आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्सन ऑफ द इयर, 2017: मी टू : महिलांचा नवा आवाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपटातील तारे-तारका सामान्य माणसापेक्षा वेगळे असतात. ते आकर्षक असतात, महाग पोशाख करतात, मोठ्या घरांमध्ये राहतात. मात्र अनेक बाबतीत ते सामान्य माणसासारखे आहेत. वर्ष १९९७ मध्ये अॅश्ले जूडची चित्रपट कारकीर्द सुरू होतच होती. त्या वेळी तिची प्रथमच हार्वे वाइन्सटीनशी भेट झाली. मोठ्या मुश्किलीने त्याच्या तावडीतून ती बचावली. बाहेर पडून तिने त्याच्या दुर्वतनाची वाच्यता केली. हॉलीवूडमध्ये अनेकांना याविषयी माहिती असल्याचे तेव्हा कळले. मात्र त्याला लगाम घालण्याचा कोणताही मार्ग नव्हता.  


गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तिने खुलेपणाने वाइन्सटीनवर आरोप केले. त्या वेळी जगाचे लक्ष याकडे गेले. अशी हिंमत दाखवणारी ती पहिली हॉलीवूड तारका होती. मात्र अॅश्लेसारख्या मोठ्या व्यक्तीदेखील वाइन्सटीनसारख्यांची पोलखोल करू शकत नसतील तर सामान्य महिलांची काय स्थिती असेल? मी टू महिलांच्या या शोषण आणि नैराश्याचा परिणाम आहे. लाखो महिलांना त्यांची समस्या सांगण्याचे माध्यम दिले. 


ही काही समकालीन समस्या नाही. शतकांपासून महिलांच्या मनात असे विचार येत राहिले आहेत. त्या आपले वरिष्ठ आणि सहकाऱ्यांमुळे त्रस्त होत्या. मात्र बोलण्यास घाबरत. सुडाच्या भावनेला त्या घाबरत होत्या. मात्र हॅशटॅग मी टू अभियानाने हे मौन तोडले. महिलांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. गेल्या दोन महिन्यांपासून या अभियानाने क्रांतीचे रूप धारण केले. याचे परिणाम चकित करणारे असून तत्काळ दिसून येणारे आहेत. मौन तोडणाऱ्या महिला जगातील विविध भागांतील आहेत. त्या आता आंदोलनात सहभागी आहेत. या आंदोलनाचे नाव नाही. मात्र त्यांना आता अभिव्यक्तीचे माध्यम मिळाले आहे.  


गेल्या वर्षी अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीने देखील या अभियानाच्या सुरुवातीत महत्त्वाची भूमिका बजावली. निवडणूक अभियानादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचे जुने रेकॉर्डिंग प्रकाशात आले. यामध्ये ते महिलांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरताना दिसतात. त्याचा निवडणूक निकालांवर परिणाम झाला नाही. महिलांना वाटले की त्यांना महत्त्व नाही. वाइन्सटीन प्रकरण समोर आले. सुरुवातीला झालेल्या महिलांच्या मोर्चामध्ये याची भूमिका महत्त्वाची ठरली. वाइन्सटीन प्रकरणानंतर दृष्टिकोनात बदल झाला. २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान टाइम मासिक/ सर्व्हेमंकीच्या ऑनलाइन सर्व्हेनुसार ८२% अमेरिकी प्रौढ मानतात की, महिलांच्या शारीरिक शोषणाविरुद्ध बोलण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. ८५% जणांना आरोप योग्य असल्याचे वाटते. हे अभियान आणि याचे परिणाम जगभरात दिसून आले. मी टूची सुरुवात झाल्यानंतर एक आठवड्यातच याच्या विविध आवृत्त्या ८५ देशांमध्ये लोकप्रिय झाल्या. यामध्ये भारतासह इतर अाशियाई देश व मध्यपूर्वेतील देश सामील होते.   


शारीरिक शोषण शब्दाची उत्पत्ती १९७५ मध्ये झाली तेव्हा कॉर्नेले विद्यापीठात काम करणाऱ्या कर्मिटा वुड यांनी वरिष्ठ सहकाऱ्यांच्या आक्षेपार्ह वर्तनाविरुद्ध राजीनामा दिला. कंपनीने आपल्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. कंपनीने यास नकार दिला. विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या मदतीने वुड यांनी कामकरी महिलांचा वर्किंग वुमन युनायटेड नावाचा समूह सुरु केला. येथे महिला त्यांच्याशी झालेल्या दुर्वर्तनाच्या प्रकरणांची नोंद ठेवत. ७० च्या दशकात समाजात अशी अनेक प्रकरणे समोर आली व त्याविषयी जागरूकता निर्माण झाली.

 

मात्र कायदा व धोरण आखले गेले नाही. आैद्यागिक आस्थापना, इतर संस्थांमध्ये होणाऱ्या शारीरिक शोषणाविरुद्ध कोणतेही धोरण नव्हते. गंभीर आरोप फेटाळले जात. १९८० मध्ये रोजगाराची समान संधी आयोगाने कामाच्या ठिकाणी शारीरिक शोषणाला बेकायदेशीर घोषित केले. मात्र गुन्हा दाखल करणे अद्यापही शक्य नव्हते. याची स्पष्ट संकल्पना नव्हती. १९९१ मध्ये अनिता हिल प्रकरण प्रकाशात आले. याची देशभर चर्चा झाली. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अत्याचारांपेक्षा याला राजकारणातील घसरती मूल्ये म्हणून पाहण्यात आले. शारीरिक शोषणाची स्पष्ट संकल्पना सांगणे आजही कठीण आहे. कंपन्या काळानुरूप बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. बहुतांश कंपन्यांमध्ये यासंबंधी स्पष्ट धोरण आहे. प्रशिक्षण दिले जाते. 

बातम्या आणखी आहेत...