Home | Divya Marathi Special | news about Tejas uddhav thakare

राजकारणापासून दूर, पण एका गोष्टीत मुलाचे वडिलांच्या पावलावर पाऊल; तेजस ठाकरे

दिव्‍य मराठी | Update - Feb 03, 2018, 07:50 AM IST

दोन वर्षांपूर्वीची गोष्ट. शिवसेनेच्या शाखेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत तेजसही होते. तेजस यांचे मोठे भाऊ आदित्य शाखेत नेहमी

 • news about Tejas uddhav thakare

  दोन वर्षांपूर्वीची गोष्ट. शिवसेनेच्या शाखेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत तेजसही होते. तेजस यांचे मोठे भाऊ आदित्य शाखेत नेहमी येत असत, पण तेजस कधीही येत नव्हते. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचा आणखी एक नातू राजकारणात येऊ शकतो, अशी चर्चा होती. पण तसे झाले नाही. उद्धव यांचे धाकटे चिरंजीव संशोधनाच्या जगात रममाण आहेत.


  कॅमेरा सोबत असलेले तेजस बऱ्याचदा आरे मिल कॉलनी भागात दिसतात. एकेकाळी उद्धव हेही वन्यप्राण्यांची छायाचित्रे काढत असत. तेजस यांच्या संशोधनासंबंधीची एक फाइल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली होती. त्यांना चांदोली राष्ट्रीय उद्यानातील काही खेकडे संशोधनासाठी हवे होते. त्यांनी याआधीही खेकड्याच्या पाच प्रजाती शोधल्या आहेत. त्यापैकी एकाचे नाव ठाकरई असे ठेवले आहे. त्यापैकी काही गुलाबी तर काही जांभळे आहेत.
  तेजस म्हणतात की, खेकड्यांत बदलाची क्षमता वेगवान असते. कुठल्याही वातावरणाशी ते सहज जुळवून घेतात. समुद्रातही ते सहजपणे राहतात. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार प्राण्यांचे जिवंत नमुने दिले जाऊ शकत नाहीत. आता तेजस यांना त्यासाठी परवानगी मिळाली आहे.

  > तेजस ठाकरे, संशोधक

  वय : २२ वर्षे
  वडील : उद्धव ठाकरे (शिवसेना पक्षप्रमुख), आई : रश्मी (गृहिणी)
  चर्चेत का? : खेकड्यांवर संशोधनाची परवानगी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे मागितली होती, ती मिळाली आहे.

Trending