Home | Divya Marathi Special | The need to focus more on agriculture, industry

महाराष्ट्र दिन विशेष: शेती, उद्योग क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची गरज

सुधीर रसाळ | Update - May 01, 2018, 07:23 AM IST

महाराष्ट्रात शिक्षणाबद्दलची जागृती प्रचंड झाली. संपूर्ण समाज शिक्षण घेण्यासाठी अभिमुख बनला. तरुण पिढीने चांगले शिक्षण घ्

 • The need to focus more on agriculture, industry

  बलस्थाने
  महाराष्ट्रात शिक्षणाबद्दलची जागृती प्रचंड झाली. संपूर्ण समाज शिक्षण घेण्यासाठी अभिमुख बनला. तरुण पिढीने चांगले शिक्षण घ्यावे, राहणीमानाचा दर्जा सुधारावा ही वृत्ती समाजात वाढीस लागली. यासह राजकीय जागृतीही वाढली आहे. पूर्वी राजकारण आपला पिंड नव्हे, असे मानत तरुण मागे राहत, पण आता मात्र आपल्या हक्कासाठी शिक्षण घेणारा तरुण रस्त्यावर उतरत आहे. सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थी नेतेही आग्रह धरत आहेत. दिल्लीतील जेएनयूतील आंदोलनही राजकीय जागृतीचाच एक भाग होता.

  धोके
  समाजामध्ये शिक्षण घेण्याबाबत जागृती वाढली, पण शैक्षणिक दर्जा खालावत आहे. अनेक महाविद्यालये तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांवर अवलंबून आहेत. मुलांना दर्जात्मक शिक्षण मिळत नाही. परिणामी उद्योग, कला, क्रीडा या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची निर्मिती होत नाही आणि देशाच्या आर्थिक, सामाजिक प्रगतीत अडथळा निर्माण होतो. राज्याची वाटचाल एका अराजकाकडे सुरू आहे. खून, बलात्काराच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. विशेष म्हणजे याबद्दल कोणीच संवेदनशील नाही, हे अजूनच अस्वस्थ करणारे आहे.

  उणिवा
  प्रत्येक जाती, धर्माने आपापले महानायक निश्चित करून टाकले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दलित आणि मागास जातीचे प्रश्न हे सबंध देशाचे प्रश्न आहेत अशी भूमिका राजकीय पुढारी, विचारवंत घेत असत व त्यादृष्टीने प्रबोधन केले जात. परंतु आता सामाजिक प्रश्न जाती-पातीत विभागले गेले. उदा. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी केवळ मराठ्यांनीच आंदोलन करावे, अॅट्रॉसिटीसाठी फक्त दलितांनीच लढा उभारावा, एखाद्या विशिष्ट धर्माच्या मुलीवर बलात्कार झाल्यास त्या धर्माच्या लोकांनीच रस्त्यावर उतरावे असा पायंडा पडताना दिसतो.

  संधी
  महाराष्ट्रात सामाजिक प्रश्न कायम आहेत. परंतु बऱ्याच क्षेत्रांत प्रगतीला वाव आहे. व्यवस्थित आर्थिक नियोजन केल्यास रोजगाराच्या अमाप संधी निर्माण होऊ शकतील. राज्याला लागणारे मनुष्यबळ आणि मुलाचेे शिक्षण याचा व्यवस्थेत ताळमेळ बसवल्यास औद्योगिक प्रगती साध्य करता येईल. तसेच महाराष्ट्रातील अनेक भागांतही शेती व शेती आधारित उद्योगांना चांगला वाव आहे. मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यात पाणी फाउंडेशनसारख्या संस्था श्रमदानाचे उत्तम काम करत आहेत. अशा मोहिमांमुळे राज्यातील शेतीला चांगला फायदा होईल.

  - सुधीर रसाळ (ज्येष्ठ साहित्यिक)

Trending