आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायग्रेन : ध्यान, याेगाद्वारे बरा हाेताे!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनशैलीच्या बदलाने मायग्रेनला प्रतिबंधित केले जाऊ शकते. जरी मायग्रेनचे नेमके कारण माहीत नाही, तरी कारक घटक ओळखून व त्यानुसार बदल करून वारंवारिता कमी करणे शक्य आहे. एका आकडेवारीनुसार, जगभरातील एक अब्ज लोकांना प्रभावित करणारा जगातील तिसरा सर्वात आढळणारा आजार म्हणजे मायग्रेन आहे. जे लोक मायग्रेनने आजारी आहेत, ते लोक हा आजार किती त्रासदायक आहे हे सांगू  शकतात. डोक्याची एकच बाजू, तर कधीकधी अख्खे डोके प्रचंड दुखते.  “मायग्रेनची व्याख्या सामान्यतः डोक्याच्या एका  बाजूस वारंवार होत असलेल्या तीव्र वेदना, अशी होऊ शकते. मात्र, सुमारे एक तृतीयांश मायग्रेनच्या झटक्यामध्ये दोन्ही बाजूंवर प्रभाव असतो. सर्व मायग्रेन सारखे नसतात. याचे सामान्य लक्षणं अशी असतात की, या वेदना मध्यम ते तीव्र वेदनादायक असतात, ते बहुधा डोक्याच्या एका बाजूला असते. यामुळे शारीरिक हालचाली करताना वेदना होतात. सारखे आजारी वाटणे आणि उलट्या होणे ही देखील लक्षणे या आजारात आढळतात.” 


“या लक्षणांनंतर मायग्रेनचे झटके सुरू होतात आणि मूड बदलत जातो. स्वभावामध्ये आणि भावनांमध्ये बदल होत जातो ज्यात कधीकधी जबरदस्त आणि
अत्यंत आनंदी भावना उत्पन्न होतात तर कधीकधी अतिशय थकल्यासारखे आणि उदासीन वाटते. “
मायग्रेन डोकेदुखीचे नेमके कारण सांगणे शक्य नाही. तथापि, हा परिणाम मज्जातंतू, रसायन आणि मेंदूतील रक्त प्रवाहातील तात्पुरत्या बदलामुळे
उद्भभवणाऱ्या असामान्य मेंदूचा कार्यामुळे होऊ शकतो. मायग्रेनग्रस्त व्यक्तीला एखाद्या गोष्टीची एलर्जी आणि एलर्जीच्या प्रतिक्रियां ( रिएक्शन) तेजस्वी आणि चकचकीत प्रकाश, विशिष्ट गंध, स्त्रियांचे ओले केस, सूर्याशी संपर्क, तापमानातील बदल; आणि शारीरिक किंवा भावनिक ताण यामुळे मायग्रेनचा झटका येऊ शकतो. मायग्रेन टाळण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे कोणत्या कारणामुळे  मायग्रेनचे झटके येतात ते ओळखणे आणि असे घटक टाळण्याचा प्रयत्न करणे. विशिष्ट नमुन्यांची नोंद करण्यासाठी नेहमी एक डायरी ठेवावी. “एक डायरी ठेवल्याने आपल्याला विशिष्ट मायग्रेन ट्रिगर (उद्दीपन) ओळखण्यास मदत होईल. या घटकावर लक्ष ठेवण्यासाठी आपल्या दैनंदिन वेळापत्रकाची नोंद करा. विशिष्ट औषधे देखील मायग्रेनचेझटके रोखण्यासाठी मदत करू शकतात. मायग्रेन होण्यापासून किंवा हा आजार अधिक बिघडत राहणे टाळण्यासाठी विशिष्ट जीवनशैली बदल करणे महत्त्वाचे आहे, विशिष्ट पेय, अन्नपदार्थ जसे अल्कोहोल आणि चॉकलेटचे सेवन टाळावे. धूम्रपान हे डोकेदुखी आणि इतर लक्षणे वाढवतात हे सिद्ध झाले आहे, म्हणून धुम्रपान सोडावे. फळे, भाजीपाला, संपूर्ण धान्य,  कमी चरबी असलेले प्रोटीन आणि निरोगी चरबी असलेले आहार हे मायग्रेन टाळण्यासाठी सर्वोत्तम आहे. रोगप्रतिकारक प्रणाली मजबूत ठेवण्यासाठी, उदासीनता आणि चिंता दूर ठेवण्यासाठी, आणि शरीर आणि मन शांत करण्यास मदत करण्यासाठी नियमितपणे झोप घेणे महत्वाचे आहे. प्रत्येक दिवशी सुमारे ३० मिनिटे एरोबिक,  स्नायू बळकटी आणि लवचिकतेचा व्यायाम करा. अंततः, ध्यान आणि योगाद्वारे ताण टाळण्यामुळे मायग्रेनची वारंवारता आणि गंभीरता कमी करण्यात मदत होऊ शकते.


- डॉ. प्रसन्ना कासेगावकर, न्यूरोलॉजिस्ट, सोलापूर

बातम्या आणखी आहेत...