आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाभारत - 2019 : निवडणुका आल्या की सर्वांनाच होते धर्माची आठवण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईदच्या दिवशी सायंकाळी हाजी एक लिफाफा घेऊन आले. त्यावर एका औषधाच्या दुकानाचे नाव लिहिलेले होते. ते पाहून मी विचारले, ‘काय झाले हाजी? सर्वकाही ठीक तर आहे ना? ढेकर देत हाजींच्या तोंडून पहिला शब्द बाहेर पडला. ‘अहो, महाकवी! काय सांगू...आठवडाभरापासून इफ्तार खाऊन पोटाचा फिफा वर्ल्डकप झाला आहे. कुण्या एखाद्याकडे नाही गेले तर त्याला राग येतो.’ त्यावर मी म्हणालो, ‘अरे यार..! एक-दुसऱ्याच्या सण-समारंभात सामील होणे ही तर चांगली बाब आहे. ते आवर्जून करायला हवे. हेच तर खरे देशाचे सौंदर्य आहे.’


हाजींनी इशारा करत पाणी मागवले आणि म्हणाले, ‘हो, बिलकुल ते चांगलेच आहे. यामुळे मित्रांच्या इफ्तारमध्ये तरी मजा आली. पण राजकीय इफ्तार पार्ट्यांनी वीट आणला. हे खा, ते खा, असे खा, तसे खा, त्यांच्याजवळ जाऊन बसा आणि टोपी घालून कॅमेऱ्यासमोर खाल्ल्यासारखे दाखवा आणि काही पदार्थ घेण्यास नकार दिला तर लगेच टोमणे सुरू ‘अमक्या पक्षाच्या इफ्तार पार्टीत तर तुम्ही चार दहीवडे खाल्ले होते. आता आम्ही सर्वसामान्य व्यक्ती आहोत तर येथील सरकारी इफ्तारमध्ये संकोच का?’ हे ऐकून मला हसू आवरले नाही.  मी विचारले, ‘अहो, हाजी, हे तर तुमच्यावर त्यांचे प्रेम आहे.’ हाजी लगेच खेकसले, ‘अरे, काही प्रेम वगैरे नाही. हा तर दिखावा आहे. राजकीय पक्षांनी तर याला एक खेळ बनवले आहे. बहुतांश पक्ष तर व्होट बँकेसाठी धर्मनिरपेक्षतेचे नाटक करतात.’  


मी म्हणालो, ‘राम-राम, कसे बोलत आहात तुम्ही हाजी, तुमच्या बोलण्यावरून वाटते की, धर्मनिरपेक्षतेला काही अस्तित्वच नाही.’ हाजींनी लगेच उत्तर दिले, ‘अरे!  असे मी कधी म्हणालो आणि यासाठी माझ्यापेक्षा दुसरे मोठे उदाहरण कोणते असेल. पण हृदयात धर्मनिरपेक्षता असेल तर ठीक आहे. जातीय संमेलनात बेशरमांप्रमाणे मतांचे राजकारण करणाऱ्या लंपटांचा धर्मनिरपेक्षतेशी काय संबंध?’ त्यानंतर एकदम औषधाच्या तीन गोळ्या गिळत म्हणाले, ‘महाकवी! धर्मनिरपेक्षता एका मफलरप्रमाणे असते. निवडणुकीचा काळ आला की ती गळ्यात पडते. कामचुकारपणा वाढला की सोफ्यावर पसरते, प्रश्न विचारले की तोंड बांधले जाते आणि ऐकून न ऐकल्यासारखे करायचे असेल तर कानाभोवती गुंडाळण्यात येते.’ त्यानंतर डोळे मारत ते म्हणाले, ‘मफलरांची बेशरमीची नाटके तुमच्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे कोण जाणू शकते? मी आणखी उचकवण्याचा प्रयत्न केला, ‘हाजी भाई! असे काही नाही, सर्वकाही राजकारणासाठी तर नसते ना!’ हाजींच्या मनात अनेक गोष्टी होत्या. ते म्हणाले, “महाकवी, भारतीय धर्मनिरपेक्षता ही एक तलावात आंघोळ करणाऱ्या पवित्र महिलेप्रमाणे आहे. या महिलेचे कपडे राजकीय पक्षांनी केवळ पळवलेच नाहीत तर आपापल्या हिशोबाने त्यापासून झेंडे, बॅनर बनवले आहेत. दुसरीकडे बिचारी धर्म-निरपेक्षता राज्यघटनेच्या क्लोज सर्किट कॅमेऱ्यापासून वाचण्यासाठी बनावट भाषणांची पाने घालून फिरत आहे. विशेष म्हणजे जनता यालाच विकासवादी फॅशन समजून टाळ्या वाजवत आहे.’

 

मला तर खरोखर खूप मजा वाटत आहे. मी विचारले, “पण धर्मनिरपेक्षता मजबूत झाली तर देश सुजलाम सुफलाम होईल ना?’ हाजी म्हणाले, “धर्मनिरपेक्ष असणे आणि धर्मनिरपेक्षतेचा गवगवा करण्यात खूप फरक आहे महाकवि, याबद्दल तर तुम्हालाही बरेच काही माहिती असेल. बिचारे आडवाणीजी, जिन्नांच्या मजारवर फुल चढवून त्यांना धर्मनिरपेक्ष संबोधून अडचणीत आले. आता मात्र मार्गदर्शक मंडळावर बसून हाय-वे वरून बर्फ कधी साफ होईल याची प्रतीक्षा करत आहेत.’ आणि हां! तुमचे नवे गदाधारीही अनेक प्रश्नांवर गप्प आहेत. तुमचा सिकंदरही अशा सैनिकांना धर्मनिरपेक्ष बनवतो जो धर्माच्या बिर्याणीत लांगुनचालनाचा आचार पद्धतीशीरपणे घालू शकतात. हीच तर त्याची देणगी आहे.

 

आणि एक तुम्ही आहात जे प्रत्येक धर्माचा आदर तर करतात पण टोपी घालतात ना घालू देतात. आता तुमचे नुकसान झाले ना? तुमच्या स्वत:ची कमाई कसायाच्या दुकानातील कुत्र्यांनी खाल्ली ना? आजकाल तर लांगुनचालनाच्या पारंपरिक दुकानाचे वारसदार युवा अध्यक्षजी सुद्धा मंदिरात जाऊन प्रसारमाध्यमांना कॅप्सुल देत आहेत. आता पहा, २०१९ पर्यंत सर्व अधर्मी अशाच प्रकारे प्रपंची धर्म वाचताना दिसून येतील.


‘ऐसे नहीं ये लोग कभी शर्म ओढ़ते हैं,
केवल दिखावटी ये सारे मर्म ओढ़ते हैं
वैसे नमाज़-ओ-पूजा से रिश्ता नहीं कोई
जब सिर पे हो चुनाव तभी धर्म ओढ़ते हैं’

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...