Home | Divya Marathi Special | 32 new varieties of onion and garlic have been developed

कांदा-लसणाची 32 नवी वाणं विकसित, 16 मंजूर; 200 शेतकऱ्यांचे मार्गदर्शन शिबिर

प्रतिनिधी | Update - Jan 04, 2018, 02:00 AM IST

शेतीतील उत्पादन वाढून चांगल्या गुणवत्तेच्या बीजनिर्मितीसाठी संशोधन अव्याहतपणे सुरू असून चांगली गुणवत्ता असणारे कांदा व

 • 32 new varieties of onion and garlic have been developed

  कसबे सुकेणे- शेतीतील उत्पादन वाढून चांगल्या गुणवत्तेच्या बीजनिर्मितीसाठी संशोधन अव्याहतपणे सुरू असून चांगली गुणवत्ता असणारे कांदा व लसूण यांचे बीज राष्ट्रीय बागवानी प्रतिष्ठानने विकसित केले आहे. कांद्याचे सोळा तर लसणाचे सोळा असे ३२ वाण विकसित केले असून, यातील १० कांदा वाण व लसणाच्या ६ वाणांना भारत सरकारने मान्यता दिली आहे, असे प्रतिपादन एनएचआरडीएफचे संचालक डॉ. पी. के. गुप्ता यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय बागवानी अनुसंधान आणि विकास प्रतिष्ठान या संस्थेला ४० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल चितेगाव येथील केंद्रात कांदा, लसूण आणि बटाटा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन दिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी डाॅ.गुप्ता बोलत होते. अध्यक्षस्थानी द्राक्ष निर्यायदार संघाचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे होते. व्यासपीठावर नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील, एनएचआरडीएफचे संचालक संजय होळकर, यू. बी. पांडे, डॉ. एस. आर. भोंडे उपस्थित होते. डाॅ. गुप्ता पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी कांदा, लसूण व बटाटा या पिकांचे उत्पादन दुपटीने कसे वाढेल असा प्रयत्न करावा. राजस्थानात पाण्याची कमतरता असल्याने कांद्याची गुणवत्ता मिळत नाही.


  त्यामुळे तिथे लाल कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांचे अशाच प्रकारचे शिबिर घेतले जाणार असल्याचे सांगितले आणि एखाद्या पिकाला भाव मिळाल्यावर सर्वच शेतकरी तेच पीक घेतात. असे न करता वेगवेगळी पिके घ्यावीत, असा सल्लाही त्यांनी दिला. नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील म्हणाले की, गेल्या २२ महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकरी तोट्यात कांदा विकत आहे,


  लाल कांद्याचे नवे वाण विकसित
  एनएचआरडीएफचे माजी सदस्य यू. बी. पांडे म्हणाले की, इंदिरा गांधी पंतप्रधान असताना कांद्याचे भाव पडले. त्यावर उपाययोजना करताना त्यावेळी ही संस्था स्थापन करण्यात आली. यापुढे लाल कांदाही साठवता येईल अशाप्रकारचे वाण (NHRDF --red) विकसित केले आहे. उत्तर भारतात लाल कांद्याला चांगली पसंती आहे. राजस्थानमध्ये १८ हजार क्षेत्रावर कांदा पीक घेतले जाते, असे ते म्हणाले.


  सेंद्रिय शेती करण्याचे अावाहन
  या शिबिराला महाराष्ट्रासह राजस्थानातून आलेल्या २०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. चितेगाव केंद्राचे आर. के. सिंग यांनी सूत्रसंचालन केले. तर शिल्पा फासे यांनी आभार मानले. अध्यक्षीय मनोगतात जगन्नाथ खापरे यांनी रासायनिक खतामुळे जमीन खराब झाली असून, सेंद्रिय खते वापरून शेती करावी असे आवाहन केले.

Trending