आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्या 3 राज्यांत या वर्षी निवडणूक होणार, ते सर्व्हेत काय म्हणतात?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजस्थानमध्ये २४%, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये २१% लोक मानतात की, राहुल पूर्वीपेक्षा परिपक्व झाले असून ते मोदींना लढत देऊ शकतात. - Divya Marathi
राजस्थानमध्ये २४%, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये २१% लोक मानतात की, राहुल पूर्वीपेक्षा परिपक्व झाले असून ते मोदींना लढत देऊ शकतात.

दिव्य मराठी -  सर्व्हे   जसा देशाचा मूड दाखवतो, तसाच तो  या वर्षी विधानसभा निवडणूक होणाऱ्या तीन राज्यांसाठीही महत्त्वाचा ठरतो.  राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांत भाजपची सरकारे आहेत. सर्व्हेत जो कल समोर आला आहे त्यातून स्थानिक मुद्द्यांवर लोकांचे मतही समजू शकते. उदाहरणार्थ, सरकारी आकड्यांनुसार, ज्या मध्य प्रदेश आणि राजस्थानात अत्याचाराच्या सर्वाधिक घटना समोर येतात, तेथे ८२% लोकांनी १२ वर्षांखालील मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोषींना फाशीसारखा कठोर निर्णय हे चांगले पाऊल मानले आहे. 

 

सर्व्हेत सहभागी ३३% शेतकऱ्यांनी म्हटले की, मोदी सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात अपयशी ठरले आहे. या तीन राज्यांतही शेतकऱ्यांचा मुद्दा सर्वात चर्चेचा आहे. मध्य प्रदेशात २०%, राजस्थानमध्ये १८%, छत्तीसगडमध्ये १७% लोकांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखू न शकणे हे मोदी सरकारचे सर्वात मोठे अपयश मानले आहे.


अलीकडेच सुरू झालेल्या मोदींच्या आरोग्य योजनेवरही लोकांनी चांगली प्रतिक्रिया दिली. मात्र, आरोग्य योजनेची ज्या छत्तीसगडमधून सुरुवात झाली तिला या तीन राज्यांत सर्वात कमी यशस्वी (६७%) छत्तीसगडनेच मानले. राजस्थानात ६९% व म. प्र.त  ६८% लोकांनी ही योजना यशस्वी मानली. मोदी सरकारच्या कामकाजाचे मानांकन पाहिले तर...राजस्थानने देशाच्या सरासरी ८ गुणांपेक्षाही जास्त ९ गुण दिले आहेत. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशने देशाच्या कलानुसारच मोदींना गुण दिले आहेत. तिन्ही राज्यांत राजस्थानच असे आहे, जेथे सर्वाधिक  ३७% नी मोदींना १० पैकी १० गुण दिले. गुजरातपेक्षाही जास्त, तेथे ३६% नी मोदींना परफेक्ट टेन दिले आहेत. 

 

राहुल गांधी परिपक्व झाले आहेत. ते मोदींशी मुकाबला करू शकतात.. असे मानणाऱ्यांमध्ये देशातील २२.१०% जनता असून एकूण सहभागी महिलांपैकी २६.५७% महिलांना असे वाटते. जसे होते तसे आहेत, असे वाटणाऱ्यांमध्ये ४८.०४% लोक अाहेत. देशातील सरासरीपेक्षा अधिक उद्योजकांचा कल चकित करणारा आहे. ५३.६६% उद्योजकांना वाटते की, राहुल पूर्वीसारखेच आहेत. ‘दिव्य मराठी’च्या मोदी सर्व्हेमध्ये महिला, ज्येष्ठ, उद्योजक व व्यावसायिकांनी महत्त्वाचे मत मांडले आहे.  


२०१४ च्या तुलनेत मोदींची लोकप्रियता वाढली अाहे का? ३०.०६% जनतेला वाटते की यात घट झाली. गृहिणी व उद्योजकांनी याला तुलनेने सकारात्मक उत्तर दिले. देशातील सरासरीच्या तुलनेत केवळ २५.१९% गृहिणी, २६.७८% उद्योजकांना वाटते की, मोदींची लोकप्रियता पूर्वीपेक्षा घटली आहे. सर्व्हेमध्ये भाग घेणाऱ्यांपैकी ४६.६१% लोकांच्या मते : मोदी २०१४ च्या तुलनेत अधिक लोकप्रिय झाले आहेत, तर व्यावसायिक पदवी घेणाऱ्यांमध्ये असे मानणारे कमी आहेत. ४१.९४% व्यावसायिक पदवीधारकांना वाटते की मोदी पूर्वीपेक्षा अधिक लोकप्रिय आहेत. 

 

सर्व्हेमध्ये मुस्लिमांचा विश्वास संपादन करण्याविषयी एक प्रश्न होता. देशातील ६८.०९% जनतेला वाटते की, तिहेरी तलाक बंदी करून मोदींनी मुस्लिम महिलांचा विश्वास संपादन केला आहे. यात नोकरदार महिला, गृहिणींच्या मतांमध्ये भिन्नता आहे. ६७.८६% नोकरदार महिलांना वाटते की, मोदींनी मुस्लिम महिलांचा विश्वास जिंकला, तर ७३.५९% गृहिणींना असे वाटते.  (हे देशातील सरासरीपेक्षा अंदाजे ५% अधिक आहे.)  महिलांना दररोज महागाईची तीव्रता जाणवते. त्यामुळे त्यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली. देशात ५४.१२% पुरूष महागाई घट आणि रोजगार वाढ याबाबत सरकार अपयशी ठरल्याचे मानतात, तर ५७.६७% महिलांना असे वाटते. 

 

असा झाला देशातील सर्वात मोठा सर्व्हे  

 

मो दी सरकारविषयी भास्कर समूहाचा हा चौथा सर्व्हे आहे. निवडणुकीला १ वर्ष असताना सर्व्हे झाल्याने याचा निष्कर्ष महत्त्वाचा आहे. पहिला सर्व्हे तरुणांवर आधारित होता. दुसरा 
सर्व्हे महिलांच्या मतांवर आधारित होता. २०१७ मध्ये भास्कर समूहाने मोदी 
सरकारच्या कामाविषयी देशातील सर्वात व्यापक सर्व्हे केला. या वर्षी २९ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांत हा सर्व्हे झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ३८% पेक्षा अधिक लोक यात सहभागी झाले. ७ दिवस सर्व्हे घेण्यात आला. २ लाख ८१ हजार २९२ वाचकांनी यात भाग घेतला. एखाद्या वृत्तपत्राने घेतलेल्या सर्व्हेतील हा सर्वात मोठा प्रतिसाद आहे.

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...