Home | Divya Marathi Special | The power stations of Maharashtra

महाराष्ट्राची शक्तिस्थळे: पुणे आयटी पार्क; सॉफ्टवेअर निर्यातीत देशात दुसरा क्रमांक

दिव्य मराठी | Update - May 01, 2018, 08:29 AM IST

बंगळूरू, हैद्राबादप्रमाणेच पुणे हे भारतातले प्रस्थापित ‘आयटी डेस्टिनेशन’ आहे. सॉफ्टवेअर निर्यातीमध्ये पुण्याने बंगळुरूनं

 • The power stations of Maharashtra

  पुणे आयटी पार्क: सॉफ्टवेअर निर्यातीत देशात दुसरा क्रमांक

  पुणे (सुकृत करंदीकर)-

  बंगळूरू, हैद्राबादप्रमाणेच पुणे हे भारतातले प्रस्थापित ‘आयटी डेस्टिनेशन’ आहे. सॉफ्टवेअर निर्यातीमध्ये पुण्याने बंगळुरूनंतर देशात दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पुणे शहर आणि त्यातही हिंजवडी, खराडी, मगरपट्टा सिटी, ताथवडे या परिसरात आयटी उद्योग एकवटलेला आहे. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडियाचे संचालक संजयकुमार गुप्ता यांनी सांगितले, ‘महाराष्ट्रातल्या लहानमोठ्या आयटी कंपन्यांची संख्या सातशेच्या घरात आहे. यातल्या चारशेंहून अधिक कंपन्या फक्त पुणे परिसरातच आहेत. सॉफ्टवेअर एक्स्पोर्टर्स असोसिएशन ऑफ पुणे या संघटनेचे सचिव विद्याधर पुरंदरे म्हणालेे, अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या संशोधन आणि विकास प्रकल्पांसाठी पुण्यात येत आहेत. जागतिक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पुण्याने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

  - ३ लाख कुशल तंत्रज्ञांना आयटी क्षेत्रात थेट रोजगार मिळाला आहे

  - १० लाख लोक आयटी उद्योगावर अप्रत्यक्षपणे अवलंबून आहेत.

  -आयटी आणि संलग्न क्षेत्रातील कंपन्यांच्या वाढत्या कारभारामुळे पुण्यातील गृहप्रकल्प उद्योग, हॉटेल उद्योग, शैक्षणिक संस्था आदींचीही भरभराट गेल्या दोन दशकात झाली आहे. परिणामी सर्वाधिक वार्षिक पगार देणाऱ्या शहरांच्या यादीतही पुणे देशात सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.

  पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, महाराष्ट्रातील इतर शक्‍तीस्‍थळांविषयी...

 • The power stations of Maharashtra

  पुढील स्‍लाइडवर वाचा, औरंगाबाद डीएमआयसीविषयी... 

 • The power stations of Maharashtra

  औरंगाबाद डीएमआयसी
  - येत्या चार वर्षांत ११ हजार कोटींची कामे

   

  अाशिष देशमुख| औरंगाबाद
  देशातील १४ राज्यांतून जाणाऱ्या दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अर्थात डीएमआयसीमध्ये प्रत्यक्ष कामाच्या बाबतीत संपूर्ण देशात औरंगाबादच्या शेंद्रा -बिडकीन डीएमआयसीने आघाडी घेतली आहे.तीन वर्षांत शेेंद्रा डीएमआयसीमधील पायाभूत सुविधांची ७० टक्के कामे पूर्ण झाली असून ती डिसेंबर २०१८ मध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. तर बिडकीन डीएमआयसी मधील कामे १८ टक्के पूर्ण झाली आहेत. दक्षिण कोरियातील ह्युसंग वस्त्रोद्योग कंपनीने डीएमआयसी शेंद्रा अर्थात ऑरिक सिटीत पहिला अँकर प्रोजेक्ट सुरू केला असून ३ हजार ४०० कोटींची गुंतवणूक केली आहे. यात किमान १२०० लोकांना रोजगार मिळणार आहे. कंपनीच्या उभारणीचे काम सरू झाले असून मे २०१९ मध्ये प्रत्यक्ष उत्पादन सुरू होत आहे.

  - ३ लाख रोजगार निर्मिती

  - ३,४०० कोटींची 
  कामे प्रगतिपथावर आहेत.
  - १५३३ कोटींची 
  पायाभूत सुविधांची 
  कामे पूर्ण झाली.

  -एकूण ११००० कोटी रुपयांच्या 
  कामांना केंद्राची मंजुरी

  - ८०००
  कोटी रु.ची 
  कामे होणार बिडकीनमध्ये 

  - ३०००
  कोटी रु.ची 
  कामे शेंद्रा डीएमआयसीत

  - काम करणाऱ्या कंपन्या
  * राज्य शासनाची इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड 
  * मंुबईची शापुरजी पालनजी

  * अमेरिकेतील सीएचटूएम

   

   पुढील स्लाईडवर पहा,सिन्नर एम.आय. डी . सी विषयी  

 • The power stations of Maharashtra

  सिन्नर एमआयडीसी
  औद्योगिक चतुष्कोणात पाचव्या कोनाची भर

   

  राजेंद्र देशपांडे | सिन्नर
  मुंबई, पुणे, औरंगाबाद व नाशिक हा राज्याचा औद्योगिक चुतष्कोन म्हटला जातो. गेल्या पाव शतकापासून सिन्नरचे औद्योगिकीकरण सुरू झाले. मुसळगाव व माळेगाव वसाहतीत पाचशेहून अधिक कारखान्यांतून सुमारे २५ हजारांना प्रत्यक्ष तर हजारोंना अप्रत्यक्ष रोजगार मिळाल्याने राज्याच्या औद्योिगक नकाशावर उद्यमनगरी म्हणून सिन्नरचे नाव झळकू लागले. राज्यातील पहिला ‘सेझ’ मुसळगाव व गुळवंच येथे साकारला. कोळसा वाहतुकीसाठी नाशिकरोड एकलहरेपासून रेल्वे मार्गाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. सध्या ते थंडावले असले तरी पूर्ण होताच सिन्नरचा औद्योगिक विकास अधिक झपाट्याने होणार आहे. शेती उत्पादनातही अग्रेसर असलेले सिन्नर भाजीपाला व विशेषत: कांदा उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून प्रसिध्द आहे.

  पहिले विशेष आर्थिक क्षेत्र

  नाशिकरोडचे रेल्वेस्थानक अवघ्या १८ किलोमीटरवर आहे. तालुक्याच्या पूर्व भागात जिरायती शेतजमीन उपलब्ध असल्याने राज्याच्या औद्योिगक विकासात 
  भर घालण्यासाठी सज्ज आहे.

  शिर्डी येथील विमानतळ

   

  -सिन्नरच्या  सरहद्दीवरच साकारले आहे.

  - २५००० प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध

  - १,००,००० लाखांहून जास्त अप्रत्यक्ष रोजगार

  - ५०० वर कारखाने

  - १८० किमी अंतर 

  -  आैरंगाबाद, पुणे, मुंबईपासून समान अंतरावर

   

Trending