आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणापासून ते कार्यस्थळापर्यंत दृष्टिकोनात होत आहे बदल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केटी स्टीनमेज- तरुणांची नवी पिढी म्हणजेच जनरेशन झेड विविध समस्यांदरम्यान लहानाची माेठी झाली अाहे. या पिढीने अार्थिक मंदीदरम्यान अापल्या सहकाऱ्यांचा राेजगार (नाेकरी) हिरावला जात असताना पाहिलेय, अापल्या माेठ्या भाऊ-बहिणींना विद्यार्थी-शिक्षण कर्जाखाली दबले जाताना पाहिलेय, नवीन तंत्रज्ञानाच्या येण्याने जुन्या तंत्रज्ञानास इतिहासजमा हाेताना पाहिलेय व जुन्या पिढ्यांप्रमाणे अर्थव्यवस्था तथा लाेकशाहीवरही प्रश्न उपस्थित केले अाहेत. अाता ही पिढी प्राैढत्वाकडे जात असताना नवीन प्रयाेग करून अापले साहस दाखवत अाहे.


कल्चर काे-अाॅप. या संशाेधन संस्थेच्या सर्वेक्षणानुसार जनरेशन झेडच्या ७८ % तरुणांचे मत अाहे की, चार वर्षांची पदवी घेण्यात अाता काही विशेष फायदा नाही. त्यामुळे ते अॅप्रेंटिसशिपपासून बूट कॅम्पपर्यंतच्या पर्यायांना स्वीकारत अाहेत. त्यांच्यासाठी नवे मार्ग खुले हाेताहेत. सर्व्हेनुसार तरुण पिढी ‘वर्क फाॅर पे’साठीही पारंपरिक पद्धती स्वीकारत नसल्याचे दिसते. गतकाळाप्रमाणे तरुणवर्ग चित्रपटगृहांबाहेर तिकिटे विकताना दिसण्याची शक्यता नाही; परंतु घरात बसून लाेकप्रिय यू-ट्यूब चॅनल सादर करू लागला अाहे. सर्व्हेच्या निष्कर्षांनुसार १३ ते २२ वयाेगटातील ६० % तरुण काेणत्याही प्रकारचे फ्रीलान्सिंग करत अाहेत. तरुणांची ही पिढी जगास अापल्या स्मार्टफाेनच्या माध्यमातून पाहते व कमी वयातही स्वत:च्या अस्तित्वाविषयी सतर्क अाहे. कार्यस्थळीदेखील या पिढीचा प्रभाव दिसू लागला अाहे. ही पिढी काम करत असताना हेडफाेन लावते व संवादासाठी चॅटरूमची मदत घेते. याबाबत तज्ज्ञांचे मत अाहे की, नव्या पिढीची लिखाणाची क्षमता वा भावनात्मक मजबुती भलेही जुन्या पिढीसारखी नसेल; परंतु चालता-फिरता नवे काैशल्य कसे शिकले जाते, हे ती जुन्या पिढीला सांगू शकते. तसेच या प्रवाहात सामील हाेणाऱ्या तरुणी समान वेतनाची मागणी करू लागल्या असून, ते त्यांना मिळत असल्याचे काही संशाेधनांतून स्पष्ट झालेय. नवीन पिढी प्रत्येक बाबीत विविधतेची अपेक्षा ठेवते, असे फेसबुकचे मानव संसाधन विभागप्रमुख लाेरी सांगतात. अाॅनलाइन माध्यमांतून कधीही नवीन शिकू शकते. एकाच कामावर ते कायम राहू इच्छित नाही, असेही लाेरी यांना वाटते.


पूर्वीच्या पिढीने अशा कालखंडाचा प्रारंभ केला, ज्यात करिअरचे एकाहून अधिक पर्याय स्वीकारणे ही सामान्य बाब बनली. जनरेशन झेड या सर्व पर्यांयांना एकाच वेळी अाजमावण्याच्या बाजूने अाहे. व्हर्च्युअल कार्यस्थळांच्या वाढत्या लाेकप्रियतेमुळे हे शक्य अाहे. ते चुकतात; परंतु चुकांना यशाच्या मार्गातील अडसर बनू देऊ इच्छित नाहीत. ही बाब अांत्रप्रेन्यूर्सना विशेष लागू हाेते. जनरेशन झेडमधील ६१ % तरुण अागामी ५ वर्षांत स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे वा स्वतंत्रपणे काम करण्याचे नियाेजन करत अाहेत.

बातम्या आणखी आहेत...