आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नाेकऱ्या जाणार नाहीत, अाणखी दर्जेदार काम करू शकू : तन्मय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

१४ वर्षीय तन्मय बक्षी नववीत शिकताे. जगातील सर्वात बुद्धिमान लाेकांत त्याची गणना हाेते. अायबीएम व गुगलसारख्या कंपन्या त्याच्या मागे पळत अाहेत. टाेरंटाेत राहणारा तन्मय सध्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’वर (एअाय) काम करताेय. भाेपाळमध्ये अाला असता त्याने ‘भास्कर’च्या  वरिष्ठ संपादकांसाेबत विविध विषयांवर चर्चा केली. त्याचा काही संपादित अंश...


एका व्यक्तीला तातडीची मदत पाहिजे. ताे जीवनमरणाच्या उंबरठ्यावर उभा अाहे. ताे रुग्णवाहिकेत अाहे. मात्र बंगळुरूसारख्या विशाल शहरात त्याची रुग्णवाहिका वाहतूक काेंडीत अडकलीय. अापण त्याची मदत करू की त्याला तसेच मरणाच्या दारात साेडून देऊ.

 
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) इथे तुमची मदत करू शकते. ती या रुग्णवाहिकेत रोबो-डॉक्टरच्या रूपाने तातडीचे उपचार देऊ शकते. देशातील प्रत्येक रुग्णवाहिकेत अशी रोबो-डॉक्टरची सेवा देता येऊ शकते. तातडीच्या उपचारासाठी या राेबाेत प्राेग्राम सेट केले जाऊ शकतात. देशात कर्कराेगाचे रुग्ण अधिक व त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डाॅक्टरांची संख्या अत्यल्प अाहे. ‘एअाय’च्या मदतीने एखादा डाॅक्टर  वेगवेगळ्या ठिकाणच्या अनेक रुग्णांवर एकाच वेळी उपचार करू शकताे. डाटा अॅनालिटिक्सच्या मदतीने डाॅक्टरकडे हजाराे रुग्णांचा डाटा पाठविणे शक्य अाहे. तिथे एकाच वेळी ते अनेक रुग्णांचे निदान करू शकतात.  उपचारात तर ‘एअाय’मुळे क्रांतिकारी बदल अाणणे शक्य अाहे. किशाेरवयीन मुलांमध्ये अात्महत्यांचे प्रमाण वाढत अाहे. अापल्याला अात्महत्या राेखण्यासाठीचे प्रयत्न करण्याअाधी या मुलांना नैराश्यातून बाहेर काढण्यावर भर द्यायला हवा. ‘एअाय’च्या मदतीने युजरचे मेसेज, साेशल मीडियातील पाेस्ट, काॅमेंटचा अभ्यास करून या मुलांच्या नेमक्या समस्या काय अाहेत त्याचा अभ्यास करू शकताे. काही कामे अत्यावश्यक अाहेत मात्र लाेकांना त्यात रस नसताे.  जसे की रस्त्यांची स्वच्छता व वाहतूक नियंत्रण. ‘एअाय’ची या कामात  माेठी मदत हाेऊ शकते. 


- एअाय’च्या कार्यकक्षा भविष्यात विस्तारतील. अाधी लाेक म्हणायचे की संगणक लाेकांची जागा घेतील, परंतु असे झाले नाही.
- तंत्रज्ञानावर अापण फारच अवलंबून राहत अाहाेत, असेही नाही. पूर्वीसारखे अापल्याला अनेक फाेन नंबर्स लक्षात राहत नाहीत, हे खरे मात्र फाेनवर काय बाेलायचे हे मात्र अापण विसरत नाहीत. नंबर्स लक्षात ठेवण्यापेक्षा काय बाेलायचे हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे अाहे. म्हणजे अापल्या बुद्धिक्षमतेचा वापर पूर्वीपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे होत अाहे.
- शिक्षणाच्या क्षेत्रातही ‘एअाय’चा प्रभावी वापर केला जाताे. जसे की व्हिज्युअल, न्यूमरिक्स, व्हर्च्युअल क्लासेसच्या माध्यमातून अापण या क्षेत्रात क्रांती करू शकताे. देवावर माझी श्रद्धा अाहे मात्र मी ती दाखवू शकत नाही. मी अाईला नेहमी सांगताे की ‘माझे सर्व प्रयत्न यशस्वी हाेवाेत अशी तू प्रार्थना कर.’ अाणि तसे हाेतेही... 
-‘एअाय’ शाळांसाठी खूपच लाभदायी ठरू शकताे. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याची मानसिक क्षमता व त्याच्या अावडींबाबत डाटाबेस तयार करता येईल. त्याच्या अाधारे प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष देणे शक्य हाेईल. त्यामुळे ते अापल्याला रुची असलेल्या क्षेत्रात यशस्वी हाेऊ शकतील. तुम्ही म्हणाल यामुळे शिक्षण पद्धतीतील ‘ह्युमन टच’ संपून जाईल. हेही खरे अाहे की,  स्टीफन हॉकिंग्स यांच्यासारखे वैज्ञानिकही ‘एअाय’चा विराेध करू लागलेत. या तंत्रज्ञानाचा गैरवापर हाेऊ शकताे, ही त्यांची चिंताही याेग्यच अाहे. मात्र माझे मत असे अाहे की, ‘जर अापणच हे तंत्रज्ञान बनवत असू तर त्याचा याेग्य वापर हाेईल याचीही काळजी अापणच घेतली पाहिजे. मात्र जसजसा ‘एअाय’चा वापर वाढू लागेल तसतसे चांगल्या व वाईट गाेष्टींसाठी त्याचा उपयाेग हाेऊ शकताे. वाईट पद्धतीने वापर राेखणे हे सुद्धा अाव्हानच असेल. 
- लाेक नेहमीच प्रश्न विचारतात की ‘मी केवळ १२ वर्षांचा असतानाही इतका विचार कसा काय करू शकताे. माझी कल्पनाशक्ती इतकी व्यापक कशी काय?’ मी मात्र एवढेच सांगताे ‘प्रत्येक लहान मुलाकडे व्यापक कल्पनाशक्ती असतेच. एखाद्या पाच वर्षीय मुलाचे ‘न्यूराॅन्स’ माझ्यापेक्षा जास्त असतील, तर साहजिकच त्याची कल्पनाशक्तीही माझ्यापेक्षा जास्तच असेल.


- ‘एअाय’मुळे बेराेजगारी वाढेल, ही शंका निरर्थक अाहे. यामुळे नाेकऱ्या जाणार नाहीत मात्र स्थलांतरित हाेतील. अापण जास्त दर्जेदार कामे करू शकू. जसे, पूर्वी विमान प्रवास सामान्यांच्या अावाक्यात नव्हता, मात्र अाता हळूहळू परिस्थिती बदलत अाहे. अाता सामान्य लाेकही विमान प्रवास करू लागलेत.

बातम्या आणखी आहेत...