Home | Divya Marathi Special | These features for Facebook's better use ...

फेसबुकच्या अाणखी चांगल्या वापरासाठी हे फीचर्स...

दिव्‍य मराठी | Update - Mar 19, 2018, 04:40 AM IST

मारे दहाच वर्षांत फेसबुक जगातील सर्वाधिक लाेकप्रिय साेशल मीडिया बनला अाहे. इंटरनेट वर्ल्ड स्टेट‌्सनुसार डिसेंबर २०१७ पर

 • These features for Facebook's better use ...

  मारे दहाच वर्षांत फेसबुक जगातील सर्वाधिक लाेकप्रिय साेशल मीडिया बनला अाहे. इंटरनेट वर्ल्ड स्टेट‌्सनुसार डिसेंबर २०१७ पर्यंत देशात २५ काेटींहून अधिक फेसबुक वापरकर्ते अाहेत. म्हणजे, माहितीचे अादानप्रदान, संपर्क वाढवणे व अनेक गेम अादी मनाेरंजनाच्या कामासाठीही लाेक फेसबुकला पसंती देऊ लागले अाहेत. मात्र, तुम्हाला माहीत अाहे का, फेसबुक यापेक्षाही अनेक सुविधा देत अाहे. या मीडियाचा अधिक चांगला वापर करायचा असेल, तर त्यासाठी काही टिप्स अाम्ही अापणास देत अाहाेत. यामुळे तुमचा अनुभव अधिक रंजक हाेऊ शकेल.

  ‘एसएमएस’नेही करा फेसबुक पोस्ट
  अाता तुम्ही तुमच्या फाेनवरून एक साधा एसएमएस पाठवूनही अापल्या फेसबुकचे स्टेटस अपडेट करू शकता. ती सुविधा सुरू करण्यास खालील पद्धती अवलंबा...
  १ एफबी सेटिंगमध्ये माेबाइलवर क्लिक करा व अॅड अनदर मोबाइल नंबर क्लिक करा.
  २ वायरलेस कॅरिअरला सिलेक्ट करा व नेक्स्टवर क्लिक करा.
  ३ फेसबुकच्या एसएमएस नंबरवर ‘F' एसएमएस करा. अाता फेसबुकच्या पॉपअप बॉक्समध्ये कन्फर्मेशन काेड टाइप करा. यानंतर फेसबुकच्या एसएमएस नंबरवर टेक्स्ट पाठवा. पोस्ट तुमच्या वाॅलवर अपडेट हाेईल.
  फेसबुक प्रोफाइलला बनवा पायरेट्स पेज
  जर तुम्हाला तुमच्या फेसबुक प्राेफाइलचा कंटाळा अाला असेल व ते बदलण्याची इच्छा असेल, तर तुम्ही त्याला कस्टमाइज करू शकता. त्यासाठी सेटिंग अाॅप्शनमध्ये जा व लॅंॅग्वेज सिलेक्ट करून अापली भाषा निवडा. इथे फेसबुक तुम्हाला विचारेल की, तुम्ही याच भाषेचा वापर करू इच्छित असाल, तर त्या ठिकाणी दिलेल्या एडिट अाॅप्शनवर क्लिक करू शकता व इंग्लिश पायरेट अाॅप्शनची निवड करू शकता. हा पर्याय तुम्हाला अनेक मजेदार पायरेट व्हेरिएशन्स देईल. त्यामुळे तुमच्या मनाेरंजनात नक्कीच वाढ हाेऊ शकेल.
  बर्थडे नोटिफिकेशन्स- पासून सुटका मिळवा
  अाप्तांचा वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी फेसबुकची खूप मदत हाेत असते. मात्र, एफबी मित्रांच्या यादीत अनेक लाेक फार अाेळखीचे नसतात. मात्र, तरीही त्यांच्या वाढदिवसाच्या नाेटिफिकेशनमुळे काही युजर त्रस्त हाेतात. तुमची इच्छा असल्यास या ‘रिमाइंडर्स’ला तुम्ही डिसेबल करू शकता. त्यासाठी तुम्हाला फेसबुक पेजच्या टाॅप बारवर नाेटिफिकेशन्स ग्लाेबवर क्लिक करा. नंतर ड्रॉप डाऊनच्या टॉप राइट कॉर्नरमध्ये सेटिंगवर क्लिक करा. इथे बर्थ डेचे अाॅप्शन निवडा व त्याला ‘स्वीच अाॅफ’ करून टाका.

Trending