Home | Divya Marathi Special | sindhutai sapkal and other womens brave story

तिने मुलीसाठी स्मशानात रात्र घालवली, वाचा अशाच 3 सत्‍यकथा

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Mar 08, 2018, 09:09 AM IST

संघर्ष करण्यास न घाबरणारी, धैर्यवान महिला कोणतेही अशक्य काम शक्य करून दाखवते. या महिलांनी तर ते करूनही दाखवले आहे...

 • sindhutai sapkal and other womens brave story

  संघर्ष करण्यास न घाबरणारी, धैर्यवान महिला कोणतेही अशक्य काम शक्य करून दाखवते. या महिलांनी तर ते करूनही दाखवले आहे...

  मुलीसाठी स्मशानात रात्र घालवली होती, सिंधूताई १४०० मुलांच्या ‘आई’

  सिंधूताई ६९ वर्षांच्या आहेत. दररोज शेकडो किमीचा प्रवास करतात. लोकांना आपली कहाणी सांगतात. मग झोळी फिरवतात. आई-वडील नसलेल्या, दत्तक घेतलेल्या शेकडो मुलांच्या उदरभरणासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी. त्यांचा जन्म महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यात झाला होता. १० व्या वर्षीच ३० वर्षीय व्यक्तीशी लग्न करून देण्यात आले. चौथ्यांदा गर्भवती होत्या तेव्हा पतीने घरातून हाकलून दिले. त्याच रात्री गोठ्यात मुलीला जन्म दिला. रेल्वेस्थानकावर राहू लागल्या. मुलीला सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक रात्री स्मशानात काढल्या. ४२ वर्षांत त्यांनी १४०० मुलांना दत्तक घेतले आहे.

  पुढील स्‍लाइडवर वाचा, वडिलांना हवा होता मुलगा, मुलगी पूजाने यकृत दान करून वाचवले प्राण...

 • sindhutai sapkal and other womens brave story

  वडिलांना हवा होता मुलगा, मुलगी पूजाने यकृत दान करून वाचवले प्राण

  पूजा बिजारनिया पाच भाऊ-बहिणींत तिसरी. भाऊ सर्वात लहान आहे. आई-वडिलांना मुलगा हवाच होता म्हणून.पण आता संपूर्ण देशाला त्यांच्या मुलीचा अभिमान आहे. २३ वर्षीय पूजाने यकृताचा एक भाग देऊन वडिलांचे प्राण वाचवले आहेत.  वडिलांना लिव्हर सोरायसिस झाल्यामुळे पूजाने वडिलांना यकृत देण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील पूजाने रिलायन्स इंडस्ट्रीतील नोकरी पुन्हा सुरू केली आहे. पूजाशी कोण लग्न करेल, असे नातेवाइक विचारत असत. त्यावर पूजाचे उत्तर होते- पालकांसाठी काय करायला हवे हे जर एखाद्या मुलाला समजत नसेल तर त्याला माझा जोडीदार होण्याचा हक्क नाही.

 • sindhutai sapkal and other womens brave story

  वडिलांची बदली, निलंबनही झाले, पण आराधनाने मैत्रिणीला न्याय दिला

  हरियाणाचे माजी डीजीपी एपीएस राठौर यांना रुचिका गिरहोत्रा आत्महत्याप्रकरणी १९ वर्षांनंतर सहा महिन्यांची शिक्षा आराधनाच्या साक्षीमुळे मिळाली. आराधना आणि रुचिका पंचकुलाच्या टेनिस अकादमीत खेळत असत. राठौर रुचिकाची  छेड काढत असल्याचे तिने पाहिले होते. त्यामुळेच आराधनाच्या आईने राठौरच्या विरोधात याचिका दाखल केली होती. राठौरने आराधनाच्या वडिलांची अनेकदा बदली केली. निलंबितही केले. पण आराधना घाबरली नाही. लग्नानंतर साक्ष देण्यासाठी ऑस्ट्रेलियातूनही आली. अखेर न्यायालयाने २००९ मध्ये राठौरला शिक्षा सुनावली.

Trending