Home | Divya Marathi Special | EVM too, how many tricksters, party elections change!

ईव्हीएमही किती चालबाज, दर निवडणुकीला पक्ष बदलते!

दिव्य मराठी | Update - Jun 04, 2018, 01:52 AM IST

हाजी दरवाजा वाजवत होते. मी ओरडलोच, ‘अरे बाबा, दारात बेलचे बटण असताना सकाळी सकाळी दरवाजाचा तबला का वाजवतो आहेस?’ हाजी म्ह

 • EVM too, how many tricksters, party elections change!

  हाजी दरवाजा वाजवत होते. मी ओरडलोच, ‘अरे बाबा, दारात बेलचे बटण असताना सकाळी सकाळी दरवाजाचा तबला का वाजवतो आहेस?’ हाजी म्हणाले, ‘अरे महाकवी, मुद्दाम मी दरवाजावर बटण दाबले नाही. कोणतेही बटण दाबा मत भाजपलाच पडते म्हणे...’ थोडे थांबून पुन्हा म्हणाले, ‘प्रत्येक ठिकाणी ‘नोटा’शी टक्कर घेणाऱ्या तुमच्याच एका चालबाज मित्राकडून ऐकले होते.’ मी म्हणालो, ‘परंतु नुकत्याच भारतात झालेल्या पोटनिवडणुकीत तर प्रत्येक ठिकाणी असे काही घडले नाही.’ हाजी म्हणाले, ‘ही ईव्हीएम पण चांगलीच चालबाज आहे.

  प्रत्येक निवडणुकीत मित्र बदलत राहते. ज्याला विजयी मुकुट मिळत नाही तो या बिचारीला वाईट ठरवतो. यंदा उत्तर प्रदेशातील कैरानामध्ये तर बिचारीने इतकी दूषणे सहन केली की लज्जेने तापून पघळून गेली.’


  मध्येच मी हटकले, ‘हाजी, या ईव्हीएममध्ये खरेच छेडछाड होतेे का हो?’ ते म्हणाले, ‘हे पाहा महाकवी, याचे उत्तर मी काय देणार, यावर स्वत: ईव्हीएम पण कन्फ्यूज आहे. कधीकाळी ‘हाता’खाली काँग्रेसी सरकारचे बटण दाबणाऱ्या बिचाऱ्या ईव्हीएमवर भाजपाई भीष्म अडवाणी आणि जीव्हीएल यांनी तर पुस्तकच लिहून टाकले होते. आज काँग्रेसला ईव्हीएमच्या बटणाची एवढी धास्ती वाटते की किम जोंगची बटणेही या पक्षाला आता फिकी वाटतात. काहीही असो, ही ईव्हीएम पण एवढी धीट की एवढी छेडछाड होऊनही ती कधीच हार मानत नाही.

  मी म्हणालो, ‘मग सरकार पण मतपत्रिकेने मतदान का घेत नाही? अशाही मतपत्रिका निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक मंडळात पडूनच आहेत ना... खरं सांगू हाजी, फरक काय पडला? पूर्वी मतपेट्या पळवल्या, लुटल्या जात होत्या. आता ईव्हीएमशी छेडछाड होते.’ हाजीने दाढी खाजवली.... ‘म्हणजे निवडणूक आयोगाने आता पुल्लिंगीचा वापर करायला हवा ना?’ मी म्हणालो, ‘काय हाजी, तुमचे पुरुषी वर्चस्वाचे विचार अजूनही गेले नाहीत.’ हाजी म्हणाले, ‘बघा... अरे आम्ही तर ईव्हीएमसोबत आहोत. तुमच्यासारख्या नवपतितांचे काय? नोटाच्या पुढे जाऊन मतपत्रिकेनेही पराभव झाला तर मग मतदारांच्या तोंडाला कान लावून ऐकणार का, की तुला मी मतच दिलेले नाही म्हणून...’ मग पुन्हा हाजी अचानक गंभीर होत म्हणाले, ‘महाकवी, मत दिल्यावर यात जो बीप ऐकू येतो ना तोच पाच वर्षे त्याच्या कानात घुमत राहतो.

  मी तर प्रत्येक वेळी बटण दाबल्यानंतर कितीतरी वेळ त्या बोटाची शाई न्याहाळत राहतो.’ मी विचारले, ‘का?’ त्यांनी सुनावले, ‘विचार येतो की मी देशाच्या राजकारणाकडे बोट दाखवतो आहे की राजकारण माझ्याकडे?... महाकवी.’

  आता तर राजकारणात जेंव्हा काही वाईट घडते तेव्हा सारा दोष या देशातील माझ्यासारख्या अंगुलीबाजांवरच लावला जातो. ज्यांच्या वाट्याला पाच वर्षात केवळ बटन दाबणे आणि नंतरची पाच वर्षे स्वत: दबणेच येते.मला वाटते या देशात ईव्हीएम म्हणजे एज्युकेटेड वोटिंग मासेसची अधिक गरज आहे. बाकी मी तर कन्फ्युज्ड आहे, झाडू सरजीकडे आहे, हात काँग्रेसकडे आणि साफसफाई मोदी करून जातात.

  ‘नेता को मजूरों की किसानों की क्या खबर
  चिंता में मन दबा है, कर्जे में मन दबा है
  वोटर का खून पीती है ये ईव्हीएम चाहे
  इनका बटन दबा है कि उनका बटन दबा है|’

Trending