आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खलिस्तानची मागणी अभिव्यक्ती स्वातंत्र्य; पण दहशतवादासाठी कॅनडाचा वापर करू देणार नाही; ट्रुडो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सात दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या दौऱ्यात खलिस्तानच्या समर्थनावरून वाद निर्माण झाले. विशेषत: पंजाबमध्ये हा मुद्दा खूप गाजला. ट्रुडो यांनी पंजाब दौऱ्यात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी भास्करचे प्रतिनिधी प्रमोद कौशल यांनी नवी दिल्ली येथे कॅनेडियन प्रसारमाध्यमांतून पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना काही प्रश्न विचारले. 


तुम्हाला खलिस्तानी विचारसरणीचे समर्थक म्हटले जाते. यावर आपले म्हणणे काय?  
>खलिस्तानची मागणी करणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा  एक भाग आहे. आम्ही कोणाच्या धार्मिक प्रकरणात हस्तक्षेप करत नाही, पण आम्ही वन युनायटेड इंडियाचे म्हणजे अखंड भारताचे समर्थक आहाेत. भारताचे तुकडे करण्याच्या कटात कॅनडा कधीही सहभागी होणार नाही. इंडो-कॅनेडियन विशेषत: शीख समाजाने कॅनडाच्या विकासकार्यात मोठे योगदान दिले आहे. माझा भारत दौरा या समाजाचा दोन्ही देशातील एक धागा म्हणून साजरा करण्याचा आहे. मी येथील संस्कृती पाहिली. अक्षरधाम, गुजरातेत गेलो. श्री दरबारसाहिब येथे गेलो. तेथील पावित्र्य अनुभवले.  


खलिस्तानचा अतिरेकी जसपालसिंग अटवाल तुमच्यासोबत आलेला आहे. यामुळे तुमच्यावर होत असलेल्या आरोपास पुष्टी मिळते. हे खरे आहे काय?  
>जसपालसिंग अटवाल आमच्यासोबत आलेला नाही. पण हे घडले कसे? याची चौकशी केली जात आहे. अटवालची माहिती मिळताच त्याचे निमंत्रण रद्द केले आहे.  


परंतु मुंबईत डिनर पार्टीत तुमची पत्नी सोफी ट्रुडोची अटवालसोबतची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत.  
>मुंबईच्या पार्टीत मी अटवालला भेटलेलो नाही. त्याच्याबाबतीत मला इतकी माहिती नव्हती. कारण तो व्यापारी प्रतिनिधीसोबत आला होता. माझ्या पत्नीसोबत अनेक लोकांनी छायाचित्रे काढून घेतली आहेत.  


तुमचे खासदार रणदीपसिंग सराय यांनी जसपाल अटवालच्या नावाची शिफारस केली. त्यासाठी त्यांनी माफीही मागितली आहे का?  
>असे व्हायला नको होते. यासंबंधात मी कॅनडात गेल्यानंतर रणदीपसिंग सराय यांच्याशी बोलेन.  


केवळ बोलणार की कारवाई करणार?  
>कारवाई करेन.  


तुम्हाला ज्या ९ फुटीरवाद्यांची नावे दिली आहेत त्यांच्यावर कधी कारवाई करणार?  
>मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी ९ फुटीरवाद्यांची नावे दिली आहेत. ती यादी मी कारवाईसाठी सुरक्षा संस्थेस पाठवली आहे.  दहशतवादी कारवायांसाठी कॅनडाचा वापर होऊ देणार नाही हे मी पुन्हा स्पष्ट करतो. कॅनडा जगातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नेहमी प्रयत्नशील असतो. हा प्रयत्न सुरूच राहील.   


अन्य देशाच्या पंतप्रधानांच्या तुलनेत तुमचे खूप साधेपणाने स्वागत करण्यात आले. परराष्ट्रमंत्र्यांनीही तुमच्या स्वागतासाठी कोणतेही वक्तव्य केलेले नाही.       
>भारतात झालेल्या माझ्या स्वागताने मी खूप समाधानी आहे. कॅनडा व भारत सरकारदरम्यान खूप चांगली चर्चा झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी खूप चांगली चर्चा झाली. भारत आमचा खूप चांगला व विश्वासू मित्र आहे.   


कॅप्टन अमरिंदरसिंग यांना तुम्ही कॅनडा दौऱ्याचे निमंत्रण दिले?   
> पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांना कॅनडा दौऱ्याचे निमंत्रण दिलेले नाही, परंतु त्यांच्याशी संबंध सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील.  

 

कॅनडात राहणाऱ्या भारतीयांना रोजगार, सवलतींच्या काय योजना आहेत? 
भारतातून दरवर्षी सव्वा लाखाहून अधिक विद्यार्थी कॅनडात शिक्षणासाठी येतात. चीननंतर भारत हा दुसरा मोठा असा देश आहे की, जेथून सर्वाधिक संख्येने विद्यार्थी कॅनडात शिक्षणासाठी येतात. या वर्षाअखेरीस भारत या कारणासाठी क्रमांक एकचा देश होऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष घालण्यासाठी कॅनडाचे मंत्री अमरजित सोही यांना जबाबदारी देण्यात आली आहे. ते एका मोठ्या प्रकल्पावर काम करत आहेत.  


सवलतींची उजळणी 
१.
दांपत्य व्हिसाच्या बाबतीत आम्ही काम केले आहे. आता कॅनेडियन नागरिकाने भारतात लग्न  केले तर दोघांनाही ६ महिन्यांचा पीआर व्हिसा मिळू शकतो.
२. पालक अथवा आजी-आजोबांच्या श्रेणीत येणाऱ्या अर्जाची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. म्हणजे ५ वरून दहा हजार करण्यात आली. 
३. नॅनी केअर गिव्हर श्रेणीत बॅकलाॅग ८०%  संपुष्टात आणला आहे. इतर प्रकरणाचा निपटारा करण्यात येत आहे. प्रलंबित अर्जाची संख्या एका वर्षात संपुष्टात येईल.

बातम्या आणखी आहेत...