Home | Divya Marathi Special | Hard work, patience and continuous effort will reach the goal

कामाचे व्यवस्थापन ; मेहनत, धैर्य व निरंतर प्रयत्न ध्येयापर्यंत जरूर पोहोचवतात

दिव्‍य मराठी | Update - Jan 28, 2018, 07:43 AM IST

धैर्य ठेवून अडचींचा सामना करता येतो. तसेच दृढता आणि जिद्द कधीच हार न मानण्याची ताकद देतात. ध्येय गाठण्यासाठी धैर्यही गरज

  • Hard work, patience and continuous effort will reach the goal

    धैर्य ठेवून अडचींचा सामना करता येतो. तसेच दृढता आणि जिद्द कधीच हार न मानण्याची ताकद देतात. ध्येय गाठण्यासाठी धैर्यही गरजेचे असते. बहुतेक लोकांमध्ये दोन्हीचीही कमतरता असते. अनेकांना यश हवे असते पण त्यासाठीची मेहनत आणि त्याग त्यांना अजिबात नको असतो.


    याचा परिणाम असा होताे की, ते सहजपणे हार मानतात. एखाद्या वैज्ञानिक आणि नव्याने आविष्कार करणाऱ्यांची गोष्ट याबाबत महत्त्वाची ठरते. १९१४ मध्ये थॉमस एडिसन यांच्या प्रयोगशाळेत आग लागली होती. या आगीत कोट्यवधीची मशिनरी आणि महत्त्वाचे कागद,ज्यात एडिसनने आपले शाेध लिहिले होते. आगीचे हे वृत्त एेकून त्यांचा मुलगा चार्ल्स त्यांना शोधू लागला तर असे दिसले की वडील एडिसन अागीच्या ज्वाळांसमोर उभे राहून हसत आहेत. चार्ल्सला पाहून एडिसन म्हणाले की, तुझी अाई कोठे अाहे? जा तिला तिलाही घेऊन ये. कारण असा नजारा तिला पुन्हा पाहायला मिळणार नाही. पुढच्या दिवशी ६७ वर्षाचे एडिसन राख एकसारखी करत बोलत होते की, अनेक वेळा बरबादी होऊनही सुख मिळते. ही आग लागून हे चांगले झाले की,माझ्या चुका जळून खाक झाल्या. आता नव्याने सुरुवात करता येईल. या घटनेवरून हे दिसते की, सफलतेचा मार्ग मेहनत आणि अपयश यातूनच मिळतो. जे प्रवाहाचा विचार न करता विरुद्ध जाऊन काम करण्यासाठी तयार असतात, अशाच लोकांना मोठे यश मिळत असते. ही बाब प्रेरणादायक आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

Trending