Home | Divya Marathi Special | special women story on international woman day

महिलांच्या तीन पिढ्या, भावना एकसारखीच; वाचा अदम्‍य साहसाच्‍या 3 कथा

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Mar 08, 2018, 09:04 AM IST

99 वर्षीय नानम्मल यांची ऊर्जा आणि योगमुद्रा पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. त्यांची ५ मुले, १२ नातवंडे आणि ११ पतवंडे हे

 • special women story on international woman day
  योगासनांचा वर्ग घेताना 99 वर्षीय नानम्मल.

  1) 99 वर्षीय नानम्मल- अत्यंत तंदुरुस्त, रोज १०० लोकांचा योगासनांचा वर्ग घेतात

  99 वर्षीय नानम्मल यांची ऊर्जा आणि योगमुद्रा पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. त्यांची ५ मुले, १२ नातवंडे आणि ११ पतवंडे हे सर्व जण योग करतात आणि योग शिकवतात. त्या सकाळी ५ वाजता उठतात. गेल्या ९० वर्षांचा त्यांचा हा नित्यक्रम आहे.‘दिव्य मराठी’ला त्यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या दोन्ही आजोबांकडून वयाच्या तिसऱ्या वर्षी योग शिकण्यास सुरुवात केली होती. सध्या त्या मुलगा बालकृष्णनसोबत राहतात. त्यांच्या घरी १०० वर लोक योग शिकायला येतात. ३० सदस्यांच्या कुटुंबाच्या त्या प्रमुख आहेत. आयुष्यात कधीही साखर खाल्ली नाही. त्या सांगतात, गांधीजींनी साखरेला पांढरे विष म्हटले होते. त्यांना कॉफी आणि चहाची चवही माहीत नाही. त्या सुकू कॉफी पितात. भाजलेले धने, जिरे आणि अद्रक मिसळून ती तयार केली जाते. कॉर्न सूप, हिरव्या भाज्या आणि फळे हा त्यांचा मुख्य आहार.

  जीवनात कधीही रुग्णालयात उपचारासाठी गेल्या नाहीत. वयाच्या १९ व्या वर्षी लग्न झाले होते. तेव्हा मी स्वयंपाकघरातच झोपत असे. लवकर उठण्याच्या सवयीमुळे स्वयंपाकघरातच योगा करत असे. ही किचनमध्ये काय खेळते, असे सासूने एक दिवस माझ्या पतीला विचारले. पती वेंकटासामींनी सांगितले की, ही योगासने आहेत. सासूच्या पोटाज‌वळ दुखत होते. नानम्मल यांनी योगाद्वारे ते बरे केले. नंतर त्यांनी इतरांवरही उपचार सुरू केले.

  - जे. सी. शिबू, कोइमतूर

  पुढील स्‍लाइडवर वाचा, महिलांना आपल्या आप्तांना निरोप देता यावा म्हणून झाल्या स्मशान व्यवस्थापक....

 • special women story on international woman day

  ३५ वर्षीय प्रवीणा: महिलांना आपल्या आप्तांना निरोप देता यावा म्हणून झाल्या स्मशान व्यवस्थापक

  घटना २०१४ची. चेन्नईचे सर्वात जुने १२० वर्षांचे स्मशान डंपिंग ग्राउंड व गुंडांचा अड्डा झाले होते. महिलांनाही आपल्या नातेवाइकांना अंतिम निरोप देण्यासाठी येता यावे, असे हे स्थान बनवावे, असे शहरातील एका एनजीओला वाटले. प्रवीणा सोलोमन यांनी हे आव्हान स्वीकारले. साधारणपणे महिला स्मशानात जात नाहीत, पण ३६ वर्षीय प्रवीणा आज या स्मशानाचे व्यवस्थापन पाहतात. गेल्या साडेचार वर्षांपासून त्या हे काम करताहेत. प्रवीणा इंग्रजी साहित्यात एम.ए. आहेत.

 • special women story on international woman day

  17 वर्षीय मसीराबी: त्यांच्या नावावर २१ संशोधने, दुचाकीत लावला एसी

  भुसावळ च्या नारखेडे कॉलेजमध्ये १२ वीत शिकत असलेल्या मसीराने वयाच्या १७ व्या वर्षीच २१ शोध लावले आहेत. वडील हनीफ पटेल वरणगावच्या ऑर्डिनन्स फॅक्ट्रीत काम करतात. एकदा कारमधील एसी पाहिला तेव्हा मसीराने दुचाकीत एसी लावला. त्याचे पेटंटही घेतले. त्यासाठी तिला २०१४ मध्ये ‘राष्ट्रीय बाल पुरस्कार’ मिळाला. तिच्या इतर संशोधनांमध्ये सेन्सर ऑपरेटेड स्ट्रीट लाइट, क्रॉसिंगवर रेल्वे येण्याची सूचना देणारे सेन्सर, पायाने चालवले जाणारे भाजी कापण्याचे यंत्र यांचाही समावेश आहे. 

  - यामिनी कुलकर्णी

Trending