आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला दिन विशेष: पती-पत्नी यांच्यात असे वाढते प्रेम, नाते होते आणखी मजबूत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1 हार्वर्ड युनिव्हर्सिटीत १९३८ मध्ये संशाेधन सुरू झाले- हार्वर्ड स्टडी अाॅफ अॅडल्ट डेव्हलपमेंट. ८० वर्षे चाललेल्या या संशाेधनात स्पष्ट झाले चांगल्या संसारातून वय व अानंद दाेन्ही वाढतात  पैसा व प्रसिद्धीहून अधिक जास्त परिणाम जाेडीदाराशी जवळच्या नात्यामुळे हाेत असताे.  जे लाेक पन्नाशीत या गाेष्टीमुळे अानंदी असतात ते एेंशीव्या वर्षी इतरांच्या तुलनेत अधिक सुदृढ राहतात.चांगले काैटंुबिक संबंध असलेले लाेक सिगारेट, दारूपासून दूर राहतात.

 

2 बर्मिंघम यंग युनिव्हर्सिटीच्या  संशाेधनानुसार, जी दांपत्ये समस्या, निर्णय घेण्यास किंवा माफी मागण्यासाठी टेक्स्ट मेसेज पाठवतात त्यांच्या नात्यात अानंद कमी असताे.  त्यामुळे अशा वेळी जाेडीदाराला मेसेजएेवजी फाेन करून त्याच्याशी संवाद साधायला हवा.

 

3  फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटी येथील संशाेधनानुसार, जे जाेडीदार नात्याच्या सुरुवातीपासूनच नाराज असतात, मात्र त्यांच्या नात्यात प्रामाणिकपणा असताे; ते अायुष्यात अनेक वर्षांपर्यंत अानंदी राहू शकतात.

 

4 ‘यूसीएलए’च्या अभ्यासानुसार,  जे जाेडीदार काैटुंबिक जबाबदाऱ्या अापसात वाटून घेतात  त्यांच्या नातेसंबंधात अधिक समाधान दिसून येते.

 

5 जर्नल ऑफ पर्सनॅलिटी अँड  सोशल सायकाॅलॉजीमध्ये २००६ मध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, जे लोक जाेडीदाराच्या यशावर जणू अापलेच यश अाले असा अानंद व्यक्त करतात ते जास्त काळ सुखी राहतात. जे लोक असे करू शकत नाहीत त्यांच्या नात्यात अानंदही कमी असताे.

 

6 मिशिगन युनिव्हर्सिटीच्या पाहणीनुसार, जे लाेक खूप खर्चिक असतात त्यांना कमी खर्च करणारा जाेडीदार हवा असताे. मात्र, या निर्णयामुळे भविष्यात वाद अधिक अाणि समाधान कमी मिळते. असे जाेडीदार जास्त अानंदी राहतात ज्यांचा खर्च करण्याच्या सवयी सारख्या असतात मग भलेही हे दांपत्य खर्चिक असाे वा काटकसर करणारे.

बातम्या आणखी आहेत...