Home | Divya Marathi Special | Job management; Promotions that provide sustained enthusiasm for the work

नोकरी व्यवस्थापन; कामाचा कायम उत्साह मिळवून देते पदोन्नती

दिव्‍य मराठी | Update - Dec 24, 2017, 06:38 AM IST

कामादरम्यान नेहमीच उत्साह राखण्यानेही प्रमोशन मिळण्याची शक्यता वाढते. उत्साह दाखवण्याच्या अनेक पद्धती असतात. जसे की, मी

  • Job management; Promotions that provide sustained enthusiasm for the work

    कामादरम्यान नेहमीच उत्साह राखण्यानेही प्रमोशन मिळण्याची शक्यता वाढते. उत्साह दाखवण्याच्या अनेक पद्धती असतात. जसे की, मीटिंगमध्ये बसून नोट्स काढणे. असेही होऊ शकते की सुरुवातीला हे गरजेचे वाटणार नाही. मात्र, नेहमीच तुम्हाला नोट्स काढताना पाहून बॉस कामाप्रती तुमचे समर्पण पाहून प्रेरित होतील. त्यांना हा संदेश मिळतो की, तुम्ही मीटिंगमध्ये पूर्ण समाविष्ट आणि व्यस्त आहात. तुम्ही त्यांचा प्रत्येक शब्द गंभीरपणे घेता हेही त्यांना जाणवेल. त्यातून हे स्पष्ट होते की बॉसचा प्रत्येक शब्द आपल्यासाठी किमती आहे. त्याने दिलेले निर्देश तुमची प्राथमिकता आहे.


    एरिक शॉनस्ट्रॉमने अापले पुस्तक वाइल्ड क्युरिओसिटीत दोन प्रकारच्या उत्सुकता सांगितल्या आहेत. डी टाइप आणि आय टाइप. डी टाइपमध्ये शिकण्याची तीव्र इच्छा असते. शिकण्याची तसेच नवे काही करण्याची इच्छा नेहमीच होते. आय-टाइपमध्ये उत्सुकतेतून आनंद झळकतो. तणावाचे ढग दूर जातात. शिकण्याची गरज भलेही नसो मात्र शिकण्याची इच्छा कायम राहते.

    दोन्ही प्रकारच्या उत्सुकतेमुळे बॉसचे प्रभावित होणे साहजिक आहे. शोध सांगतो की, मेंदू सर्वप्रथम उत्सुकतेला जागा देतो नंतर शिकणे सुरू करतो. नुकत्याच झालेल्या शोधात हेही स्पष्ट झाले की, काही नवे करण्यासाठीही उत्सुकता गरजेची आहे. त्यामुळे आपण हे जाणू शकतो की, करिअरमध्ये आपण किती पुढे गेलो आहोत वा पुढे गेलोच नाही. आता मोठ्या कंपन्या उत्साही कर्मचाऱ्याला खूपच महत्त्व देत असल्याचे दिसतात. कर्मचाऱ्यांत नेहमीच उत्सुकता कायम ठेवण्यासाठी कंपन्या नवनवी रणनीती आखत आहेत. त्यांचे निरंतर प्रयत्न सुरू आहेत.

Trending