Home | Divya Marathi Special | The first time a heart attack has been a more flexible batsman

हृदयविकाराशी झुंज दिल्यानंतर बनला पहिल्यापेक्षाही अधिक सरस फलंदाज

दिव्य मराठी | Update - Apr 15, 2018, 02:00 AM IST

क्रिस गेल याला संपूर्ण जग जाणते ते धुवाँधार फलंदाजीबद्दल. ते जमैकाचे क्रिकेटर आहेत. पण अांतरराष्ट्रीय पातळीवर वेस्ट इंड

 • The first time a heart attack has been a more flexible batsman

  क्रिस गेल याला संपूर्ण जग जाणते ते धुवाँधार फलंदाजीबद्दल. ते जमैकाचे क्रिकेटर आहेत. पण अांतरराष्ट्रीय पातळीवर वेस्ट इंडीजसाठी खेळतात. भारतात त्यांचे अनेक फॅन्स आहेत. कारण ते वेस्ट इंडिजचे पहिल्या प्रतीच्या फलंदाजापैकी एक अाहेत. सर्वात जास्त धावा आयपीएल सामन्यांमध्ये बनविण्याचे रेकाॅर्ड त्यांच्याच नावावर आहे. क्रिस यांनी आयपीएल सामन्यांत आत्तापर्यंत सर्वात जास्त षटकार मारले आहेत.


  क्रिसचा जन्म जमैकाच्या किंग्जटन येथे २१ सप्टंेबर १९७९ रोजी झाला. ते लहानपणापासूनच शांत स्वभावाचे होते. त्यांचा हा स्वभाव खेळतानाही दिसून येतो. पण सुरुवातीचा काळ गेलसाठी फार संघर्षाचा राहिला. अशी गरिबी होती की दोन वेळचे जेवणही त्यांना कठीण होते. वडिलांचे नाव डूड्ले गेल होते आणि ते पाेलिस खात्यात होते. आई शेंगदाणे विकण्याचे काम करत असे. गेलचे बालपण गल्लीत क्रिकेट खेळण्यात गेले. पण लवकरच त्याला जमैकाच्या लुकास क्रिकेट क्लबमध्ये सामील करण्यात आले. त्यांचे क्रिकेट गुण पाहून त्यांना वयाच्या १९ व्या वर्षीच प्रथम सामना खेळण्याची संधी मिळाली. प्रथम श्रेणीच्या सामन्यात त्यांनी आपल्या खेळाची अशी काही छाप सोडली की, काही महिन्यांतच वेस्ट इंडिजच्या नॅशनल टीमकडून त्यांना खेळण्याचा प्रस्ताव मिळाला. आपला पहिला वनडे इंटरनॅशनल सामना त्याने ११ सप्टेंबर १९९८ रोजी भारताविरुद्ध खेळला. यानंतर सहा महिन्यांनी त्याला कसोटीमध्ये खेळण्याची संधी देण्यात आली. पण क्रीडा रसिकांना त्यांच्याकडून जो खेळ हवा होता तसा खेळ त्यांच्याकडून झाला नाही. यामुळे दाेन वर्षे टीममध्ये त्याचे स्थान पक्के होत नव्हते. यानंतर नोव्हेंेबर २००२ मध्ये असा क्षण आला की, ज्यावेळी त्याची निवड वेस्ट इंडिज संघात झाली. त्याचे स्थान शेवटी पक्के झाले.


  २००२ च्या अंतापर्यंत भारताविरोधात शानदार तीन शतक लगावले. त्यांच्या फॅन्सची संख्या आता वेस्ट इंडीजपुरतीच मर्यादित राहिली नव्हती. क्रिसला २००५ साली दक्षिण आफ्रिकेविरोधात खेळताना चक्कर आल्याने तसेच श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने मैदानाबाहेर व्हावे लागले होते. तपासणीत त्यांच्या हृदयाला छिद्र आढळले. पण उपचारानंतर अधिक माेकळेपणाने जगण्याचा निर्णय घेतला. गेल शस्त्रक्रियेनंतर अधिक जोमाने खेळू लागला. २००६ साली त्याला प्लेअर ऑफ द चँपियन्स हा पुरस्कार देण्यात आला. २००७ साली आयसीसी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरोधात ११७ रन्स काढून जागतिक विक्रम केला. हे रेकॉर्ड पाच वर्षे कायम राहिले. २०११ सालीही सर्वात जास्त धावा मिळविणारा फलंदाज म्हणून नाव कमविले.


  - टी-20 क्रिकेट मध्ये १०,००० धावा करणारा पहिला खेळाडू.

  - 265 षटकारांसह आयपीएलमध्ये सर्वात जास्त षटकार मारणारा एकमेव खेळाडू.

  - गरिबीचे चटके सोसत बालपणी नेहमीच गल्लीमध्ये क्रिकेट खेळत असे.

  नाव : क्रिस गेल
  जन्म : २१ सप्टंेबर १९७९
  काम : क्रिकेटर

Trending