Home | Divya Marathi Special | Inid Marie Blayton The most celebrated writer

इनिड मेरी ब्लाइटन- सर्वाधिक खपाच्या कादंबरीची लेखिका; 40 वर्षांच्या करिअरमध्ये 800 पुस्तके लिहिली

दिव्‍य मराठी | Update - Dec 24, 2017, 06:41 AM IST

९० च्या दशकात बहुतेक मुले यांचीच पुस्तके वाचून मोठी झालेली आहेत. १९३० पासून यांची पुस्तके जगातील बेस्ट सेलर्स पुस्तके म्

 • Inid Marie Blayton The most celebrated writer

  ९० च्या दशकात बहुतेक मुले यांचीच पुस्तके वाचून मोठी झालेली आहेत. १९३० पासून यांची पुस्तके जगातील बेस्ट सेलर्स पुस्तके म्हणून मान्यता पावलेली आहेत आणि त्यांच्या पुस्तकाच्या आतापर्यंत ६० कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत. आपण चर्चा करत आहोत, प्रसिद्ध ब्रिटिश लेखिका इनिड मेरी ब्लाइटन यांची. ज्यांना जगातील सातवी बेस्ट सेलर लेखिका म्हणून मानले जाते.


  यांचा जन्म दक्षिण लंडनमधील एका जुन्या दुकानाच्या वर असणाऱ्या छोट्याशा दोन बेडरूम फ्लॅटमध्ये झाला होता. वडील कटलरी सेल्समन होते आणि तर आई फक्त घरकाम करत असे. त्यांना दोन लहान भाऊही होते. इनिड यांचे वत या वडलांचे नाते चांगले होते आणि ज्ञान विज्ञानाशिवाय अनेक गोष्टींवर ते दोघे चर्चा करत असत. दोघे एकत्र बागेतही काम करत असत.
  आपल्या चरित्रात इनिड लिहितात की, लहानपणापासूनच त्यांच्या डोक्यात गोष्टीच्या कल्पना येत असत. रात्री झाेपतानाही एखाद्या स्वप्नाप्रमाणे गोष्टी मनाभाेवती रूंजी घालत असत. या गोष्टी संमिश्र स्वरूपाच्या असत. प्रत्येक गाोष्टीला सुरुवात आणि अंत असे. गोष्ट सांगण्याची बेचैनी त्यांच्यात नेहमी असे. त्यांना ही गोष्ट फार सोपी वाटत असे. पण प्रत्येक मुलाला हे शक्य नसे. जेव्हा त्यांना ही गोष्ट समजली, तेव्हा त्या फार बेचैन झाल्या. कोणाला गाेष्ट सांगण्याची बेचैनी त्यांना कागदावर लिहायची होती. आपल्या भावांनाही त्या गोष्टी आणि कविता ऐकवत असत. पुस्तके वाचण्याची गोडी त्यांना लहानपणापासून तर होतीच. ललित साहित्य आणि कविता हा त्यांच्या आवडीचा विषय. प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे वाचणे हा त्यांचा आवडता छंद होता. त्या डायरीही लिहित असत. मुलांना त्या सांगत असत की, त्यांनी आपल्या डोक्यात गोष्टी आणि माहिती भरून घ्यावी. त्याची माहिती जितकी असेल तेवढे सांगताना त्याचा उपयोग होईल.

  लहान वयातच त्यांनी आपले लेखन प्रकाशकांकडे नेऊन द्यायला सुरुवात केली होती. ही गोष्ट अजिबात सोपी नव्हती. त्यांना प्रत्येक वेळी नकारच मिळाला. यामुळेच त्यांना आपले लेखन पुढे जोमानेे करण्याचा आत्मविश्वास मिळाला. १३ वय असताना वडील रागाने घर सोडून गेले. कारण त्यांच्या आयुष्यात दुसरी स्त्री आली होती. हा काळ इनिड यांच्यासाठी फार दु:खाचा होता.

  त्यांच्या या वेदनांना त्यांनी आपल्या द सिक्स बॅड बॉईज या पुस्तकात अतिशय संवेदनशील पद्धतीने शब्दबद्ध केलेले आहे. यानंतर त्यांनी आपले पूर्ण लक्ष लेखनावर केंद्रित केले. अनेक तास स्वत:ला खोलीत बंद करून लिहित असे. पण त्यांच्या आईला हे लेखन पसंत पडत नसे. आपली मुलगी केवळ वेळ वाया घालवते, असे त्यांच्या आईला वाटत असे.


  १९२२ मध्ये चाइल्ड व्हिस्पर्स हा त्यांचा छोटासा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. २८ ऑगस्ट १९२४ रोजी इनिडचा विवाह ज्यॉर्ज न्यून्स पब्लिकेशनचे ह्यूज अलेक्झांडर पॉलक यांच्याशी झाला. १९३१ मध्ये पहिली, तर १९३४ मध्ये दुसरी मुलगी त्यांना झाली. १९४२ मध्ये त्यांचा घटस्फाेटही झाला. १९४३ मध्ये केनेथ या सर्जनशी त्यांचा विवाह झाला. इनिडच्या दोन्ही मुली त्या वेळी बोर्डिंगमध्ये शिकत होत्या. इनिड यांनी त्या वेळी जे लेखन केले ते आजही आवडीने वाचले जाते.

  यात मुलांसाठी लिहिलेले पुस्तक सिक्रेट सेवन आणि फेमस फाईव्ह नावाचे सिरीज प्रसिद्ध ठरले. ‘फारअवे ट्री' आणि ‘द विशिंग चेयर' ही पुस्तकेही त्यांनी याचवेळी लिहिली. १९४९ मध्ये त्यांनी मुलांना सर्वात आवडलेल्या नॉडी या पात्राचे लेखन केले. खरे तर त्यांना चमत्कारी आणि साहस पुस्तकांसाठी ओळखले जाते. पण त्यांनी निसर्ग, धर्म, प्राणी, फँटसी, परिकथा, नर्सरी कथा, कविता, गाणी, नाटके व अनेक लेख लिहिले. यात लाेककथांचाही समावेश आहे. केवळ मुलांचे रंजन करणे हा त्यांचा हेतू नव्हता. आपल्या कथा वाचून मुलांनी प्रामाणिकपणा, सभ्यता शिकावी असे त्यांना वाटे. १९५० च्या दरम्यान इनिड यांची प्रकृती बिघडू लागली आणि एक दिवस त्यांना हृदयविकाराचा झटका आला. १९६० मध्ये त्यांना स्मृतीभ्रंश झाला. हळूहळू त्यांना सर्व गोष्टींचा विसर पडू लागला. २८ नोव्हेंबर १९६८ मध्ये झोपेत असतानाच त्यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी अंतिम श्वास घेतला. पुस्तके आणि लेखनविश्वाला कायमचा निरोप घेतला.

  - इनिड मेरी ब्लाइटन प्रसिद्ध लेखिका
  जन्म : ११ अॉगस्ट १८९७
  निधन : २८ नोव्हें. १९६८
  काम- मुलांमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘नॉडी' पात्राचा आविष्कार, ‘सिक्रेट सेव्हन' आणि ‘फेमस फाइव्ह' सिरीज, ‘फारअवे ट्री' अशा ऑलटाइम ग्रेट पुस्तकांचा यात समावेश आहे.

  - टाइपरायटर जवळ ठेवून रोज १०,००० शब्द सहजपणे लिहीत असत.
  - मेरी पॉलक हे त्यांचे टोपणनाव होते. या नावाने त्यांची ६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
  - २००९ मध्ये इनिड यांच्यावर एक सिनेमा निघाला. यात हेलेना बॉनहेम कार्टर यांनी इनिडचे काम केले.

Trending