आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्सन ऑफ द इयर, 2017: किम जोंग उन, उ. कोरियाला नियंत्रणात ठेवण्याचा उपाय नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॉर्मन पर्लस्टीन- २०१७ मध्ये उत्तर कोरियाच्या वास्तवाविषयी जग अनभिज्ञ असल्याचे सिद्ध झाले. येथील तरुण हुकूमशहा किम जोंग उन यांनी अमेरिकेवर अणुहल्ल्याची क्षमता अर्जित केली आहे. या वर्षी ४ जुलै रोजी किम यांनी पहिले क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले. सप्टेंबरमध्ये अण्वस्त्र चाचणी घेतेली. नंतर २९ नोव्हेंबरच्या सकाळी क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले. ते वॉशिंग्टन डीसी, न्यूयॉर्कपर्यंत पोहोचू शकते.

 

उत्तर कोरिया संपूर्ण जगासाठी धोकादायक आहे. मात्र किम आणि त्यांच्याजवळील शस्त्रास्त्रसाठा आता एक गूढ बनले आहे. उत्तर कोरियाजवळ ६० अण्वस्त्रे, जैविक आणि रासायनिक शस्त्रे आहेत. १० लाख जवान व अधिकारी त्यांच्या सैन्यात असून जगातील ही चौथ्या क्रमांकाची मोठी सेना आहे. यांचे रॉकेट, प्रक्षेपक एक तासाच्या आत द. कोरियाची राजधानी सेऊलला ढिगारात बदलू शकतात. त्यांनी सायबर शस्त्रात मोठी गुंतवणूक केली आहे. किम आपल्या पणजोबांप्रमाणे एकीकृत कोरियावर वर्चस्व मिळवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत. संयुक्त राष्ट्राच्या मते किम यांच्या शासनकाळात मानवाधिकारांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाले आहे. अण्वस्त्र सज्जतेने झपाटलेल्या हुकूमशहाशी कसे लढावे याविषयी ट्रम्प प्रशासन संभ्रमात आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांना हल्ल्याची धमकी देतात, तर कधी मैत्रीचा हात पुढे करतात. किम यांची सत्ता अमेरिकी हल्ल्याच्या भयावर तग धरून आहे. 

बातम्या आणखी आहेत...