Home | Divya Marathi Special | Now the silicon valley is distracted by the use of technology

आता तंत्रज्ञानाच्या व्यसनाला दूर सारण्यात सिलिकॉन व्हॅली व्यग्र

हॅली स्वीटलँड एडवर्ड्स | Update - Apr 15, 2018, 02:17 AM IST

दररोज प्रत्येक १९ व्या मिनिटातून सरासरी ४७ वेळा अमेरिकी नागरिक फोन तपासतात. स्मार्टफोनच्या स्क्रीनला स्पर्श करणे अंगवळणी

 • Now the silicon valley is distracted by the use of technology

  दररोज प्रत्येक १९ व्या मिनिटातून सरासरी ४७ वेळा अमेरिकी नागरिक फोन तपासतात. स्मार्टफोनच्या स्क्रीनला स्पर्श करणे अंगवळणीच पडले आहे. दररोज सरासरी ५ तास यासाठी वेळ दिला जातो. ही सवय सोडवण्यासाठी सिलिकॉन व्हॅलीत काम सुरू आहे. कारण लहान मुले, किशोरवयीन व प्रौढ मानसिक आजारांना बळी पडत आहेत. हे व्यसनच झाले आहे.


  अमेरिकी सायकॉलॉजिकल असोसिएशनने दावा केला आहे की, हे व्यसन सोडले तर मानसिक आरोग्य सुधारते. टेक्सास विद्यापीठात गेल्या वर्षी झालेल्या एका अध्ययनात ही बाब सिद्ध झाली. स्मार्टफोनला केवळ समोर ठेवल्याने व्यक्तीच्या एकाग्रतेत गडबड होते. व्यक्ती मूलभूत मुद्द्यांपासून परावृत्त होते. न्यूयॉर्क विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ अॅडम अल्टर यांनी सांगितले की, वर्तमान स्थितीत तंत्रज्ञानाचे व्यसन महामारीसारखे झाले आहे.


  टीकाकार या मतांशी सहमत आहेत. एखाद्या अॅपला आपण अनेक तास चिकटून असल्यास याचा अर्थ अॅप निर्मात्याला आपण वैयक्तिक माहिती पुरवतो. ते आपले लक्ष वेधून घेतात. त्यामुळे आपण गुगल आणि फेसबुकचे ग्राहक नाहीत. आपण त्यांच्यासाठी उत्पादन झालो आहोत. आपली विक्री त्यांच्या हाताने होत आहे.


  संशोधनासाठी सध्या अगदी नवे क्षेत्र खुले झाले आहे; ते म्हणजे ‘परस्यूएसिव्ह टेक्नॉलॉजी’ होय. यात संगणक व्यक्तीचे विचार आणि कामे कशी नियंत्रित करतो हे सिद्ध होते. न्यूरोसायन्स व बिव्हेरियल सायकॉलॉजीसाठीदेखील हा गहन विषय आहे. हजारो अॅप, इंटरफेस व डिव्हाइस अनेक लोकांना सतत स्क्रॉलिंग करण्यास भाग पाडतात. याला दुसरी बाजूही आहे. अनेक लोक यापासून दूर राहण्यासाठी पराकाष्ठा करतात.


  संगणक मानवी वर्तनाला नियंत्रित करत आहे. सर्वात पहिले यावर स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे प्रोफेसर बीजी फॉग यांनी प्रकाश टाकला. २० वर्षांपूर्वी मी दावा केला असता की, आपण अशा मशीन निर्माण करत आहोत, ज्या माणसाला नियंत्रित करणार आहेत तर कोणाचाही विश्वास बसला नसता असे फॉग म्हणतात. आज आपण ‘परस्यूवेसिव्ह टेक्नॉलॉजी’मध्ये जगत आहोत.


  प्रत्येक ग्राहक तंत्रज्ञान कंपनी असलेल्या अॅमेझॉनसारख्या कंपन्यांच्या माध्यमातून काम करत आहेत. फेसबुकचे डिझायनर ठरवतात की, कोणता व्हिडिआे वा फ्रेंड््स कमेंट तुम्हाला वर दिसेल. गुगलचे माजी कर्मचारी ट्रिस्टन हॅरिस व फेसबुकचे गुंतवणूकदार रॉजर मॅकनेमी यांनी कंपन्यांवर आरोप केला की, लोकांना व्यसनाधीन बनवणारी उत्पादने ते जाणीवपूर्वक विकत आहेत.


  पिंटरेस्ट कंपनीने वर्तनशास्त्र मानसोपचारतज्ज्ञाला कंपनीत नोकरी दिली. असा पुढाकार घेणारी सिलिकॉन व्हॅलीमधील ही पहिली कंपनी आहे. त्यांच्या फोटो अल्बममध्ये निम्माच फोटो दिसावा अशी सोय कंपनीने केली.

  त्यामुळे पाहणाऱ्याची जिज्ञासा कायम राहते. ग्राहक त्यांच्या प्लॅटफॉर्मवर टिकून राहतो. टेक डिटॉक्स (तंत्रज्ञानाचे व्यसन) कमी करण्याचे काम सुरू आहे. सॅनफ्रान्सिस्कोमध्ये टेक्नॉलॉजी माइंडफुलनेस नावाने एक परिषद झाली. यात तंत्रमुक्त (टेक फ्री) खासगी शाळा, टेक फ्री बैठका अशा संकल्पनांवर विचारमंथन सुरू आहे.

Trending