आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्सन ऑफ द इयर, 2017: डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्षांच्या कामाच्या पद्धतीत दिसत आहेत बदल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोली बॉल - उजाडण्यापूर्वीच अनेक लोकांना आपला फोन पाहण्याची घाई असते. जगातील काही व्यक्ती थोड्याशा भयाने तर काही आशेने आपला फोन तपासतात. जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एकाने ट्विट केले आहे वा नाही, हे त्यांना जाणून घ्यायचे असते. ते ट्विटरच्या माध्यमातूनच सांगतात की टीव्हीवर काय पाहत आहेत. कोणत्या बाबीविषयी संताप आहे.

 

सामान्य माणसाला विचार करण्यासाठी नवा मुद्दा देतात. ट्विटरच्या माध्यमातून ते माध्यम कंपन्यांना परवाना रद्द करण्याची धमकी देतात. त्यांच्या संतप्त ट्विटच्या रडारवर बहुतांश वेळा माध्यमे असतात. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकीर्दीची ही आेळख आहे. नवी धोरणे आणि कायदे निर्माण करणे आणि जगाच्या समोर नवा मार्गदर्शक आराखडा ठेवण्याच्या पारंपरिक मापदंडांचे आकलन केल्यास डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्राध्यक्षपदाचे पहिले वर्ष घटनाप्रधान होते. ते बहुराष्ट्रीय व्यापार सामंजस्यातून बाहेर पडले आहेत.

 

उ. कोरियाशी अणुयुद्धाची शंका वाढली आहे. त्यांनी  सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती नियुक्त केला आहे. तो न्यायपालिकेचे स्वरूप बदलत आहे. त्यांनी जुने कायदे रद्द ठरवले. वर्षअखेरीस एक नवा कर लागू करण्याचा त्यांचा प्रयत्न असून अमेरिकेच्या सर्वच क्षेत्रांवर त्याचा परिणाम दिसेल. व्यावसायिक कराचा दर कमी होईल. राजकोशीय तूट वाढेल. राष्ट्राध्यक्ष म्हणून प्रभाव निर्माण करण्यात ट्रम्प यांना यश आले. राष्ट्राध्यक्षपदासाठी ट्रम्प यांची दावेदारी आल्याने राजकारणाचे नियम-कायदे बदलले. आता ते राष्ट्राध्यक्षपदावरील व्यक्तीच्या काम करण्याच्या पद्धतीत बदल आणत आहेत.  पारंपरिक मित्रराष्ट्रांची तसेच लोकशाही मूल्यांची साथ त्यांनी साेडली. व्हाइट हाऊसमध्ये त्यांचा प्रवेश एखाद्या उद्योजकाच्या डामडौलासारखा झाला. यामध्ये हितसंबंधांतील आंतरद्वंद्वदेखील आहे. 

बातम्या आणखी आहेत...