Home | Divya Marathi Special | vivek m. rathod Satellite capability of India

चार दशकांत भारताची उपग्रहक्षमता 17 पटींनी वाढली

विवेक एम. राठोड | Update - Apr 19, 2018, 03:14 AM IST

अंतराळविषयक संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारताने बरीच मजल मारली आहे. आजच्याच दिवशी म्हणजे १९ एप्रिल १९७९ रोजी भारता

 • vivek m. rathod Satellite capability of India
  भारताने प्रक्षेपित केलेला पहिला उपग्रह

  औरंगाबाद -अंतराळविषयक संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारताने बरीच मजल मारली आहे. आजच्याच दिवशी म्हणजे १९ एप्रिल १९७९ रोजी भारताने ‘आर्यभट्ट’ हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला होता. तेव्हापासून आजवर भारताची उपग्रहक्षमता १७ पटींनी वाढली आहे. १९८० च्या दशकात भारताने तीनच उपग्रह अवकाशात सोडले होते. तर, सध्याच्या चालू दशकामध्ये भारताचे तब्बल ५१ उपग्रह अवकाशात झेपावले आहेत. पहिला उपग्रह सोडण्यासाठी रशियाची मदत घेणारा भारत सध्या अन्य देशांचे उपग्रह अवकाशात नेण्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाने प्रचंड समृद्ध झाला आहे. मागील ३९ वर्षांत भारताने १०४ उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. त्यापैकी फक्त ११ उपग्रहांचेच प्रक्षेपण अयशस्वी ठरले. अंतराळ क्षेत्रात मातब्बर असलेल्या अमेरिका, रशिया, जपानसारख्या देशांच्या तुलनेत ही कामगिरी सरस आहे.

  - संवाद यंत्रणा सक्षम
  इस्रोने आजवर संवाद यंत्रणा, भूविज्ञान,भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, अभियांत्रिकी, सौर, तंत्रज्ञान अॅप्लिकेशन्स, जीपीएस, ग्रहविज्ञान आदी विषयांच्या अभ्यासासाठी उपग्रह प्रक्षेपित केले. यात सर्वाधिक ३९ उपग्रह हे फक्त संवादयंत्रणेच्या अभ्यासासाठीच प्रक्षेपित करण्यात आले.

  - तिसरीच मोहीम अयशस्वी...
  १९ एप्रिल १९७९ रोजी रशियाच्या मदतीने आपला पहिला कृत्रिम उपग्रह ‘आर्यभट्ट’ प्रक्षेपित केला व त्यानंतर लागलीच दोन उपग्रहांच्या प्रक्षेपणाची त्याच वर्षी तयारी सुरू केली. मात्र, ‘रोहिणी’ (टेक्नॉलॉजी पेलोड) या तिसऱ्याच उपग्रहाचे प्रक्षेपण अयशस्वी ठरले होते.

  - १०४ उपग्रह एकाच वेळी सोडण्याचा विक्रम...

  इस्रोने तयार केलेल्या पोलार सॅटेलाइट लाँच व्हेइकलच्या मदतीने १५ फेब्रुवारी २०१७ रोजी श्रीहरिकोटा येथून १०४ उपग्रह प्रक्षेपित केले होते.

  - उपलब्ध लाँचर्स...

  १. साउंडिंग रॉकेट्स २. एसएलव्ही ३. एएसएलव्ही ४. पीएसएलव्ही ५. जीएसएलव्ही ६. जीएसएलव्ही एमके-३

  ७.आरआएलव्ही-टीडी ८. स्क्रॅमजेट इंजिन-टीडी

  - कोणत्याही राष्ट्राने केलेली ही आजवरची विक्रमी कामगिरी ठरली.

  भारत-३, अमेरिका-९६, नेदरलँड्स, स्वित्झर्लंड, यूएई, इस्रायल व कझाकिस्तान या देशांचा प्रत्येकी एक उपग्रह होता.

  पुढील स्लाईडवर पहा, ३९ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारताने प्रक्षेपित केला पहिला उपग्रह......

 • vivek m. rathod Satellite capability of India

Trending