आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14व्या वर्षी आला होता आत्महत्येचा विचार, आता सर्वात प्रभावी महिलांत समावेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२०१३ मध्ये ओप्राला राष्ट्राध्यक्ष पुरस्काराने सन्मानित केले. मनोरंजनाच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल हा सन्मान करण्यात आला. - Divya Marathi
२०१३ मध्ये ओप्राला राष्ट्राध्यक्ष पुरस्काराने सन्मानित केले. मनोरंजनाच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल हा सन्मान करण्यात आला.

वयाच्या १४ व्या वर्षी आपण गरोदर आहोत याची जाणीव ओप्राला झाली होती. ही बाब आई-वडिलांपासून लपवण्याची तिची इच्छा होती. घाबरलेल्या अवस्थेत आत्महत्या करण्याचे विचार तिच्या मनात आले.(त्या दिवसांत माझ्याजवळ इंटरनेट असते तर मी जिवंत राहिले नसते. कारण गुगलवर कोणत्याही कामाची पद्धत विचारली जाऊ शकते,असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.) आत्महत्येचे पाऊल उचलण्यापेक्षा वडिलांना सर्वकाही सांगितलेले बरे याची जाणीव तिला झाली. दिवसामागून दिवस जात असताना अस्वस्था वाढत गेली. अखेर धीर एकवटत तिने वडिलांना सांगितले. वडिलांनी तिला तत्काळ रुग्णालयात नेले. त्याच दिवशी ओप्राने मुलीला जन्म दिला. मात्र, ती दोन आठवडेच जगू शकली.  


या सर्व परिस्थितीला तोंड दिल्यानंतर लहान वयातच ओप्राच्या लक्षात आले की, ती ज्याला अत्याचार समजत होती तो बलात्कार होता. या अत्याचारास ती केवळ वयाच्या नवव्या वर्षी बळी पडली होती. अविवाहित आईसोबत मिलवॉकीमध्ये राहत असताना हे सर्व घडले होते. यादरम्यान, एक चुलत भाऊ, एका चुलत बहिणीचा प्रियकर व वडिलांच्या भावाने शोषण केले. त्या वेळी वडील वेर्नाेन यांच्यासोबत नॅशविलेमध्ये(टेनेसी) होती. मात्र, काळाकुट्ट भूतकाळ मनातून जात नव्हता. त्या वेळी लष्करातील वडिलांनी ओप्राला धीर दिला. म्हणाले, तू आतापर्यंत जे केले तो भूतकाळ होता, मात्र आता तुला तुझे भविष्य निश्चित करावे लागेल. 

 
वडिलांचे शब्द ऐकल्यावर तिने परत मागे वळून पाहिले नाही. ती पुन्हा शाळेत जाऊ लागली. भाषणाच्या स्पर्धेत भाऊ घेऊ लागली. दोन वर्षांनंतर ओप्राने स्थानिक क्लबने आयोजित केलेली स्पर्धा जिंकली. कॉलेजच्या ४ वर्षांच्या शिष्यवृत्तीच्या रूपात पारितोषिक मिळाले. महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी तिने मिस ब्लॅक टेनेसीचा किताब आपल्या नावे केला. यानंतर एका स्थानिक वाहिनीने चौथ्यांदा पाठवलेला प्रस्ताव स्वीकारला आणि प्रसिद्ध शोची निवेदिका झाली.यानंतर काही अन्य शो व एका चित्रपटाच्या निर्मितीनंतर तिची वेगळी ओळख निर्माण झाली. हा थोडा कमी प्रसिद्ध झालेला शो “एएम शिकागो’ होता. ओप्राच्या लोकप्रियतेमुळे त्यास “द ओप्रा विफ्रे शो’ नाव दिलेे. वाढत्या लोकप्रियतेमुळे सन २००० मध्ये ओप्राने डे-टाइम एमी अवॉर्डसाठी नामांकन पाठवणेही बंद केले. कारण शोने ४७ वेळा पुरस्कार जिंकला होता. तिच्या विनंतीवरून हॉलीवूडचा  प्रसिद्ध अभिनेता /अभिनेत्री कार्यक्रमाचा भाग झाले नसेल असा कोणी नसेल, यावरून तिचे महत्त्व कळते. मात्र, तरीही ६३ वर्षीय टीव्ही निवेदिका एक वास्तव विसरू इच्छित नाही. कारण लहानपणी तिचे मित्र केवळ प्राणी असत. सहा वर्षांची होईपर्यंत ओप्रा आजीजवळ मिसिसिपीजवळील फार्म हाऊसमध्ये वाढली होती.  

बातम्या आणखी आहेत...