आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीनंतर जागा कमी पडल्या तर राजकारणातही सीझफायर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सकाळपासून हाजी काहीतरी इशारे करत होते. मी म्हणालो, ‘अहो हाजी, सकाळपासून ही नवी नौटंकी काय लावलीये?’ हाजींनी प्रथमच तोंड उघडले, ‘ही नौटंकी नाही, आमचे-तुमचे सीझफायर  (युद्धबंदी) आहे महाकवी.’ मी म्हणालो, ‘चर्चा बंद करण्याला सीझफायर म्हणत नाहीत.’ हाजी चपापले, ‘हे तर मलाही माहिती आहे, मात्र भांडण टाळण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे चर्चाच टाळायची.’ मी म्हणालो, ‘हाजी, नशीब समजा पत्नी नाही.

 

नाहीतर कळाले असते की काही भांडणांत चर्चा होणे न होणे याला महत्त्वच नसते.’ या गृहयुद्धाबाबत शून्य अनुभव असलेल्या हाजींनी हा मुद्दा टाळला. म्हणाले, ‘म्हणजे उदाहरणार्थ भारत-पाकिस्तान.’ मी पण चेंडू पकडलाच. म्हणालो, ‘तुम्हाला तर याबद्दल अधिक माहिती असेल. कारण विवाहोत्सुक अनेक पाकिस्तानी ग्राहक तुमच्याकडे येत असतील?’ दीर्घ उसासा टाकून हाजी म्हणाले, ‘येतात नव्हे, येत होते महाकवी.

 

मात्र, हल्ली तिकडून तोफगोळे-दारूगोळा सोडले तर बाकी काही येत-जात नाही.’ मी म्हणालो, ‘युद्धबंदीच्या काळात तरी जा-ये असेल ना?’ हाजी म्हणाले, ‘हो, सीझफायर तर आपल्या लष्कराकडून असते. तिकडे दिवसा जे लष्करी वेशात युद्धबंदीच्या घोषणा करतात तेच रात्री दहशतवाद्यांच्या रूपात गोळीबार करतात.’ मी म्हणालो, ‘म्हणजे, इकडून सीझ आणि तिकडून फायर.’ मी मुद्दाम हाजींना खिजवले, ‘हाजी मला सांगा, सीझफायरची घोषणा होते तेव्हाही गोळीबार सुरूच असतो. याची दखल घेणारे कुणी नाही का? पाकिस्तानने जबाबदारी घ्यायला हवी.’ हाजी तज्ज्ञ अभ्यासकासारखे म्हणाले, ‘वेड्याचे सांेग घेऊ नका महाकवी. ज्यांनी दखल घ्यायची तेच लढवत आहेत हे जणू तुम्हाला माहितीच नाही.

 

सर्वांची आपापली दुकानदारी आहे.’ हळूच डोळे मिचकावून म्हणाले, ‘तसा पाकिस्तान खूप जबाबदार देश आहे. जगात कुठेही स्फोट होवो, पाकलाच जबाबदार धरले जाते.’ मी पण हाजींचा उद्देश ओळखून म्हणालो, ‘खरे आहे हाजी, हे फायर-सीझफायर स्क्रिप्टेड नाटकासारखे वाटते. दोन्हीकडील तरुण मरतात आणि पडद्यामागे तिसऱ्या शक्तीची दुकानदारी चालू राहते.’ हसून हाजी म्हणाले, ‘म्हणजे, ही लढाई-भांडण तुम्ही आणि भाभींमधील भांडणासारखे चालूच राहील.’ हाजीकडून मला अशा प्रतिक्रियेची अजिबात अपेक्षा नव्हती. मी म्हणालो, ‘बरे आहे हाजी तुम्ही या भांडणातून वाचलात. नाहीतरी काडतुसे मोजण्यातच आयुष्य गेले असते.’ आता हाजी माझ्या कानाजवळ येत म्हणाले, ‘महाकवी, तुम्ही तर अनुभवी आहात. घरात खरेखुरे सीझफायर होऊ शकत नाही का?’

 

मी म्हणालो, ‘होते ना, श्रीमतीजींना शॉपिंगला जायचे असते तेव्हा त्यांच्याकडून सीजफायर असते आणि ऐन टीव्हीवरील मालिकेच्या वेळी भारत-पाक मॅच असते तेव्हा माझ्या बाजूने.’ हाजींनी पुन्हा एकदा पट्टी बदलली. ‘म्हणजे, राजकीय पद्धत. तसे राजकारणात कधी सिजफायर होत नसते का?’ मी म्हणालो, ‘होते ना, मात्र निवडणुका झाल्यावर विशेषत: सत्तास्थापनेसाठी जागा कमी पडू लागल्या की सीजफायर होते. अशा वेळी सर्व शकुनींना कौरवांमध्ये युयुत्सु दिसू लागतात आणि सर्व अर्जुन गांडिव धनुष्य झुकवून हाता कबुतरे घेऊन उभारल्याचे दिसू लागते. ’ हाजी म्हणाले, ‘म्हणजे काय तर सीजफायर केवळ संभ्रम आहे. ते होत कुठेच नाही... फक्त शब्दकोशात एक ओळ खाणारा तो जुगाड आहे.’
भाई हो बिछुडे हुए, भाई रहो,
भीख की ऐंठ से मिलेगा क्या?
चांद तक तुम हजारे साथ चलो,
फकत घुसपैठ से मिलेगा क्या?

बातम्या आणखी आहेत...