आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वस्त्रशैली: फॅशनेबल कपड्यांकडे काश्मिरी लोकांचा कल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काश्मीरमध्ये अशांतता दिसत असली तरी, तेथील कला, परंपरा आजही टिकून आहेत. कपड्यांवर केलेली कलाकुसर एक अद्भुत नमुना आहे. काश्मीरमध्ये सध्या सण-उत्सवांचे दिवस सुरू झाले आहेत. अशातच डिझायनर जोडी उस्मान वताली आणि साजिदा नैन यांनी पारंपरिक डिझाइन केलेल्या कपड्यांची एक साखळी सादर केली आहे. जी भारतातील वस्त्रनिर्माणात अद्भुत व समृद्ध कलाकुसरीचा नमुना दिसून येतो.


 या जोडीने देशभरातील शिल्पकारांचा सहभाग घेतला आहे, ज्यात एप्लिक, एम्ब्रॉयडरी, कलर ब्लॉकिंग, लेअरिंगचे कार्य करते. हा गट हंगामाला अनुसरून कपड्यांची निर्मिती करते. साजिदा सांगते की, कपड्यावर डिझाइन करताना कल्पना, विचार यात उमटवले आहेत. त्यातच वधूचा आत्मविश्वासही यात उपयुक्त ठरेल. १० हजार रुपयांपासून ब्रँडेड कपड्यांची साखळी सुरू होते. या जोडीने २०१४मध्ये या गटाची स्थापना केली होती. विशेष म्हणजे, हे दोघे डिझायनर होते. तेव्हा त्यांनी नुकतीच कायद्याची पदवी प्राप्त केली होती. 


- कॉलेजच्या पहिल्या दिवशीच कपड्यांची रुची : कायद्याचा अभ्यास करीत असताना कॉलेजच्या पहिल्या वर्षातच दोघांचे लक्ष फॅशनेबल कपड्यांकडे गेले होते. तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या रंग व कट्स कपड्यांचा प्रयोग सुरू केला. सुरुवातीला आम्ही स्थानिक टेलरने केलेल्या कपड्यांची स्टाइलची पडताळणी करीत असू. मात्र, यासाठी आमच्या आई-वडिलांनीही प्रोत्साहन दिले. आम्ही शहरात दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला. आमच्याकडे जम्मू-काश्मीरमधील अनेक ग्राहक आहेत, जे वेगवेगळ्या रंग व कट्स असलेले कपडे वापरण्यावर भर देतात. तसेच काश्मीरमधील महिलाही कपड्यांचा पेहराव करण्यातही तरबेज अाहेत. त्यादेखील वेगवेगळ्या शैलींचे व कलाकुसर केलेले कपडे वापरण्यावर भर देतात. याशिवाय ते कपड्यांबाबत फारच चोखंदळ असतात. उस्मान सांगतो की, सध्या काश्मिरात कपड्यांमध्ये फॅशन दिसून येते. फिरन, काश्मिरी आणि कानी शॉल यापेक्षाही वेगळ्या पेहरावावर भर देत आहेत. त्यामुळेच आम्ही कपड्यांतील योग्य कट्स व डिझाइनबाबत गुणवत्ता राखत आहाेत. देशभरातील विविध भागांतून हवामानाला अनुकूल असलेले फॅब्रिक मागवून त्यापासून कपडे तयार केले जातात.

 

काश्मीरची संस्कृती व हस्तशिल्प सर्वांना परिचित आहे. आम्ही टीला प्रकारात सामील करतो. (वेगवेगळ्या रंगातील धाग्यांपासून कपड्यावर तयार केली जाते.) आरी (ज्यात धारदार सुईपासून शिलाई केली जाते.) पश्मिना, सेमी पश्मिना व अन्य गरम कपड्यांवर डिझाइन केली जाते. आजही काश्मीरच्या कारागिरांनी कपड्यांवर केलेली कलाकुसर जिवंत आहे.

 

- अस्मिता अग्रवाल, फॅशन लेखिका, नवी दिल्ली

बातम्या आणखी आहेत...