आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा दिन; प्रत्येक देशाकडे असतात 30 युवा वर्षे, भारताकडे शिल्लक आहेत 20 बहुमोल वर्षे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिनविशेष असेल तेव्हा दै. दिव्य मराठी अधिक, नावीन्यपूर्ण व विशेष मजकूर देतो. आज युवादिन. जाणून घ्या भारतीय युवा लोकसंख्येची शक्ती...


एखाद्या देशात सर्वाधिक तरुण लोकसंख्या असेल तर त्या देशासाठी ३० वर्षे सर्वात मौल्यवान असतात. सध्या आपला भारत देश याच टप्प्यातून जात आहे. चीनकडे १९९३मध्ये ११७.८ कोटींच्या  एकूण लोकसंख्येत तब्बल ५१.५१ टक्के ‘वर्क फोर्स’ होता. भारतही सध्या 
याच टप्प्यावर आहे. २०१६मध्ये भारताच्या एकूण १३२.४ कोटी लोकसंख्येत ५१.५२% वर्कफोर्स होता. याच शक्तीमुळे चीन जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ठरला आहे. आज भारतही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे.   


तिसऱ्या क्रमांकावर भारत 
देशात २०३१ पर्यंत एकूण लोकसंख्या १५३.९ कोटी होईल. यात १५-३५ वर्षे वयोगटातील युवकांची संख्या ३१.८% म्हणजे ४९ कोटी असेल. २०११ मध्ये ती ३४.८% होती. तरुणाईची ही संख्या सध्या जगात सर्वाधिक आहे. २० वर्षांपर्यंत हीच स्थिती राहील. २०३१ पर्यंत भारत ४६९ लाख कोटींची अर्थव्यवस्था होईल. ही जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असेल.


५० कोटी कुशल तरुण
देशात १.२० कोटी तरुण दरवर्षी ‘वर्किंग एज पॉप्युलेशन’ मध्ये समाविष्ट होत अाहेत. आशियात ही संख्या सर्वाधिक आहे. सध्या वर्षाकाठी केवळ १५ ते १८ लाख नवे रोजगार निर्माण होऊ शकत आहेत. या प्रक्रियेत २०२२ पर्यंत ५० कोटी लोक कुशल होतील, अशी अपेक्षा आहे.


आयटीमध्ये सर्वाधिक
भारतात आयटी आणि ई-कॉमर्स क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांचे सरासरी वय २८ वर्षे आहे. या कंपन्यांचे संचालक व व्यवस्थापन आदी पाहणाऱ्यांचे सरासरी वय ३४ इतके आहे. चित्रपट उद्योग तसेच टेलिकॉम कंपन्यांत काम करणाऱ्या तरुणांचे सरासरी वय ३० ते ३५ वर्षे आहे.


जपान भारताच्या मागे
वयस्करांच्या संख्येमुळे सध्या जपान प्रचंड अडचणीत आहे. सध्या जपानमधील लोकांचे सरासरी वय ४६.३ वर्षे आहे. २०३१ मध्ये ते ५१.५ वर्षे होईल. या स्थितीत सध्या जगात तिसरी मोठी अर्थव्यवस्था असलेला जपान २०३१मध्ये ६.३७ ट्रिलियन डॉलर्ससह भारतापेक्षा पिछाडीवर असेल.


> विदेशांच्या तुलनेत अापण लवकर शिक्षण सुरू करताे, लग्नही लवकर; परंतु सक्रिय कमी
 

भारतीयांना नाव ठेवण्याचे स्वातंत्र्य
जन्मानंतर मुले व अाई-वडिलांना अापले अावडीचे नाव ठेेवण्याचा अधिकार मिळताे. हे स्वातंत्र्य जगात नाही. फ्रान्समध्ये एखाद्याचे नाव याेग्य वाटत नसेल, तर जन्मनाेंदणी करणारा अधिकारी स्थानिक न्यायालयाला सूचित करू शकताे. जर्मनीत मुलाचे नाव ठेवण्याबाबत अनेक प्रकारचे प्रतिबंध अाहेत. डेन्मार्कमध्ये सात हजार नावांची यादी असते. त्यातून एक नाव निवडावे लागते. साैदीतही ५०हून अधिक नाव ठेवण्यास बंदी अाहे.


अापण लवकर शिक्षण सुरू करताे
जन्मानंतर अामचे शिक्षण सुरू हाेते. भारतात साडेतीन वर्षांची असतानाच मुले केजीचे शिक्षण घेऊ लागतात. प्री-स्कूल वा नर्सरीचे शिक्षण तर अडीच वर्षांतच सुरू हाेते. युराेपात सर्वात चांगले शिक्षण फिनलंडमध्ये अाहे. तेथे मुले सात वर्षांची झाल्यावर शाळेत जाण्यास सुरुवात करतात. इंग्लंड, स्काॅटलंड व वेल्समध्ये मुले पाच वर्षांची झाल्यावर शिक्षण सुरू हाेते. तसेच स्पेन, जर्मनी व फ्रान्सदेशांत शिक्षणाचे वय सहा वर्षांपर्यंत अाहे.


अमेरिकी तरुणांच्या अगाेदर लग्न
भारतात लग्नाचे सरासरी वय २२.८ वर्षे अाहे. अापल्या देशात मुलास नाेकरी लागताच त्याचे अाई-वडील त्याच्या लग्नाची तयारी करणे सुरू करतात. विदेशात उशिरा लग्न करण्याची पद्धत अाहे. जर्मनीत करिअरच्या काही काळानंतर लग्नाची बाेलणी केली जाते. तेथे लग्नाचे सरासरी वय ३३.१ वर्षे अाहे. चीनमध्ये हेच वय २५.३, अमेरिकेत २७.९ व जपानमध्ये ३०.५ अाहे. इंडाेनेशियात ते २१.९ वर्षे अाहे.


ब्राझीलमध्ये प्रथम मतदानाचा हक्क
भारतात पूर्वी सर्वांना २१ वर्षे वय झाल्यानंतर मतदानाचा अधिकार मिळत हाेता; परंतु १९८८मध्ये ही मर्यादा १८ वर्षे करण्यात अाली. हे एक याेग्य वय मानले जाते. अर्जेंटिना, अाॅस्ट्रिया व ब्राझीलसारख्या देशांत १६ वर्षे वयातच मतदानाचा अधिकार दिला जाताे. तसेच इंडाेनेशिया, दक्षिण काेरिया अादी देशांत हा अधिकार १७ वर्षे वय झाल्यानंतर मिळताे. तैवानमध्ये २० वर्षे, मलेशिया, सिंगापूर, साैदी अरब अादी देशांत ही मर्यादा २१ वर्षेे अाहे.


कमी सक्रिय असतात भारतीय
भारतीय नागरिक फारच कमी सक्रिय राहतात. अापण राेज सरासरी ४,२९७ पावलेच चालताे. देशातील ३९.२ काेटी नागरिक निष्क्रिय राहतात. तसेच ५० % मुले वाहनांतून शाळेत जातात. चीनचे नागरिक भारतीयांपेक्षा अधिक सक्रिय राहतात. ते राेज ६,१८९ पावले चालतात. जपानमध्ये ही अाकडेवारी ६०१०, तर अमेरिकेत ४,७७४ अशी अाहे. जर मनुष्य राेज सात हजार पावलांपेक्षा अधिक चालत असेल, तरच ताे सक्रिय मानला जाताे.  जगभरात कमी जण असे करतात.

बातम्या आणखी आहेत...