आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यावर पाच दशके राज्य करणारी ‘रुप की राणी’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केवळ बॉलीवूडच नव्हे तर तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटसृष्टीची आपल्या अभिनयाने सुमारे ५० वर्षे सेवा करणाऱ्या प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवीचे शनिवारी मध्यरात्री हृदयक्रिया बंद पडून अबुधाबी येथे निधन झाले.  बॉलीवूडची पहिली सुपरस्टार म्हणून खिताब मिळवणाऱ्या श्रीदेवी यांचा जन्म १३ ऑगस्ट १९६३ रोजी तामिळनाडूत झाला.  वयाच्या पाचव्या वर्षापासून तिने चित्रपटात काम करणे सुरू केले. १९६७ च्या कंदनकरुनईमध्ये त्यांनी प्रथमच चेहऱ्याला रंग लावला, जो शनिवारी रात्री दुबईत एका लग्नात उपस्थित राहीपर्यंत कायम होता. तिच्या अभिनयाचा तामिळ सरकारने सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून सर्वप्रथम पुरस्कार देऊन गौरव केला होता. त्यानंतर श्रीदेवी यांनी अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने चित्रपटसृष्टीत स्वतःचा वेगळा असा ठसा फक्त उमटवला नाही  तर दबदबा निर्माण केला होता. १९७८ मध्ये ‘सोलवा सावन’मधून बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तामिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटात त्यांनी आपला दबदबा निर्माण केला होता. आता तिला बॉलीवूड खुणावत होते. ‘सोलवा सावन’ चालला नाही. त्यानंतर काही चित्रपट केले, परंतु त्यांना यशाची चव चाखण्यासाठी जितेंद्रबरोबरच्या ‘हिंमतवाला’ चित्रपटापर्यंत पाच वर्षे वाट पाहावी लागली.  त्यानंतर श्रीदेवीच्या करिअरची गाडी भरधाव सुटली ती थेट ‘जुदाई’लाच थांबली. यादरम्यान ज्युली, जाग उठा इन्सान, आखरी रास्ता, सदमा, मिस्टर इंडिया, नगीना, निगाहें, चालबाज, लम्हे, खुदा गवाह, कर्मा, चांदनी, रूप की रानी चोरों का राजा, लाडला, आर्मी, चांद का टुकडा, चंद्रमुखी अशा अनेक चित्रपटांमधून तिने भूमिका साकारल्या. चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरवही झाला हाेता.

 

...म्हणून नाकारला अनिल कपूरसोबत ‘बेटा’  
अनिल कपूर आणि श्रीदेवीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडत असे, त्यामुळे निर्माते या दोघांना एकत्र आणत असत. ‘बेटा’ चित्रपटासाठी अनिल कपूरसोबत श्रीदेवीला घेण्यात येणार होते, परंतु अनिलचा मोठा भाऊ बोनीशी लग्न झाले असल्याने दिराबरोबर काम नको म्हणून श्रीदेवीने तो चित्रपट नाकारला हाेता. मग तिच्या जागी माधुरी आली आणि चित्रपटही सुपरहिट ठरला. 

 

माधुरी दीक्षितशी होती स्पर्धा  
श्रीदेवीच्या  सुपरस्टारपदाला छेद देण्याचा प्रयत्न अनेक नायिकांनी केला, परंतु त्यात यश फक्त माधुरी दीक्षितला मिळाले. जयाप्रदाही थेट दक्षिण भारतातूनच श्रीदेवीप्रमाणे बॉलीवूडवर राज्य करण्यास आली होती, परंतु अयशस्वी ठरली. अनिल कपूरबरोबर चित्रपट करण्यास माधुरी आणि श्रीदेवीमध्ये स्पर्धा लागत असे. मोठे बॅनर, कलाकार, दिग्दर्शक श्रीदेवी किंवा माधुरीचाच विचार करीत. या दोघींना एकत्र आणण्याचे अनेक वेळा अयशस्वी प्रयत्न झाले. “झलक दिखला जा’ या रिअॅलिटी शोमध्ये मात्र या दोघींनी एकत्र नृत्य केले होते.  

 

कार्डियाक अरेस्टने मृत्यू झाल्याचे कळताच चाहत्यांना धक्का   
श्रीदेवी यांचे कार्डियाक अरेस्टने निधन झाल्याची बातमी आली आणि चाहत्यांना धक्काच बसला. सडपातळ बांधा, आटोक्यात असलेले वजन असे असूनही श्रीदेवी यांना हार्टअटॅक कसा आला, असा प्रश्न सगळ्यांना पडला. मात्र हार्टअटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये खूप फरक अाहे. हृदयविकारात कोरोनरीत  ब्लॉकेजेस आढळून येतात तर कार्डियाक अरेस्ट अनेक कारणांनी येतो आणि त्याची लक्षणेही जाणवत नाहीत. याला वय, वजन याचे काही बंधन नाही. अचानक हृदय रक्त पंप करणे बंद करतो आणि काही क्षणांतच व्यक्ती मृत्युमुखी पडते. याची काही कारणे अशी आहेत-  कोरोनरी हृदयाचा आजार, कार्डियोमायोपॅथी, कॉनजेनिटल हृदयाचा आजार, हृदयाच्या व्हॉल्व्हमध्ये अडचण. याशिवाय विजेचा शॉक लागणे, मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज घेणे, ब्रेन हॅमरेज होणे किंवा पाण्यात बुडणे यामुळेही कार्डियाक अरेस्टचा झटका येऊ शकतो, असे डाॅक्टरांचे मत अाहे.  

 

बाॅलीवूड शाेकाकुल...
बाॅलीवूडची ख्यातनाम अभिनेत्री श्रीदेवी हिच्या निधनाने संपूर्ण बाॅलीवूडवर शाेककळा पसरली अाहे. अनेक चित्रपट तारे- तारकांनी तिच्या निधनाबद्दल शाेक व्यक्त करून जुन्या अाठवणींना उजाळा दिला.  


श्रीदेवीच्या निधनाबद्दल शाेक व्यक्त करत अक्षयकुमार म्हणाला, ‘त्यांच्या अाकस्मिक निधनाचे वृत्त एेकून धक्काच बसला. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी अाहे.’  


अजय देवगण म्हणाला, ‘श्रीदेवी ही खराेखरच एक अायकाॅन अभिनेत्री हाेती. तिच्या निधनाच्या बातमीवर अजूनही विश्वास बसत नाही.’  


काजाेल म्हणाली, ‘श्रीदेवींच्या निधनाचे वृत्त एेकून धक्काच बसला. ती स्वत: अभिनयाची पाठशाळाच हाेती. त्यांच्याकडून अाम्हा कलाकारांना खूप काही शिकायला मिळाले.’  


मनीषा काेईराला म्हणाली, ‘खरे तर श्रीदेवींचे हे काही जाण्याचे वय नव्हते. माेस्ट ग्लॅमरस अाणि हुशार अभिनेत्रींमध्ये त्यांची गणना हाेते. मी त्यांच्या प्रत्येक सिनेमाच्या प्रतीक्षेत असायचे. माझ्या अावडत्या अभिनेत्रींमध्ये ती अग्रस्थानी हाेती.’  


बाेमन इराणी म्हणाले, ‘सकाळी उठताच श्रीदेवीच्या निधनाचे धक्कादायक वृत्त कळले अाणि त्यावर विश्वासच बसला नाही. बाेनी कपूर व त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात अाम्ही सहभागी अाहाेत.’ 

 

- १९७६ मध्ये श्रीदेवीसाेबत ‘मुंदरू मुदिचू’ हा हिट तामिळ सिनेमा देणारा अभिनेता रजनीकांतलाही श्रीदेवीच्या निधनामुळे धक्का पाेहाेचला. ‘चालबाज’ चित्रपटातही या दाेघांची जाेडी गाजली हाेती.   
- नगीना, चांदनी, बंजारन, गुरुदेव, काैन सच्चा काैन झूठा अादी चित्रपटांत श्रीदेवीसाेबत काम करणारा अभिनेता ऋषी कपूरने टि्वट केले, ‘ही बातमी फारच धक्कादायक अाहे. अाम्ही सगळे दु:खात अाहाेत.’ इतकेच नव्हे तर दु:खात बुडालेेल्या ऋषी कपूरने अापल्या टि्वटर अकाउंटरवरून स्वत:चा फाेटाे काढून ही जागा रिकामी साेडली हाेती.  
- धर्मेंद्रने सांगितले, ‘श्रीदेवींबाबत व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत. तिच्या निधनाने संपूर्ण बाॅलीवूडवर शाेककळा पसरली अाहे. शूटिंगदरम्यान अाम्ही हसत खेळत वेळ घालवायचाे. सध्या मात्र माझ्या ताेंडून शब्द बाहेर येत नाहीत, फक्त अश्रूंना वाट माेकळी करून देताेय.’  
- श्रीदेवीसाेबत काही चित्रपटांत नायकाची भूमिका वठवणारा कमल हसन म्हणाला, ‘एक किशाेरवयीन अभिनेत्री ते सशक्त तरुण अभिनेत्री हा श्रीदेवीचा संपूर्ण प्रवास मी पाहिला अाहे. तिच्यासाेबत घालवलेला प्रत्येक क्षण अाता चित्रपटाच्या पडद्यासारखा डाेळ्यासमाेर तरळून जात अाहे. तिची अाठवण कधीही मनातून जाणार नाही.’

बातम्या आणखी आहेत...