आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घृणेचा त्याग, काँग्रेसचा विलाप आणि भाजपला अचानक आली मित्रांची आठवण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेव्हा विरोधी विचारसरणींत संवाद होतो तेव्हा मोठा वादविवाद होतो. संवादाचे हेच सौंदर्य आहे. या आठवड्यात तेच झाले. प्रणव मुखर्जी बोलले. इतिहास खुला केला. पन्नास वर्षांचा अनुभव बोलला. घृणेच्या विरोधात इशारा दिला- त्या संघटनेच्या समारंभात जिची प्रणवदांची मातृ संघटना काँग्रेस द्वेष करते. माजी राष्ट्रपतींनी नागपूरमधून स्वत:ची उंची दाखवून दिली.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही उंची वाढली. विरोधाच्या अग्रस्थानी असलेल्या वरिष्ठ नेत्याचे म्हणणे सर्वांनी ऐकले. आणि या कार्यक्रमानांतर घोषणाही केली की, या कार्यक्रमानंतर काही बदलणार नाही. संघ, संघच राहील, प्रणव, प्रणवच राहतील.


पण काँग्रेसच्या विलापाने आश्चर्यचकित केले. राष्ट्रपती असताना प्रणवदा पक्षातीत राहिले. राष्ट्रपती भवनात त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना दोन वेळा भोजनासाठी निमंत्रित केले. मग एक नागरिक म्हणून त्यांना योग्य वाटेल त्या ठिकाणी त्यांनी का जाऊ नये? अनेक माजी केंद्रीय मंत्र्यांनी त्यांची कठोर निर्भर्त्सना केली आणि नंतर मात्र त्यांच्या भाषणातील अनेक चांगल्या गोष्टींची उजळणीही केली.


संवाद तर संपत चालला आहे. राजकीय पक्ष, शत्रुत्व ठेवत आहेत. राजकीय स्पृश्यास्पृश्यता कुठे संपली? ज्या देशात एखाद्या निश्चित विचारसरणी असलेल्या संघातून जन्मलेल्या भाजपचे स्पष्ट बहुमत असणारे सरकार असेल- तर त्याला अस्पृश्य कसे मानायचे? अशाच प्रकारे ज्या पक्षाने स्वातंत्र्यापासून आतापर्यंत जनादेश मिळवला होता- त्या काँग्रेसपासूून ‘मुक्त’ देशाची कल्पना का करावी?


आता तर्क संपला आहे. राजकीय वाद-विवादच नाही. रस्त्यावर संघर्ष नाही. फक्त घृणा-आधारित विरोध आहे. याच दरम्यान राहुल गांधींना संघाला ‘गांधींचा हत्यारा’ म्हटल्याबद्दल न्यायालयात हजर व्हायचे आहे. याच दिवसात अमित शहा यांनी भाजपविरुद्ध ‘कुत्रे-मांजरे-साप-उंदरे’ सर्व जण एकत्र झाले आहेत असे म्हटले होते.


संवाद, शत्रूच काय पण मित्रांशीही कमी आहे- हेच या आठवड्यात दिसले. आता भाजपविरुद्ध पहिल्यांदा लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना या मित्रपक्षाने उमेदवार उभा केला होता. शिवसेना हरली तेव्हा भाजप त्यांच्याशी चर्चा करण्यास पोहोचला. शिरोमणी अकाली दलाची चर्चेसाठी भेट घेतली. मग प्रमुख घटना कुठे गेली?


मित्रांशी संवाद विरळ होत जाणे अनेक गोष्टींचा संकेत देते. मनातील गोष्ट मनातच राहून जाते.
विरोधी विचारांच्या चर्चेमुळे काय झाले नाही? ज्या घटनेवर राष्ट्रीय चिंतन झाले- त्यापेक्षा जास्त मोठे मिलन याआधीही पाहिले आहेत. जनसंघ आपल्या जन्मजात विरोधी समाजवाद्यांना जिंकून देत होता. जनता पक्षात प्रत्येक विरोधी पक्ष एकत्र होते आणि सर्वाधिक परस्परविरोधी सरकार तर विश्वनाथ प्रताप सिंह यांचे होते. त्याला भाजप आणि कम्युनिस्टांचा पाठिंबा होता. त्याला ‘थ्री लेगेड, फोर हेडेड’ म्हटले गेले होते. हेच भाजपविरोधी पक्ष काँग्रेससोबत मिळून करत होते/आजही करत आहेत.


यक्ष युधिष्ठिराला म्हणतो उत्तम धन म्हणजे शास्त्रार्थ. कारण त्यामुळे काही नवी दृष्टी मिळते. विरोध ही दुसरी बाजूच असते. हे दिसले आहे.

बातम्या आणखी आहेत...