आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचॅड हर्ले, स्टीव्ह चेन आणि जावेद करीम यांच्या यू-ट्यूबला १४ फेब्रुवारीला १३ वर्षे पूर्ण होतील. त्यांना आधी एक व्हिडिओ डेटिंग साइट तयार करायची होती.
पहिला व्हिडिओ २००५ मध्ये, ४ कोटींनी पाहिला
> यू-ट्यूबवर पहिला व्हिडिओ २३ एप्रिल २००५ ला अपलोड झाला. ‘मी अॅट द झू’ नावाचा हा व्हिडिओ आतापर्यंत ४ कोटी ५६ लाखावर लोकांनी पाहिला आहे. त्यात हत्तीचे चित्रीकरण आहे. त्यात यू-ट्यूबचे जावेद करीम दिसतात.
> यू-ट्यूबच्या व्हिडिओत ५ टक्के व्हिडिओ असे आहेत, ज्यांतून वेबसाइटला ९५ टक्के व्ह्यू येतात. यू-ट्यूबवर १० हजारपेक्षा जास्त व्ह्यू असलेले ५.८ कोटी व्हिडिओ आहेत.
> ५% व्हिडिओतून ९५% व्ह्यू
१.५ अब्ज लाेक दरमहा पाहतात यू-ट्यूब
> १.५ अब्ज नागरिक दर महिन्याला यू-ट्यूबवर व्हिडिअाे पाहतात. जगभरात एवढ्या घरांमध्ये टीव्ही नाहीत.
> यू-ट्यूबवर युजर्स एक तासाहून अधिक वेळ माेबाइलवर घालवतात. २०१६ च्या अखेरीस जगातील नागरिक ४६,००० वर्षांच्या कालावधीएवढा वेळ वर्षभरात यू-ट्यूब पाहत हाेते.
> ८८ देश व ७६ भाषांत लाेक यू-ट्यूब पाहताहेत. जगातील प्रत्येक पाचपैकी एक जण यू-ट्यूब पाहत अाहे.
हे आहेत यू-ट्यूबचे मोठे स्टार
६,०६,५३,७४७ सर्वात जास्त यांचे वर्गणीदार
- स्वीडनचे वेब-बेस्ड विनोदवीर प्युडाइपाइ हे फक्त २८ वर्षांचे आहेत. पण त्यांच्या चॅनलला सध्या ६ कोटींपेक्षा जास्त वर्गणीदार आहेत.
१.६५ कोटी डॉलर सर्वाधिक कमाई
- इंग्लंडच्या डॅनियल रॉबर्टने २०१७ मध्ये १.६५ कोटी डॉलरची कमाई केली. त्याच्या डॅनटीडीएम चॅनलचे १ कोटी ७० लाखांवर वर्गणीदार आहेत.
४.८ अब्ज व्ह्यू सर्वात जास्त हिट हे
- डेस्पॅसिटो गाण्याचा व्हिडिओ सर्वाधिक हिट आहे. त्यात प्युर्टो रिकोचा गायक ल्युइस फॉन्सी आहे. तो आतापर्यंत ४.८ अब्ज वेळा पाहिला गेला आहे.
असे वाढत गेले यू-ट्यूबवर व्हिडिअाे
- यू-ट्यूबवरील पहिला व्हिडिअाे १८ सेकंदांचा हाेता. त्यानंतर सातत्याने व्हिडिअाेंची संख्या वाढत अाहे. दर मिनिटाला यू-ट्यूबवर किती तासांचे कंटेंट अपलाेड हाेत अाहे ते बाजूला दिले आहे...
> स्रोत- ट्यूबलर लॅब्जचा अहवाल; फाेर्ब्स, टेकक्रंच, गुगल ब्लाॅग, स्टॅटिस्टा अादी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.