आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१९६९ ची घटना आहे. अमिताभ मुंबईत जम बसवण्यासाठी झगडत होते. अशात जलाल आगा या मित्राने त्यांच्या आवाजाचा वापर काही जाहिरातींमध्ये केला. जलाल यांची कंपनी विविध भारतीसाठी जाहिरात तयार करत होती. अमिताभ यांना प्रत्येक कार्यक्रमासाठी ५० रुपये मिळत होते. यादरम्यान ऑल इंडिया रेडिओने त्यांचा आवाज नाकारला होता. या काळात अमिताभ यांनी अनेक दिवस टाेस्ट खाऊन काढले आणि रात्री मरीन ड्राइव्हवर.
जवळजवळ खचलेल्या स्थितीत अचानक ‘सात हिंदुस्तानी’ चित्रपटाने त्यांना ब्रेक दिला. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. मात्र, चांगल्या व्यक्तिरेखेसाठी त्यांना पुन्हा २ वर्षे ताटकळत बसावे लागले.
यादरम्यान ते अभिनेता मेहमूदचा मोठा भाऊ अन्वरसोबत राहत. मेहमूद यांनी त्यांना ‘बॉम्बे टू गोवा’साठी करारबद्ध केले. त्यांनी निर्माते मित्र जी. एम. रोशन यंाच्याशी अमिताभ यांची भेट घालून दिली. रोशन यांनी अमिताभ यांना चित्रपट “दुनिया का मेला’साठी साइन केले आणि ३० हजार रुपये मानधन दिले. मात्र, अविश्वास व्यक्त करत त्यंानी करार रद्द केला. जवळपास डझनभर फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर त्यांना “जंजीर’ मिळाला. यातूनच त्यांची ‘अँग्री यंग मॅन’ प्रतिमा आकारास आली.
वयाच्या ५२ व्या वर्षी संघर्षाचा दुसरा टप्पा आला. अमिताभ आर्थिक संकटात सापडले होते. १९९५ मध्ये त्यांनी अमिताभ बच्चन कॉर्पाेरेशन लिमिटेड कंपनी सुरू केली होती. हॉलीवूड स्टुडिओजच्या धर्तीवर कॉर्पाेरेट पद्धतीने करण्याच्या उद्देशाने ती स्थापन केली होती. कंपनीने १५ चित्रपटही प्रदर्शित केले होते. प्रत्येक चित्रपटाचा खर्च ३ ते ८ कोटी होता. एबीसीएलने पहिल्यांदा मोठा धमाका १९९६ मध्ये केला. एबीसीएलने पहिल्यांदाच मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे भारतात आयोजन केले. कोणतेही नियोजन वा व्यवस्थापनाशिवाय चाललेली कंपनी दुसऱ्या वर्षी तोट्यात आली. चार वर्षांत दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आली. कंपनीवर ९० कोटी रुपयांचे कर्ज होते. यानंतरच्या एका मुलाखतीत अमिताभ म्हणाले, एबीसीएल सोडून द्यावे, असा अनेकांनी सल्ला दिला होता. मात्र, तिच्याशी मी जाेडला गेला होतो म्हणून लोकांनी पैसा गुंतवला होता. त्यामुळे तिला सोडून देऊ शकत नव्हतो.
एके दिवशी सकाळी यश चोप्रा यांचे घर गाठले. त्यांनी ५८ व्या वयात ‘मोहब्बते’ चित्रपटातून पुनरागमनाची संधी दिली. मी व्यावसायिक कार्यक्रम, टीव्ही शो सुरू केले. २००० मध्ये स्टार प्लसने ‘कौन बनेगा करोडपती’ शोसाठी करार केला. यामुळे कर्जफेड करण्यास मदत मिळाली. २००३ मध्ये अमिताभ यांनी आपल्या ६१ व्या वाढदिवसाच्या पार्टीत नवी कंपनी एबी कॉर्प सुरू करण्याची घोषणा केली. या पार्टीत ते म्हणाले, संकटाच्या गर्तेत होतो तेव्हा अमरसिंग माझी ताकद होते. त्यांनी अनिल अंबानी व सहारा ग्रुपचे सुब्रत रॉय यांच्याशी चर्चा घडवून आणली. त्यांनी आर्थिक नव्हे, नैतिक पाठबळ दिले. याची परिणती म्हणून अमिताभ यांची सध्याची संपत्ती अंदाजे ७०० कोटी रुपये आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.