Home | Divya Marathi Special | E-commerce in the country: now 2 US companies' competition

देशात ई-कॉमर्स : आता 2 अमेरिकी कंपन्यांची स्पर्धा

दिव्य मराठी | Update - May 13, 2018, 04:11 AM IST

दे शातील सर्वात बडी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट, जगातील तिसरी मोठी ई-कॉमर्स कंपनी वॉलमार्टला विकली जाणार आहे. मात्र या करा

 • E-commerce in the country: now 2 US companies' competition

  दे शातील सर्वात बडी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट, जगातील तिसरी मोठी ई-कॉमर्स कंपनी वॉलमार्टला विकली जाणार आहे. मात्र या करारापूर्वी त्यांना त्यांच्यापेक्षा छोट्या कंपन्यांना स्वत:मध्ये सामावून घेण्याची महत्त्वाकांक्षा आहे. आतापर्यंत त्यांनी १३ ब्रँड्सचे अधिग्रहण केले आहे. त्यातील बहुतांश शेअर्स आपल्या नावे केले आहेत. कंपन्यांच्या अधिग्रहणाची ही मालिका त्यांच्या स्थापनेच्या तीन वर्षांनंतर म्हणजे २०१० मध्ये सुरू झाली होती. इतकेच नव्हे तर तीन बड्या कंपन्यांना तर फ्लिपकार्टने अॅमेझॉन भारतात आल्यानंतर खरेदी केले होते. मिंत्रा, जबाँग, ईबे इंडिया या त्या कंपन्या आहेत. स्नॅपडीलला खरेदी करण्याचे प्रयत्नही त्यांनी केले.

  फ्लिपकार्टने त्यांच्या मालकांना ७० ते ८० कोटी डॉलर्स (४५०० कोटी ते ५००० कोटी रुपये) देऊ केले होते. पूर्वी स्नॅपडीलचे बाजारमूल्य ६ अब्ज रुपये होते. आता त्यांना १ अब्ज डॉलर्सची अपेक्षा आहे. ती सुद्धा पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे करार होऊ शकत नाही. फ्लिपकार्टच्या तुलनेत अॅमेझॉनने भारतातील आपल्या युनिटमध्ये गेल्या ४ वर्षांत १९,५११ कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. २०१७ मध्ये त्यांनी एकूण ६२०० कोटी गुंतवणूक केली.

  या ब्रँडचे अधिग्रहण फ्लिपकार्टने केले होते

  डिसेंबर २०१०
  सर्वात आधी पुस्तकांची माहिती व परीक्षण करणारे प्लॅटफॉर्म ‘वीरीड.कॉम’ ची खरेदी.

  ऑक्टोबर २०११
  डिजिटल म्युझिक स्टोअर ‘माइम-३६०’ची खरेदी. येथे रोकडसोबत भाग खरेदी झाली.

  नोव्हेंबर २०११
  बॉलीवूड न्यूज साइट ‘चकपक.कॉम’चे अधिग्रहण केले.

  फेब्रुवारी २०१२
  तेव्हा देशातील दुसऱ्या सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर असलेल्या ‘लेट्सबाय.कॉम’ चे अधिग्रहण केले.

  मे २०१४-३०

  कोटी डॉलर्समध्ये ऑनलाइन रिटेलर ‘मिंत्रा’ चे अधिग्रहण केले.

  सप्टेंबर २०१४
  एनजीपे नामक पेमेंट प्लॅटफॉर्मचे बहुतांश शेअर्स खरेदी केले.

  नोव्हेंबर २०१४
  जीव्स नामक ग्राहक सेवेचे बहुतांश भाग खरेदी केले.

  मार्च २०१५
  मोबाइल अॅडव्हर्टायझिंग कंपनी अॅडइक्विटीची खरेदी.

  एप्रिल २०१५
  मोबाइल मार्केटिंग फर्म ‘अॅपइटरेट’चे अधिग्रहण केले.

  सप्टेंबर २०१५
  पेमेंट सुविधा देणाऱ्या स्टार्टअप ‘एफएक्स मार्ट’ची खरेदी.

  एप्रिल २०१६
  यूपीआय आधारित पेमेंट स्टार्टअप ‘फोनपे’ चे अधिग्रहण केले.

  जुलै २०१६
  ७ कोटी डॉलर्समध्ये जबाँग खरेदी केली. ]

  एप्रिल २०१७
  ईबेने ५० कोटी डॉलर्स गुंतवणूक करून फ्लिपकार्टला ईबे इंडियाला विकले.

  ७७ ते ५५ % वॉलमार्टची भागीदारी राहण्याची भीती

  अमेरिकी कंपनी वॉलमार्टने ९ मे रोजी फ्लिपकार्टच्या ७७% भाग खरेदी करण्याच्या योजनेचा खुलासा केला होता. यामुळे कंपनीच्या भागीदारांसाठीदेखील ही आनंदाची बातमी असल्यासारखे चित्र निर्माण झाले. काही काळापासून फ्लिपकार्टच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती. मॉर्गन स्टॅनलीने तर २०१६ मध्ये फ्लिपकार्टचे मूल्यांकन २०१५ च्या १५.२ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत घटवून ५.५४ अब्ज डॉलर्स केले. गुंतवणूकदार, कर्मचारी यामुळे चिंतित होते. यादरम्यान कंपनीला वॉलमार्टकडून ऑफर मिळाली. त्यामुळे त्यांचे मूल्य २.८ अब्ज डॉलर्स असल्याचा अंदाज लावण्यात आला होता. या मोठ्या करारामुळे काही न काही लाभांश भागधारकांनाही मिळेल, अशी आशा आहे. कर्मचाऱ्यांनाही यामुळे दिलासा मिळाला. मात्र आता फ्लिपकार्टची सर्वात मोठी गुंतवणूकदार जपानी कंपनी सॉफ्टबँक आपले २२% शेअर्स वॉलमार्टला विकण्याविषयी गोंधळलेल्या स्थितीत आहे. शेअर्स विकल्याने त्यांना किती कर चुकवावा लागेल याचा हिशेब करण्यात ते व्यग्र आहेत. फ्लिपकार्टने भविष्यात प्रगती केली तर शेअर्स विक्रीचा निर्णय चूक सिद्ध होईल, असे त्यांना वाटत आहे. यामुळे हा करार संकटात येण्याची शक्यता आहे. सॉफ्टबँकने या करारातून अंग काढून घेतले तर वॉलमार्टला केवळ ५५ % भागीदारीवरच करार करावा लागणार आहे.

  अॅमेझॉनने फ्लिपकार्ट खरेदीच्या तीन संधी गमावल्या ​

  वॉलमार्टसोबत अॅमेझॉनदेखील फ्लिपकार्ट खरेदी करण्याच्या स्पर्धेत सामील होती. वॉलमार्टच्या २०.८ अब्ज डॉलर्सच्या (१.३९ लाख कोटी रुपये) तुलनेत फ्लिपकार्टचे मूल्य २२.५ अब्ज डॉलर्स अंदाजे केले होते. मात्र रेग्युलेटर्सच्या क्लिअरन्सची प्रक्रिया पाहता फ्लिपकार्टने वॉलमार्टशी करार केला होता. अॅमेझॉनने भारतात येण्यापू्र्वी २०१२ मध्ये फ्लिपकार्टला खरेदी करण्याचा प्रयत्न केला. ५० ते ७० कोटी डॉलर्सची ऑफर दिली होती. भारतात आल्यानंतर २०१५ मध्ये अॅमेझॉनने ८ अब्ज डॉलर्समध्ये फ्लिपकार्टला खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांना अपयश आले.

  हे आहेत ई-कॉमर्समधील आतापर्यंतचे सर्वात मोठे करार

  २०१७ : मध्ये पाळीव प्राण्यांसाठी आवश्यक उत्पादने विकणाऱ्या फ्लोरिडातील ई-कॉमर्स कंपनीला अॅरिझोनाच्या पेटस्मार्ट कंपनीने खरेदी केले होते.
  हा करार ३.३५ अब्ज डॉलर्समध्ये झाला होता
  २०१६ : मध्ये वॉलमार्टने अमेरिकेच्या ई-कॉमर्स फर्म जेट.कॉमची खरेदी केली.
  हा करार ३.३० अब्ज डॉलर्समध्ये झाला होता.
  १९९९ : मध्ये अमेरिकी सॉफ्टवेअर कंपनी सेप एरिबाने ई-कॉमर्स कंपनी ट्रेडेक्सची खरेदी केली होती.
  हा करार १.८६ अब्ज डॉलर्सचा होता.
  २००० : मध्ये लिटावर टेक्नॉलॉजीजने एशियानेटच्या ई-कॉमर्स बिझनेसचे अधिग्रहण केले होते.
  हा करार १.२० अब्ज डॉलर्समध्ये झाला होता.

  पुढील स्लाईडवर पहा,ऑनलाइन बाजारात कोणाचा किती वाटा ....

 • E-commerce in the country: now 2 US companies' competition
 • E-commerce in the country: now 2 US companies' competition

Trending