आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्सन ऑफ द इयर, 2017: शी जिनपिंग, जगाचे नेतृत्व हाती घेण्याची चीनची महत्त्वाकांक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्ल विक आणि चार्ली कॅम्पबेल  - वर्ष २०१७ मध्ये  शी जिनपिंग यांनी जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या देशावर आपली सत्ता आणि पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले. पक्षात त्यांचे स्थान माआे त्से तुंग आणि डेंग शियाआेपिंग यांच्या बरोबरीने मान्य करण्यात आले. त्यांनी घोषणा केली की, चीनला आता जगाचे नेतृत्व करायचे आहे. १८ ऑक्टोबर रोजी त्यांनी ही घोषणा केली तेव्हा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष वारंवार संकेत देत होते की,अमेरिका जगाच्या नेतृत्वाची आपली इच्छा सोडणार आहे.

 

चीनच्या नव्या महत्त्वाकांक्षेची घोषणा करणारे जिनपिंग पक्षावर आपली पकड मजबूत ठेवून आहेत. त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणाही शक्य झालेली नाही. आपल्या ५ वर्षांच्या पहिल्या कारकीर्दीत त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वोच्च सत्तेला मजबूत केले. सरकारी भ्रष्टाचाराला लगाम घातला. जगभरात आर्थिक विस्तारीकरणाचे धोरण स्वीकारले. स्वत: जागतिक नेतृत्व असल्याचे भासवले. देशांतर्गत त्यांनी समर्थकांची मोठी फळी निर्माण केली. सर्वकाही चीनच्या योजनेनुसार होत आहे. मात्र चीन जगाचे नेतृत्व करेल याविषयी साशंकता आहे. ते यासाठी तयारी करत आहेत. दुसऱ्या देशांमध्ये आपले नेटवर्क उभारले आहे. मात्र देशात अनेक समस्या आहेत. प्रदूषणाचा स्तर गंभीर आहे. साम्यवादाच्या पतनानंतर चीनकडे विचारप्रणाली नाही. त्यामुळे सीमेबाहेर ते त्यांची विश्वासार्हता विकसित करू शकणार नाहीत.  

बातम्या आणखी आहेत...