आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२०१९ मध्ये लोक नेहरू-इंदिरांनी काय केले हे नव्हे, तर भाजपने दिलेल्या आश्वासनावर मतदान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोदी सरकारची धोरणे, कार्यपद्धतीवर टीका करणारे माजी अर्थ व परराष्ट्रमंत्री ८१ वर्षीय यशवंत सिन्हा यांच्याशी भास्करच्या धर्मेंद्रसिंह भदौरिया यांनी संवाद साधला...

 

- प्रश्न : २०१९ निवडणुकीत तुमची भूमिका?  
उत्तर : मी निवडणूक लढवणार नाही, ना एखाद्या पक्षाचा प्रचार करणार. मुद्द्यांवर मात्र माझे मत मांडेन, मग ते सध्याच्या सरकारच्या बाजूने असो की विरोधात.  


- प्रश्न : तुम्ही तयार केेलेला मंच प्रत्यक्षात उतरलेला नाही.. कार्यकर्ते कसे येतील?  
उत्तर : दिल्लीत ३० जानेवारीला म्हणालो होतो की, त्यात कुणी पदाधिकारी वा सदस्य नसतील. हे एक आंदोलन आहे.   


- प्रश्न : अचानक तुम्ही मोदी सरकारच्या विरोधात कसे गेलात?  
उत्तर : बरेच काही चुकीचे घडत आहे त्याविरुद्ध मी आवाज उठवला. झाले असे की पक्षात असून पक्षाविरुद्ध बोलत होतो म्हणून पक्षच सोडून दिला.  


- प्रश्न : डॉ. मनमोहनसिंग यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून पंतप्रधानांनी कर्नाटकात जी भाषा वापरली ती वापरायला नको होती असे सांगितले. यावर तुमचे मत काय?  
उत्तर
: कधी कधी जीभ घसरते. आमचीही घसरली आहे. मात्र, पंतप्रधानांची घसरू नये. मर्यादेत राहून वस्तुनिष्ठपणे बोलावे. सत्याची कास सोडू नये. 

  
- प्रश्न : मग कर्नाटकात पंतप्रधानांनी मर्यादेचे ध्यान ठेवले नाही, तथ्यांवरही बोलले नाहीत?  
उत्तर
: मी फक्त कर्नाटकबाबतच बोलत नाहीये. पंतप्रधानांनी जितकी काही भाषणे दिली आहेत त्यात दोन गोष्टी झाल्यात. पहिली, मर्यादेचे उल्लंघन आणि दुसरी - तथ्ये सोडून बोलणे.  गुजरात निवडणुकीत मनमोहनसिंगांवर आरोप केला की, त्यांचे पाकिस्तानसोबत संगनमत आहे. हे सर्वस्वी चुकीचे आहे. मणिशंकर अय्यर यांनी मला भोजनासाठी बोलावले होते तेव्हा तर मीही भाजपमध्येच होतो. मी जाऊ शकलो नाही. दिल्लीत असलो असतो तर नक्कीच गेलो असतो. मग माझ्यावरही आरोप झाला असता की मी पाकिस्तानसोबत संधान साधून षड््यंत्र रचतोय... गुजरात निवडणुकीत! नुकतेच कर्नाटकात जनभावना भडकवण्यासाठी ते म्हणाले होते की, काँग्रेसने जनरल थिमय्या व जनरल करिअप्पा यांच्यासोबत गैरवर्तन केले. ते जुनी मढी उकरत आहेत, सन १९४८ व १९५० ची. ती तथ्यात्मक दृष्टिकोनातून चूक आहेत. थिमय्या १९४८ मध्ये कमांडर इन चीफ नव्हते, हे पद कुण्या इंग्रजाकडे होते. मी एक महत्त्वाचे सांगू इच्छितो की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जनता पंडित नेहरू, इंदिरा गांधींनी काय केले, हे पाहून मतदान करणार नाही. ते पाहतील की, भाजपने काय आश्वासने दिली, त्यांचे काय झाले? हाच मुख्य मुद्दा असेल. त्यावर त्यांनी बोलावे.   


- प्रश्न : ८० व्या वर्षीचा नोकरी इच्छुक उमेदवार, असे अरुण जेटलींनी म्हटल्यानंतरच तुम्ही इतके नाराज झालात?  
उत्तर
: नाही. मी एका लेखात देशाच्या आर्थिक स्थितीवर टिप्पणी केली. त्यावरून मोठा वाद झाला. यानंतर तो खालच्या पातळीवर पोहोचवण्याचे प्रयत्न झाले. दुसऱ्या दिवशी माझ्या मुलानेही एक लेख लिहिला. त्यावरून बाप-लेकात भांडणे झाल्याचा अपप्रचार करण्याचाही प्रयत्न झाला. मी मात्र त्यापासून स्वत:ला वाचवले. दुसरे म्हणजे - मला नोकरी (पद) हवंय याची बोंबाबोंब करायची, जेणेकरून लोक मुद्द्यांपासून भरकटतील. मी दोन्हीही फेटाळल्या. मीच नव्हे, सर्वांनीच या गोष्टी नाकारल्या.

 

- प्रश्न : मोदी सरकारमध्ये महत्त्वाचे पद मिळाले नाही म्हणून तुम्ही आणि अरुण शौरी टीका करता, असेही म्हटले जात आहे.  
उत्तर
: ज्याला माझी पृष्ठभूमी माहीत नाही,अशीच व्यक्ती असे म्हणेल. पहिले म्हणजे मी आयएएसची नोकरी सोडली तेव्हा माझी नोकरीची १२ वर्षे शिल्लक होती. मी तेव्हाच्या काँग्रेस या सत्ताधारी पक्षात गेलो नव्हतो. तेथे १९८४ मध्ये निवडणूक जिंकून मी मंत्री झालो असतो. मी विरोधी पक्षात गेलो, जनता पार्टीचा सदस्य झालो. नंतर १९८९ मध्ये व्ही. पी. सिंह यांचे सरकार स्थापन झाले. तेव्हा राज्यमंत्रिपद देत आहेत असे समजल्याने मी राष्ट्रपती भवनातून परत आलो. मी राज्यमंत्री व्हावे हे मला अनेक कारणांमुळे पटले नाही. त्यामुळे (हसत) माझा इतिहास असा आहे की मी पद सोडले नाही, पदामागे धावलोही नाही. मुद्द्यांचे महत्त्व असते हे कदाचित त्यांना समजलेच नसावे.  


- प्रश्न : तुम्हाला मोदी सरकारमध्ये उणीव जाणवते, मोदींमध्ये उणीव जाणवते की अरुण जेटली यांच्यात?  
उत्तर
: मोदी हा मुद्दा नाही हे मला स्पष्ट सांगायचे आहे. देशातील विद्यमान परिस्थिती आणि मोदी सरकारची धोरणे हे मुद्दे आहेत. आम्ही ना मोदींना विरोध करत आहोत, ना जेटलींना. मी व्यक्ती हा मुद्दा मानत नाही. त्यामुळे धोरणे आणि अपयशाला विरोध करीन.  


- प्रश्न : राजकारणात वयाची कमाल मर्यादा निश्चित व्हावी, असे तुम्हाला वाटते का?  
उत्तर
: मलेशियात ९२ वर्षीय महाथीर मोहंमद पंतप्रधान झाले. कर्नाटकात येदियुरप्पा मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार होते, त्यांचे वय ७५ वर्षांपेक्षा जास्त आहे. आमच्या अॅटर्नी जनरलचे वय ८४-८५ पेक्षा जास्त आहे. वय किती हे महत्त्वाचे नाही. आरोग्य कसे आहे हे महत्त्वाचे आहे. वय हा फक्त आकडा आहे.  


- प्रश्न : मोदी सरकारची पाच मोठी अपयशे कोणती, असे तुम्ही मानता?  
उत्तर
: ‘ही घोषणा होती’ असा मार्ग खूप आधीच भाजप अध्यक्षांनी काढून दिला. आता निवडणूक घोषणा कोणत्या आणि खऱ्या घोषणा कोणत्या, हे जनतेला जाणून घ्यायचे असेल तर काय करणार? पहिले, विदेशातून काळा पैसा आणू, १५-१५ लाख सर्वांना देऊ, असे मोदी म्हणाले होते. ते तर कुठेच दिसत नाही. दुसरे, त्यांनी म्हटले होते की, दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या युवकांना देऊ. नोकऱ्या घटत आहेत, वाढत नाहीत. तिसरे, ‘सबका साथ-सबका विकास’ ही घोषणा होती. विकास होत नाहीय. चौथे, देशात हिंसेचे, बदल्याचे वातावरण तयार होत आहे. हे वातावरण अनेक शतकांपासूनच्या देशाच्या मूल्यव्यवस्थेच्या अगदी विपरीत आहे. आता पाहा, देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला सरकार कशी वागणूक देत आहे? सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ चार न्यायमूर्ती पत्रपरिषद घेऊन जनतेला सांगतात की, लोकशाही धोक्यात आहे. आम्ही आमचे कर्तव्य केले. तुम्हाला सांगितले. आता विचार करा. मग देशाची जनता गप्प बसून राहील का? आम्ही चूप बसू का? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी आजपर्यंत असे म्हटले नव्हते. आणीबाणीतही असे काही म्हटले नव्हते, आज म्हणत आहेत. सरकारचे अपयश मोजण्यासाठी तर मोठी यादी असेल. देशात असा कोणीही मंत्री आहे का, अगदी ज्येष्ठासहित, की त्यांची काही भूमिका उरली आहे?


प्रश्न : मंत्रिमंडळाच्या कोणत्याही सदस्यावर भ्रष्टाचाराचा आरोप समोर आला नाही?
उत्तर
: (हसत) आतापर्यंत आला नाही. २००४ ते २००९ पर्यंत यूपीए-१ च्या सरकारवरही २००९ च्या आधीपर्यंत भ्रष्टाचाराचा आरोप झाला नव्हता. २००४ ते २००९ दरम्यानच्या भ्रष्टाचाराचा खुलासा २००९ नंतर झाला. त्यामुळे सध्या कोणताही निष्कर्ष काढू नये, पण भ्रष्टाचार झाला आहे. नीरव मोदी, मेहुल चौक्सी, बँक घोटाळे हे सर्व होतच आहे. ते सर्वांसमोर आहेत.


- प्रश्न : यूपीएच्या वेळी सीबीआयला पोपट म्हणत होते. आता सीबीआय, प्राप्तिकर विभाग आणि ईडीची भूमिका कशी आहे, असे तुम्हाला वाटते?
उत्तर
: प्राप्तिकर, सीबीआय, ईडी तिन्हीही पोपटापेक्षा वाईट झाले आहेत. कुत्र्याला कसे कोणावर सोडले जाते की भुंका, चावा. त्याचप्रमाणे त्यांना सोडले जाते आणि ते आदेशाचे पालन करत आहेत. एखाद्याला त्रास द्यायचा असेल-तुम्हाला, मला किंवा आणखी कोणाला, तर एखादी केस सुरू करा. जी व्यक्ती सार्वजनिक जीवनात आहे त्याच्याबद्दल जर म्हटले गेले की, ‘त्याने मोठा घोटाळा केला आहे,’ तर हे खरेच असेल, असा विश्वास लोक ठेवतील. आणि आठ वर्षांनी वस्तुस्थिती समोर येईल तोपर्यंत लोक ते विसरतीलही. काँग्रेसने जॉर्ज फर्नांडिस यांना कफनचोर म्हटले होते. चौकशी पूर्ण झाली. ते निर्दोष ठरले. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...