Home | Divya Marathi Special | divya marathi survey on Four years of Modi government's work

80% लोकांचे मत : नराधमांना फाशी हा चांगला निर्णय, मात्र महागाई वाढल्याने, नोकऱ्या न मिळाल्याने 54% निराश

दिव्य मराठी | Update - May 18, 2018, 02:20 AM IST

मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कामकाजावर देशातील सर्वात मोठ्या सर्व्हेचा निकाल आला आहे. ‘भास्कर/दिव्य मराठी’च्या सर्व्हेत

 • divya marathi survey on Four years of Modi government's work

  दिव्य मराठी - मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कामकाजावर देशातील सर्वात मोठ्या सर्व्हेचा निकाल आला आहे. ‘भास्कर/दिव्य मराठी’च्या सर्व्हेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढल्याचे समोर आले आहे. मात्र, वाढती महागाई आणि नोकऱ्यांतील घट सामान्य माणसाच्या नाराजीचे सर्वात मोठे कारण ठरले आहे. सर्व्हेत भाग घेणाऱ्या ७०% लोकांनुसार मोदी अजूनही लोकप्रिय आहेत. त्यापैकी ४७% नुसार तर ते सध्या २०१४ पेक्षाही जास्त लोकप्रिय आहेत. महागाई आणि नोकऱ्यांतील घट यांना ५४% लोकांनी सरकारचे सर्वात मोठे अपयश मानले आहे.


  १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीच्या निर्णयाचे ८०% नी स्वागत केले आहे. ८५% लोकांचे मत आहे की,मोदी २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत पुन्हा सरकार स्थापन करतील. ५३% च्या मते, विरोधक एकजूट झाले तरीही ते मोदींना हरवू शकणार नाहीत. एकूणच विचार केल्यास मोदींच्या चार वर्षांत सर्वात मोठे काम सर्जिकल स्ट्राइक होते. सर्वाधिक ८२ टक्के लोकांनी ते चांगले असल्याचे म्हटले. एका इतर प्रमुख प्रश्नाच्या उत्तरात ५२% लोकांनी म्हटले की, राहुल गांधी पूर्वीपेक्षा जास्त परिपक्व झाले आहेत. मात्र, त्यापैकी २२% च लोक असे मानतात की ते मोदींना लढत देऊ शकतात. तिहेरी तलाक संपवल्याने मोदींनी मुस्लिमांचा विश्वास संपादन केला आहे. ६८% लोकांच्या मते या मोठ्या पावलामुळे मोदींनी मुस्लिम महिलांचा विश्वास संपादन केला आहे.

  तुमच्या विश्वासाला मोदी सरकार किती पात्र ठरले?

  * स्वच्छ भारत सर्वात चांगली योजना

  90% लोक मानतात ‘स्वच्छ भारत’ला सर्वात चांगली

  * विदेशात प्रतिष्ठा सर्वात मोठे यश

  56% लोक मानतात की जगात भारताची प्रतिष्ठा वाढली

  देशाच्या भविष्याशी संबंधित पाच सर्वात महत्त्वाचे प्रश्न...

  23% लोक मानतात मोदी 2014 प्रमाणेच आजही तेवढेच लोकप्रिय

  1) मोदींची लोकप्रियता 2014 च्या तुलनेत वाढली का?

  47% लोकांच्या मतेपंतप्रधान नरेंद्र मोदी आधीपेक्षा जास्तलोकप्रिय झाले आहेत.

  23% लोकांनी म्हटलेनरेंद्र मोदी आजही पूर्वीएवढेच लोकप्रिय.

  30% नी म्हटले मोदींची लोकप्रियता २०१४च्या तुलनेत घटली आहे.

  51% विद्यार्थ्यांनी म्हटले : मोदींची लोकप्रियता पूर्वीपेक्षा वाढली {मात्र, २०१७ च्या सर्व्हेत मोदींना ८ ते १० गुण देणारे १८ ते २५ वर्षांचे ६५% युवक होते. या सर्व्हेत ५९% युवकांनीच मोदींना ८ किंवा त्यापेक्षा जास्त गुण दिले आहेत.

  जेथे भाजप नाही

  पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, तेथे सर्वाधिक ४४% लोकांनी म्हटले : मोदी पूर्वी होते तेवढे लोकप्रिय नाहीत. टीआरएसशासित तेलंगणात ४३ टक्के लोकांनी म्हटले : मोदी पूर्वीसारखे लोकप्रिय नाहीत.

  39% शेतकरी म्हणतात, मोदींची लोकप्रियता २०१४ च्या तुलनेत घटली.

  2) राहुल आता मोदींना लढत देताना दिसतात का?

  48% लोक म्हणाले ते जसे होते, तसेच आहेत. मोदी आणि त्यांच्यात स्पर्धा नाही.

  30% ते परिपक्व झाले, मोदींना लढत देऊ शकत नाहीत.

  22% राहुल परिपक्व झाले, मोदींना लढत देऊ शकतात.

  युवक : ४५ पेक्षा कमी वयाचे ४७% लोक म्हणाले : राहुल जसे होते तसेच आहेत

  महिला : फक्त २९% ना वाटते की राहुल हे मोदींना लढत देऊ शकतात.

  ज्येष्ठ: ५५% चे मत आहे की, राहुल जसे होते तसेच आहेत. ते मोदींना लढत देऊ शकत नाहीत.

  जेथे भाजप - भाजपचे सरकार असलेल्या आसाममध्ये ७७% लोक मानतात की राहुल परिपक्व आहेत, ते मोदींना लढत देऊ शकतात.

  जेथे काँग्रेस - पंजाबमध्ये २८% लोक मानतात की राहुल परिपक्व झाले आहेत, ते मोदींना लढत देऊ शकतात.

  3) विरोधक 2019 च्या निवडणुकीत एकजूट होऊन मोदींना हरवू शकतील का?

  53% नी म्हटले विरोधक एकजूट झाले तरीही ते जिंकू शकणार नाहीत.

  24% च्या मते, तर विरोधकांची एकजूटच होणार नाही.

  23% नी म्हटले, विरोधक एकजूट होऊन मोदींना हरवू शकतात.

  कर्नाटक : जेथे अलीकडेच भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष
  येथे ३०% लोकांच्या मते, हरवणे तर दूर, विरोधक एकजूटही होऊ शकणार नाहीत.

  उत्तर प्रदेश

  जेथे महाआघाडीचा प्रयोग करून लोकसभेच्या पोटनिवडणुकीत विरोधकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीच गोरखपूर जागा जिंकली, तेथेही...

  48% च्या मते विरोधक एक झाले तरी मोदींना हरवू शकणार नाहीत.

  27% च्या मते २०१९ मध्ये विरोधक एक होऊन मोदींना हरवू शकतात.

  सर्वाधिक 37% आंध्र प्रदेशच्या लोकांच्या मते, विरोधक एक होऊन मोदींना हरवू शकतात.

  जेथे भाजपचे सरकार - 76% लोक आसाममधील मानतात की विरोधक एकत्र झाले तर ते मोदींना पुढील निवडणुकीत हरवू शकतात.

  * 62% म्हणाले- मोदी सरकार बनवतील, 23% म्हणाले-आघाडी करून बनवतील

  4) 2019 च्या निवडणुकीत मोदी पुन्हा सरकार बनवतील?

  62% लोक म्हणाले मोदी पुन्हा सरकार स्थापन करतील.

  23% च्या मते, आघाडी करून सरकार बनवतील.

  15% लोक म्हणाले की, मोदी पुन्हा सरकार स्थापन करू शकणार नाहीत.

  85% च्या मते,२०१९ मध्ये मोदी सरकार स्थापन करतील. गेल्या वर्षीच्या भास्कर सर्व्हेतही याच प्रश्नावर ९१% लोकांनी हेच उत्तर दिले होते.

  * उत्तर भारत ६२% नी म्हटले, मोदी स्वबळावर सरकार स्थापन करतील.

  * पूर्व भारत ५७% नी म्हटले-मोदी स्वबळावर सरकार बनवतील

  * पश्चिम भारत या राज्यांच्या ६४% लोकांनुसार,मोदी आघाडीशिवाय
  सरकार बनवतील.

  * मध्य भारत ६१.५ % च्या मते, मोदींचे स्वबळावर सरकार.

  5) मोदी मुस्लिमांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी ठरले का?

  68% च्या मते यशस्वी ठरले, तीन तलाक संपवून महिलांचा विश्वास जिंकला.

  21% लोकांच्या मते : नाही, मोदींना यश मिळाले नाही.

  11% ना मुस्लिमांचा उल्लेख करतात, ना काळजी.

  जेथे मुस्लिम मतदार जास्त
  64% लोकांना (जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, आंध्र, तेलंगण, बंगाल आणि बिहार) वाटते की, मोदींनी तीन तलाक संपवून महिलांचा विश्वास जिंकला आहे.

  गुजरातमध्ये - मोदींच्या गृहराज्यात ७३ टक्के लोकांना असे वाटते की, त्यांनी तीन तलाक संपवून मुस्लिम महिलांचा विश्वास जिंकला आहे.
  आसाममध्ये - ७७% लोकांच्या मते पंतप्रधान मोदी आतापर्यंत मुस्लिमांचा विश्वास जिंकू शकले नाहीत. ४ टक्के लोकांच्या मते, मोदी ना त्यांचा (मुस्लिमांचा) उल्लेख करतात, ना त्यांची काळजी करतात.

  पुढील स्लाईड वर वाचा सर्वेक्षणातील आणखी काही प्रश्न ...

  हेहि वाचा, ज्या 3 राज्यांत या वर्षी निवडणूक होणार, ते सर्व्हेत काय म्हणतात?

 • divya marathi survey on Four years of Modi government's work

  6) सर्वाधिक २८% नागरिकांनी म्हटले, व्यापारी, उद्योजकांना सरकारवर विश्वास कमी. 

   

  7) सर्वाधिक ३२% लोकांनी म्हटले, सामान्य जनतेचा विश्वास  जिंकला. 

   

  आणखी प्रश्न पुढील स्लाईड वर 

 • divya marathi survey on Four years of Modi government's work
 • divya marathi survey on Four years of Modi government's work
 • divya marathi survey on Four years of Modi government's work
 • divya marathi survey on Four years of Modi government's work
 • divya marathi survey on Four years of Modi government's work

Trending