Home | Divya Marathi Special | Some unknown facts about Chhatrapati Shivaji Maharaj

'हिंदु राज्य' नव्हे हवे होते 'स्वराज्य', हे शिवराय तुम्हाला माहिती आहेत का!

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 19, 2018, 04:00 PM IST

गोविंद पानसरे यांनी त्यांच्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकामध्ये शिवरायांचे अत्यंत वेगळे असे रूप जगासमोर आणले आहे.

 • Some unknown facts about Chhatrapati Shivaji Maharaj

  छत्रपती शिवरायांनी अवघे जीवन हे स्वराज्य स्थापनेसाठी अर्पण केले. त्यांचा केवळ उल्लेख झाला तरी एक वेगळे चैतन्य, उत्साह आणि शिरशिरी निर्माण होते. शिवरायांची जयंती आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. जाणता राजा म्हणून ओळख असलेल्या या राजाबद्दल मराठी बांधवांना जवळपास सर्वच माहिती आहे. पण शिवरायांची एक वेगळी ओळख एका विचारवंतांनी सांगून ठेवली आहे. हे विचारवंत म्हणजे दिवंगत डावे विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे.


  गोविंद पानसरे यांनी त्यांच्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकामध्ये शिवरायांचे एक अत्यंत वेगळे असे रूप जगासमोर आणले आहे. केवळ स्वराज्य निर्माते किंवा हिंदु धर्मरक्षक अशी शिवरायांची ओळख नसून, त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे आणि राज्यकारभाराचे वेगळे रूप त्यांनी जगासमोर आणले आहे. पानसरे यांनी काही समाज कंटकांनी कोल्हापुरात गोळ्या घालून हत्या केली होती.

  विशेष म्हणजे पानसरे यांनी शिवरायांवर दिलेल्या एका व्याख्यानातील भाषण म्हणजेच हे पुस्तक आहे. या पुस्तकात शिवरायांच्या कोणत्या अशा बाजू मांडण्यात आल्या आहेत, ते आपण जाणून घेणार आहोत.

  शिवरायांची सामाजिक समरसरता
  शिवरायांच्या राज्याच्या सुरुवातीच्या काळातही वर्ण व्यवस्थेमुळे अनेकांसाठी जगणे नरकासमान बनले होते. शिवरायांनी त्यांना लष्करात सहभागी करून घेतले आणि मानाने जगण्याची संधी दिली. तसेच लष्कराने युद्धादरम्यान लोकांची शेती उध्वस्त करू नये असा नियम करत गुलामी प्रथाही बंद केली.

  पुढील स्लाइड्सवर वाचा, पानसरेंनी सांगितलेल्या काही ठळक बाबी...

 • Some unknown facts about Chhatrapati Shivaji Maharaj

  कररचना 
  शिवरायांच्या शासनकाळापूर्वी कररचना तशी असमानच होती. हवा तसा कर लादला जायचा. अनेकदा जमा झालेला पैसा पुढे पाठवलाही जात नव्हता. हे सर्व शिवरायांनी थांबवले. एका एकरावर किती कर लागेल हे ठरवले. तसेच वसुलीची जबाबदारीही सिद्ध केली. त्यामुळे जमीनदारांचा जाच कमी झाला. 


  मराठी भाषेचा आग्रह  
  शिवाजी महाराजांपूर्वी सरकारी कामकाजाची भाषा फारशी होती. लोकांना ही भाषा कळत नव्हती. त्यामुळे फसवणुकीचे प्रकार वाढले. त्यामुळे शिवरायांची काम-काजाची भाषा मराठी केली. त्यामुळे राजा आणि रयतेतील संबंध सुधारले. 


   

 • Some unknown facts about Chhatrapati Shivaji Maharaj

  मुस्लीम विरोधी नव्हते शिवराय 
  पानसरेंनी हे जोरकसपणे मांडले आहे. त्यांच्या खास सरदारांपैकी एक होता दौलतखान. आगऱ्याहून पळण्यासाठी त्यांना मदारी मेहतरने मदत केली होती. तोही मुस्लीमच. अनेक मशिदींना ते मदत द्यायचे. मशीद तोडली जाऊ नये याची ते काळजी घ्यायचे. फौजेने पकडून आणलेल्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेलाही त्यांनी आदराने परत पाठवले होते. 


  यामुळे तोडली गेली मंदिरे 
  शिवकाळात मोगलांनी हिंदु मंदिरांची तोडफोड केली. पण त्यामागे युद्धनिती होते, असे पानसरे सांगतात. मंदिरांमधील खजिन्यासाठी तेथे लूट केली जायची. तसेच लोकांचे मनोबल तोडता यावे म्हणून मंदिरे पाडली जात होती. 


   

 • Some unknown facts about Chhatrapati Shivaji Maharaj

  भवानी मातेची तलवार!
  भवानी मातेने शिवरायांना तलवार दिली ही अख्यायिका पोवाडे गाणाऱ्यांनी पसरवली असे पानसरे म्हणतात. याचा काहीही आधार नसल्याचे ते सांगतात. 


  टीकाही केली 
  आजच्या लोकशाहीपेक्षा सरस शिवरायांची राज्यव्यवस्था केली हे जरी खरे असले तरी शिवाजी महाराज शासक होते. त्यांनीही अशी अनेक कामे केली जी करायला नको होती, असे पानसरे म्हणतात. त्यापैकी एक म्हणजे सूरतेची लूट. 


   

 • Some unknown facts about Chhatrapati Shivaji Maharaj

  हिंदुराज्य नव्हे शिवरायांना हवे होते स्वराज्य 
  शिवरायांचे नाव नेहमी हिंदुराष्ट्र निर्मितीशी जोडला जातो. पण पानसरेंच्या मते त्यांनी नेहमी केवळ स्वराज्यासाठी संघर्ष केला. धर्मासाठी ते कधीही लढले नाही. 

Trending