक मोठी घराणी टीव्ही कारखाने परवान्याच्या रांगेत होती. तेव्हा लायसन्स राजचा काळ होता. त्यांना टीव्ही बनवण्याचा परवाना मिळाला. धाकटा भाऊ एमबीए करत होता. वेणुगोपाल यांनी त्यांना टीव्हीचा कारखाना सांभाळण्यास सांगितले. १० जानेवारी २००८ ची गोष्ट. दुपारची साडेतीनची वेळ. दिल्लीच्या संचार भवनात दूरसंचार परवाने मिळवणारे काही व्यावसायिक जमा झाले होते, बाहेर माध्यमांची गर्दी होती. उद्योगपतींमध्ये वेणुगोपाल आणि त्यांचे भाऊ, शिवसेना खासदार राजकुमार हेही होते. तेव्हा आठ परवाने देण्यात आले होते, त्यात एक परवाना यांनाही मिळाला होता. मुलगा अनिरुद्ध त्यांच्यासोबतच काम करतो. मुलगी सुरभीचे लग्न झाले आहे.

  जन्म : १९५१
  वडील : नंदलाल माधवलाल धूत
  दोन भाऊ : राजकुमार आणि प्रदीप
  शिक्षण : कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे
  कुटुंबीय : पत्नी : रमा (गृहिणी), मुले : अनिरुद्ध, सुरभी.
  चर्चेत का? : आयसीआयसीआयच्या प्रकरणात त्यांचेही नाव आले आहे.

Trending