आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेका, हट्ट ठेवला तर ज्ञानाची पोपटपंचीच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बडोदा येथे पार पडलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात श्याम मनोहर यांच्या सत्कारानिमित्त त्यांनी अनेक मुद्यांवर प्रकाश टाकला. त्याचा हा गोषवारा...


- गणित, नैसर्गिक विज्ञाने, समाजशास्त्रे, इतिहास, शेती, पर्यावरण विज्ञान, अध्यात्म ही ज्ञानक्षेत्रे आहेत. सर्व कला, साहित्य, कथा, कादंबरी, कविता ही ज्ञानक्षेत्रे आहेत. 
- गणिताचे तत्त्व काय असतं? इतिहासाचे तत्त्व काय असते? अध्यात्माचे तत्त्व काय असते? अशा तत्त्वांची चर्चा आपल्या समाजात आहे काय?
- गणिती इतिहासकार, शास्त्रज्ञ, कलावंत, अाध्यात्मिक व्यक्ती, लेखक, कवी.. हे लोक कसे असतात? कसे काम करतात? त्यांचे मन, बुद्धी कशी असते? याची चर्चा आपल्या समाजात आहे काय?
- डावे, उजवे.. राजकारण याच्या चर्चा होऊ द्या.. ज्ञान म्हणजे काय? याची चर्चा नको काय? ज्ञान म्हणजे काय? याची चर्चा, मीमांसा साहित्यातही, कादंबरी कवितांमध्ये नकाे काय?
- कुठल्याच ज्ञानक्षेत्रात प्रतीके, कर्मकांडे हे पुरेसे नसते. ज्ञानच महत्त्वाचे असते. ज्ञान केवळ मिळवायचे नसते. ज्ञान निर्माण करायचे असते. 
- उच्च दर्जाचे ज्ञान निर्माण करणे अवघडे. ज्ञान निर्माण करणे हे सोपे आहे.  असा भ्रम समाजात पसरून कसा चालेल? गोंधळ  वाढेल?
- आस्तिकांनी आस्तिकपणाचे तत्त्व समाजाला सांगावे. नुसते सांगावे. नास्तिकांनी नास्तिकपणाचे तत्व समाजात सांगावे. 
- लिहावे. त्रोटक लिहू नये. सविस्तर, समग्र आणि कठोर  प्रामाशिणकपणे लिहावे. ग्रंथच हवे. कथा कविता, कादंबऱ्या हव्यात. त्यातून ज्ञानमार्ग निर्माण होतात. 
- ज्ञान निर्माणाचे अनेक प्रकार असतात. ज्ञान अमूक प्रकारेच निर्माण करावे, असा हेका, हट्ट ठेवला तर ज्ञानाची पोपटपंची होते. 
- विश्वरहस्य, जीवनरहस्य, जीवनाचा अर्थ, मृत्यू, हिंसा, कामजीवन, उथळपणा, पावित्र्य, दहशत, सत्ताकांक्षा, जगण्यातल्या अशा नाना अवस्थांसंबंधी गहन प्रश्न निर्माण करावेत, समाजात उभे रहावेत. गहन प्रश्न आणि  त्याची उत्तरे मिळण्याचे पिढ्यान‌्पिढ्याचे कसून प्रयत्न हे समाज प्रगल्भ होण्यासाठी आवश्यक असते. गहन प्रश्नांनी संस्कृती सुरू होते आणि उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नांनी संस्कृती जिवंत राहते.
- गहन  प्रश्नाशी निगडित झाल्याने माणसातला वाकडेपणा उफाळून येत नाही.
- ग्रंथ वाचनाची साहित्य वाचनाची सवय हवीच. वर्तमानपत्र वाचन, टीव्ही पाहणे, ऐकणे पुरसे नाही. 
- समाजात वाचनालये हवीत. मोफत हवीत. सुंदर हवीत, प्रशस्त हवीत, सर्व प्रकारच्या ग्रंथांनी सुसज्ज हवीत. वाचनालयात जावेच, असे वाटले, अशी हवीत. शहरातून, गावातून, छोट्या वाडीतून सर्वत्र हवीत. आपला देश वाचनालयांचाही देश व्हायला हवा. वाचनालये अशी का नाहीत? स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षात वाचनालये का नाहीत?
- पुढच्या निवडणुकांच्या वेळी सर्व राजकीय पक्ष त्याची घोषणापत्रिका काढती त्यावेळी सर्व राजकीय पक्ष घोषणापत्रिकेत सुंदर, प्रशस्त, ग्रंथसमृद्ध वाचनालयांचा मुद्दा घेतील का? पूर्ण करतील का? 
- गणिती, इतिहासकार, कलावंत, लेखक, कवी, तत्वज्ञानी खरोखर समाजाला हवेत का? हवेत, असे पटकन उत्तर येइल.., गणिती, लेखक कवी  वगैरे हवेत अशी समाजाला तळमळ आहे का?
स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे उलटतील.. पूर्ण वेळ लेखन करत लेखकाला जगता येईल. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे काय? शेतकरी आणि साहित्यकार आपल्याला कामातून जगातील अशी परिस्थिती का नाहीये?
- साहित्याचे प्रकाशन समारंभ, संमेलने होतात. चर्चासत्रे, भाषणे होतात. नागरिकाला एखाद्याप्रसंगी कादंबरीतील, कवितेतील एखादी ओळ, प्रसंग, संवाद आठवतो, आणि नागरिक उद‌्धृत करतो, असे घडते का?
- राजकारणी त्यांच्या भाषणातून कधी कादंबरी वगैरेतील काही उल्लेख करताना दिसते का? हां, अर्थसंकल्प विधानसभेत, लोकसभेत मांडताना किरकोळ, बिनगंभीर कवितेतले उल्लेख करतात.
- याचा अर्थ, साहित्य समाजात खोलवर पोचलेले नाही किंवा दुसरा अर्थ उल्लेख खरावा असे साहित्यात काही नाहीये. 
- खरे काय आहे?  अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, वीज, आरोग्याची 
साधने ही जगण्याची तत्वे आहेत. जीवनाचा अर्थ काय? हे सुद्धा जगण्याचे तत्त्व आहे. अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी पहिले तत्व आहे. आणि जीवनाचा अर्थ काय? हे दुसरे नंतरचे तत्व आहे, असे मांडले जाते. 
- प्रत्येक नागरिकाने अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी आणि जीवनाचा अर्थ काय हे करायचे असते. 
- जीवनाचा अर्थ काय? हे शोधण्याचा प्रत्येक 
नागरिकाला स्वातंत्र्य आहे. असे स्वातंत्र्य हा खऱ्या लोकशाहीचा गाभा आहे. 

बातम्या आणखी आहेत...