Home | Divya Marathi Special | Rajesh shah write about BUDGET 2018

दिव्य मराठी विशेष; व्यवस्था सुधारण्याच्या उपायांवर अधिक भर

रशेष शाह | Update - Feb 02, 2018, 03:34 AM IST

२०१८-१९ च्या अर्थसंकल्पातून हे स्पष्ट होते की, सरकारने आर्थिक क्षेत्रातील सुधारणांच्या उपायांवर अधिक भर दिला आहे. मागच्य

 • Rajesh shah write about BUDGET 2018

  २०१८-१९ च्या अर्थसंकल्पातून हे स्पष्ट होते की, सरकारने आर्थिक क्षेत्रातील सुधारणांच्या उपायांवर अधिक भर दिला आहे. मागच्या तीन वर्षांपासून अशा प्रकारचे प्रयत्न जारी आहेत.

  अर्थसंकल्पात सामाजिक सुरक्षेच्या आराखड्याच्या विस्तारासोबतच आर्थिक क्षेत्राचा पाया आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी सरकारने जनधन, जीवनज्योती आणि सुरक्षा विमा योजना सुरू केली होती. त्याला व्यापक स्तरावर यश मिळाले.प्रत्येक कुटुंबाला राष्ट्रीय आरोग्य योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांचा विमा देण्याची बाब मला सर्वाधिक चांगली आणि प्रभावी वाटली.


  या योजनेच्या कक्षेत े एक तृतीयांश कुटुंबीय येणार असून ही घोषणा या अर्थसंकल्पाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. याशिवाय सरकारने लघु व मध्यम स्तराच्या उद्योगांना (एमएसएमई) सहज आर्थिक मदत उपलब्ध करून देणे व त्यास चालना देण्याचे प्रयत्न केले. याचा लाभ प्रत्येक व्यक्तीसोबत अर्थव्यवस्थेलाही होईल. या उद्योगांना ऑनलाइन कर्ज स्वीकृतीची सुविधा मिळावी यासाठी यात बँकांकडूनही सहकार्याची अपेक्षा केली . असे झाल्यास बँकांचे मुद्रा व्यवस्थापन उत्तम होईल. याशिवाय, आर्थिक कामकाजाशी संबंधित तंत्रज्ञानाच्या वापरामुळे छोट्या उद्योगांना दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या स्वीकृतीसाठी कमी वेळ लागेल. रोखे बाजारासंदर्भातील उद्योगांना प्रोत्साहित करणारा प्रस्तावही प्रशंसनीय असून यामुळे बँकांवरील बोजा कमी होईल आणि त्या लघुउद्योगांवर लक्ष केंद्रित करू शकतील. कॉर्पोरेट क्षेत्राचे कर्ज बाजार अधिक मजबूत करण्याची मागणी फिक्कीने खूप आधीच केली होती. दिवाळखोरी कायद्यात मागच्या वर्षी करण्यात आलेल्या सुधारणा खूप महत्त्वाच्या आहेत. पण याच्या करासंबंधी मुद्दे जटिल बनले आहेत. शिवाय, सरकारने वित्तीय प्रणालीतील पारदर्शकता वाढवण्याच्या दिशेने केलेले उपाय उत्तम आहेत. यात अवैध व्यववहाराला चालना देणाऱ्या क्रिप्टोकरन्सीला प्रणालीतून वगळण्याची तरतूद आहे.


  सरकारने नवे राष्ट्रीय सोने धोरण आणणे व गोल्ड एक्स्चेंजची व्यवस्था आणण्याची सांगितलेली बाब स्वागतार्ह . यामुळे ग्राहक गोल्ड डिपॉझिट अकाउंट उघडण्याप्रती आकर्षित होतील. फिक्कीने यासंदर्भात सरकारला सल्ला दिला होता व बाजूही मांडली होती.

  - रशेष शाह, अध्यक्ष, फिक्की

Trending