Home | Divya Marathi Special | Womens Day Special: Important Four Functions in Life

जीवनात महत्त्वाची चारच कार्ये, त्या सर्वांच्या मुळाशी महिलांची शक्ती

दिव्‍य मराठी | Update - Mar 08, 2018, 09:05 AM IST

आई, बहीण, पत्नी, मुलगी आणि मैत्रीण या रूपात महिलाच या कार्यांच्या सूत्रधार आहेत, त्यांच्या योगदानाला सन्मान देण्याचा आजच

 • Womens Day Special: Important Four Functions in Life

  आई, बहीण, पत्नी, मुलगी आणि मैत्रीण या रूपात महिलाच या कार्यांच्या सूत्रधार आहेत, त्यांच्या योगदानाला सन्मान देण्याचा आजचा दिवस

  जे नाही, ते मिळवणे

  संतान, बुद्धी, शिक्षण, काम-व्यवसाय-नोकरी. आपल्याकडे जे नाही ते मिळवण्यासाठीच ही आणि अशीच कामे आपण दररोज, दर क्षणी करतो . जीवनातील हे पहिले कार्य आहे.

  - प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंब संपूर्ण आयुष्यात हेच कार्य करते. या सर्वांच्या मुळाशी महिलाच आहेत. या कामांसाठी त्याच आपल्याला प्रेरणा देतात.

  पुढील स्‍लाइडवर वाचा, जे मिळवले, ते कायम ठेवणे...

 • Womens Day Special: Important Four Functions in Life

  जे मिळवले, ते कायम ठेवणे

  सन्मान, संस्कार, नाती, चांगले आरोग्य, बचत. कठोर परिश्रमाने मिळवलेल्या या आणि इतर गोष्टी. त्या कायम ठेवणे जीवनातील दुसरे महत्त्वाचे कार्य आहे.

  - कुटुंब सुखी असेल तर जग सुखी आहे. कुटुंबाला सुखी करण्यासाठी ते चांगले ठे‌वणे गरजेचे आहे. महिला कुटुंब सांभाळतात तेव्हा हेच करतात.

   

 • Womens Day Special: Important Four Functions in Life

  जे मिळवले, ते वाढवणे

  गुण, कौशल्य, धनसंपत्ती, संबंध, प्रगती, योग्यता. या आणि यांसारख्या ज्या गोष्टी आपण जीवनात मिळवल्या आहेत त्या नेहमी वाढवत राहणे हे जीवनातील तिसरे कार्य आहे.

  - कुटुंबातील महिला जेव्हा मुलांचे पालनपोषण करतात तेव्हा जे मिळाले आहे ते वाढवण्याचेच कार्य करतात. 

   

   

   

 • Womens Day Special: Important Four Functions in Life

  जे वाढवले आहे, ते वाटणे

  विद्या, बुद्धी, सत्ता, बळ, पैसा, समज. या आणि जीवनात ज्या गोष्टी मिळवल्या त्या वाटून घेणे. फक्त परोपकार करणे नव्हे तर जे मिळाले आहे त्याचा उपयोग करणे जीवनातील चौथे कार्य आहे. 

  - आई, बहीण, मुलगी, पत्नी, मैत्रीण या रूपात महिला जेव्हा सर्वांची काळजी घेतात तेव्हा जे मिळाले आहे ते सर्वांत वाटून घेण्याचेच कार्य करतात.

Trending