आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेत 24 वेळा नापास, आज आहे अव्वल ई-कॉमर्स कंपनीचे मालक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॅक मा यांनी कुंग-फू आधारित चित्रपटात काही दृश्ये दिली आहेत. “गोंग शोऊ दाओ’ नावाचा हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित . - Divya Marathi
जॅक मा यांनी कुंग-फू आधारित चित्रपटात काही दृश्ये दिली आहेत. “गोंग शोऊ दाओ’ नावाचा हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित .

लहानपणी ऐकलेल्या कथांमधून आपण ऐकले की “खुल जा सिम-सिम’ उच्चारताच मुख्य पात्र अलिबाबा अमर्याद धन प्राप्त करत असतो. मात्र, जॅक मा यांच्याकडे असा कोणताच फॉर्म्युला नाही. त्यांच्याकडे एकच फॉर्म्युला आहे तो म्हणजे जोश व कधीही हार मानायची नाही. याच जोरावर अलिबाबा ग्रुपचे प्रमुख जॅक मा सध्या जगातील २३ वे व चीनच्या दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची संपत्ती जवळपास २.५६ लाख कोटी रुपये आहे. मा यूनवरून जॅक मा होण्याचा त्यांचा प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला आहे.  


महाविद्यालयात जाईपर्यंत २१ वेळा झाले नापास  
अभ्यास करायच्या दिवसांत मा यूनला अपयशाचा सामना करावा लागला. सुरुवात प्राथमिक शिक्षणापासून झाली. पाचवीत दोन वेळा नापास. महाविद्यालयात प्रवेश परीक्षेत तीन वेळा नापास. असे असताना हार्वर्डमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. एक, दोन नव्हेे १० वेळा हा प्रयत्न होता. प्रत्येक वेळी नशिबी नकारघंटा आली.  


गणितात १२० पैकी १ गुण  
जॅक माची महाविद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत नापास होण्याची कथा रंजक आहे. पहिल्यांदा त्यांना गणितात १२० पैकी केवळ १ गुण मिळाला. नंतर तयारी सुरू केली, परंतु १९ गुण मिळाले. अशा स्थितीत जॅक मा झेजियांग विद्यापीठाच्या ग्रंथालयात जाऊन सूत्रे पाठ करू लागले. तिसऱ्या प्रयत्नात त्यांना ८९ गुण मिळाले. हांगझू टीचर्स कॉलेजसारख्या लहान संस्थेत प्रवेश मिळाला.


केएफसीच्या मुलाखतीत २४ पैकी २३ निवडले, जॅक मांना नाकारले
जॅक मा यांनी जीवनात ३० वेळा नोकरीसाठी अर्ज केला, मात्र प्रत्येक वेळी नकार मिळाला. प्रथम पोलिसाच्या नोकरीसाठी प्रयत्न केले. यामध्ये जॅक मा वगळता ५ पैकी ४ निवडले. अंगकाठी पाहून निवड केली नाही. १९८६ मध्ये केएफसी पहिल्यांदाच शहरात येत होते. नोकरीसाठी २४ उमेदवारांपैकी २३ जणांची निवड झाली आणि जॅक मा यांच्या पदरी पुन्हा अपयश आले. सप्टेंबर २०१६ मध्ये जॅक मांनी त्याच केएफसीची सहायक कंपनी एम चायनामध्ये मोठ्या भागीदारीची खरेदी केली. सध्या एम चायनाचे बाजार भांडवल सुमारे १.७७ लाख कोटी रुपये आहे.  


जॅक नाव विदेशी मित्राने दिले  
जॅक माचा जन्म १० सप्टेंबर १९६४ रोजी चीनच्या हांगझोऊमध्ये झाला. थोडे मोठे झाल्यावर इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ९ वर्षे गाइडचे काम केले. यामुळे विदेशी संस्कृती, पद्धतीची माहिती झाली. यादरम्यान एका विदेशीशी मैत्री झाली. त्याच मित्राने जॅक मा नाव दिले. याचे कारण म्हणजे, विदेशींना त्यांचे खरे नाव मा यून बोलताना व लिहिताना अडचणीचे ठरत होते.  

बातम्या आणखी आहेत...