आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

10 व्या दिवशी गमावले पोटचे बाळ, निर्धार करून बनल्या देशातील पहिल्या महिला डॉक्टर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या दिवशीच (31 मार्च) भारताच्या पहिल्या महिला डॉक्टरपदाचा मान आनंदीबाई गोपाळ जोशी यांचा जन्म झाला होता. महाराष्ट्रातील रूढीवादी ब्राह्मण कुटुंबात आनंदीबाईचा जन्म झाला. बालपणाचे त्यांचे नाव यमुना असे होते. यमुनाचे पालनपोषण तत्कालीन रितीपरंपरेनुसार झाले. त्या काळात मुलींना जास्त शिकवण्याची प्रथा नव्हती. बंदिस्त चार भिंतींच्या आत मुलींचे जग होते.

 

वयाच्या नवव्या वर्षीच यमुनाचे लग्न तिच्यापेक्षा 20 वर्षांनी वयाने मोठ्या असलेल्या गोपाळ जोशी यांच्याशी लावण्यात आले. लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्नीचे जुने यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले. त्यावेळी गोपाळराव महाराष्ट्रातील कल्याण गावातील एका हॉस्पिटलमध्ये क्लर्क पदावर काम करत होते. वयाच्या 14 व्या वर्षीच यमुना एका मुलाची आई झाली. पण दुर्दैवाने योग्य उपचार न मिळाल्यामुळे तो केवळ 10 दिवसच जगू शकला. एका आईच्या आयुष्यात यापेक्षा मोठे दुःख असूच शकत नाही. यमुनाच्या बालमनावर या घटनेचा खूप प्रभाव पडला. तिने विचार केला की, जर मी डॉक्टर असते तर आज हा दुःखाचा प्रसंग माझ्यावर ओढवला नसता. हीच त्यांची डॉक्टर बनण्याची प्रेरणा होती. 


पुढे जाणून घ्या, यानंतर यमुनेची डॉक्टर होण्याची जिद्द कशी पूर्ण झाली....


 

0