आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊल उचलत नाही तोपर्यंत एखादा मुद्दा मला करताे अस्वस्थ : अभिनेता अक्षय कुमार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही  कोणत्या परिस्थितीत आहात याला फार महत्त्व नसते. जे काम करण्याची इच्छा आहे, त्याप्रति मात्र उत्साह असायला हवा.  करिअरच्या सुरुवातीपासूनच मला समाजासाठी काही करण्याची इच्छा होती. याची नोंद माझ्या मनात कायम असायची. समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे चित्रपट हे एक शक्तिशाली माध्यम आहे, असे मला वाटते. लोकांवर प्रभाव टाकण्याच्या क्षमतेचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो. मला आठवतेय, माझे कुटुंब जेव्हा दिल्लीहून मुंबईला स्थलांतरित झाले होते, तेव्हा आम्ही शनिवारी भोजनाचे पैसे वाचवून सायंकाळी चित्रपट पाहावयास जात होतो. या पैशातून समोसा व स्टिकचे ऑरेंज आइस्क्रीम घेत होतो. 


चित्रपट माझ्या कुटुंबाला उपाशीपोटी आनंदी ठेवू शकत असतील तर कल्पना करा, योग्य वापरामुळे ते आणखी का काही करू शकणार नाहीत, असे वाटते. याच कारणास्तव अभिनय करत असताना मी खट्टा-मीठा चित्रपटाची निर्मिती केली. यामध्ये भारतातील रस्त्यांची स्थिती व भ्रष्टाचाराचे मुद्दे उपस्थित केले. चित्रपट अापटला आणि मी निराश झालो. पुन्हा निर्मितीत उतरलो आणि सिंग इज किंग, नमस्ते लंदन व वक्तसारखे चित्रपट केले. मात्र, मी माझ्या उद्देशाकडे पुन्हा परतलो. कारण जोपर्यंत एखादा मुद्दा सोडवण्यासाठी पाऊल उचलत नाही तोपर्यंत तो मला टोचणी देत राहतो. काही दिवसांपूर्वी नाशिकला एका शेतकऱ्याला भेटलो. त्याने सांगितलेल्या गोष्टीने माझ्या काळजाचा ठाव घेतला. मी त्याला पुन्हा भेटण्याचे वचन दिले आहे.  


लोकांमध्ये प्रत्यक्ष गेल्यानंतर अशा कथा कळतात. कार्यालय किंवा सोफ्यावर बसून समजत नाहीत. या अशा कथा आहेत ज्या पाहिल्यानंतर लोक त्याच्याशी जोडले जातात. लोकांपर्यंत पोहोचलो नसल्यामुळे अशा अनेक कथा पुढे आल्या नाहीत. ज्या प्रश्नांची सोडवणूक झाली नाही, असे अनेक मुद्दे आहेत. उदा. माझा पुढचा चित्रपट पॅडमॅनचा मुद्दा. मला वाटते  लोक आता सॅनिटरी पॅड्सवर उघडपणे बोलत आहेत. लोक बदलासाठी तयार आहेत हेही यातून दिसून येते. आपणास केवळ त्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. कारण आपणाकडे माध्यम(चित्रपट) आहे. असाच काहीसा संदेश “टॉयलेट एक प्रेम कथा’मध्ये दिला होता.  


मी अशा सकारात्मक बदलाचा लहानसा भाग बनण्याची आशा करतो. याची देशाला आवश्यकता आहे, अशी आशा करतो. चित्रपट या बदलाची ताकद आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे.

- अक्षयकुमार, अभिनेता  

बातम्या आणखी आहेत...