आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिला अल्बम हिट होताच 20 व्या वर्षी गरीब मुलांसाठी स्थापन केले फाउंडेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘जेव्हा मी ७ वर्षांची होते तेव्हा वडिलांच्या दागिन्याच्या व्यवसायाचे दिवाळे निघाले. तेव्हा मला दिवाळखोरी शब्दाचा अर्थही माहीत नव्हता. मला एका कौटुंबिक मित्राकडे राहण्यास पाठवून दिले होते. सर्व सुरळीत होईल, असे मला सांगण्यात आले. पण जेव्हा मी परतले तेव्हा सर्व काही बदलले होते. आधी मी शाळेत कारने जात होते, पण आता कार नव्हती. घरातील एअर कंडिशन्ड काढले होते. रंगीत टीव्हीऐवजी ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही आला होता. आधी आवडीचे पदार्थ जेवणात मिळत असत; पण आता पोट भरावे असे जेवण मिळत होते. कुटुंबाचे जीवन मध्यमवर्गाऐवजी कनिष्ठ वर्गाचे झाले होते. तेव्हा एक दिवस वडिलांसोबत बागेजवळून जात असताना मी पाहिले की काही मुले रस्त्यांवरच राहतात. मिळते ते खातात. शिल्लक राहिलेले, खाली पडलेले, काहीही. ही मुले माझ्या आण माझ्या मित्रांसारखीच आहेत, असे मला वाटले. जीवनात काही झाले तर या लोकांसाठी निश्चित काही करेन, असे त्या दिवशी ठरवले.’  


असे होते कोलंबियन- अमेरिकन गायिका शकिराचे बालपण. शकिरा आज जगातील टॉप पॉप गायकांपैकी एक आहे. दोन वेळा तिने ग्रॅमी पुरस्कार मिळवता आहे आणि सहा वेळा त्यासाठी नामांकन झाले आहे. पण आपल्या देशात ती आणखी एका कारणामुळे प्रसिद्ध आहे. ती म्हणजे गरिबांना मदत. २ फेब्रुवारी १९७७ रोजी जन्मलेली शकिरा सात भाऊ-बहिणींपैकी एक. तिने वयाच्या ८-९ व्या वर्षीच गाणे लिहिणे, कंपोज करणे सुरू केले. १० व्या वर्षी शाळेत गाण्याची ऑडिशन देण्यास गेली होती, तेव्हा तुझा आवाज खूप जाड आहे, असे सांगून तिला नकार मिळाला. पुढे काही वर्षे ती लाइव्ह गाण्याची संधी शोधत होती. अखेर तिला मुलांच्या एका कार्यक्रमात जाण्याची संधी मिळाली. हळूहळू स्थानिक स्तरावर ओळख मिळाली. नंतर मोनिका या थिएटर प्रोड्युसरशी भेट झाली. मोनिकाला तिचा आवाज आवडला. तिने कारकीर्दीत मदतीचे आश्वासन दिले. १३ व्या वर्षी शकिरा मॉडेलिंगमध्ये कारकीर्द करण्याचा विचार करत होती. पण दरम्यान मोनिकाने सोनी कोलंबियाच्या एक्झिक्युटिव्हशी हॉटेलच्या लॉबीत भेट घेतली.

 

मोनिकाने लॉबीतच शकिराची त्यांच्यासमोर ऑडिशन केली. त्यांना आवाज आवडला; पण संगीतकाराला शकिराचा आवाज चांगला वाटला नाही. तरीही सोनीने शकिराशी तीन अल्बमचा करार केला. तेव्हा शकिरा लाजाळू मुलगी होती. तिने नृत्य शिकण्यास सुरुवात केली. तिची आजी लेबनॉनची होती. आजीने तिला नृत्य शिकवले. नंतर हेच नृत्य तिची ओळख बनले. शकिराचा पहिला अल्बम १९९१ मध्ये रिलीज झाला आणि त्याच्या १००० पेक्षा जास्त प्रती विकल्या. दुसरा अल्बम १९९३ मध्ये आला. तेही फार यशस्वी झाले नाही. त्यामुळे शकिराने गायनातून ब्रेक घेऊन शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. १९९५ मध्ये आलेला तिसरा अल्बम ठीक राहिला. 


चौथा अल्बम आला तेव्हा त्याच्या ७० लाखांवर प्रती विकल्या. हा अल्बम हिट झाल्यानंतर शकिराने लहानपणी ठरवलेल्या गोष्टी केल्या. तिने गरीब मुलांच्या मदतीसाठी १९९७ मध्ये आपले फाउंडेशन बनवले. नाव ठेवले बेअरफूट फाउंडेशन. हे फाउंडेशन मुलांना शिक्षण देण्याचे काम करते. गरीब मुलांसाठी केलेल्या कामासाठी तिला यूएन इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने २०१० मध्ये पुरस्कार दिला. या अल्बमने तिला फ्रान्स आणि कॅनडासारख्या देशांतही प्रसिद्धी देणे सुरू केले. नंतर २००० या वर्षात तिने ३ महिन्यांचा लॅटिन अमेरिका आणि अमेरिकेचा दौरा केला. त्या वर्षी तिला एमटीव्ही व्हिडिओ संगीत पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर शकिराने इंग्रजीतही गाण्यास सुरुवात केली. तोपर्यंत ती फक्त स्पॅनिश गाणी गात होती. 

 

- जगभरात शकिराच्या गाण्यांचे ६ कोटींपेक्षा जास्त अल्बम विकले गेलेत.  
- १८व्या वर्षी आपले बेअर फूट फाउंडेशन सुरू केले. ते मुलांना शिक्षण देण्याचे काम करते.  
- शकिरा स्पॅनिश, पोर्तुगीज (पोर्तुगाली), इटालियन, इंग्रजी भाषा बोलू शकते.  

बातम्या आणखी आहेत...