आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 प्रभावशाली व्यक्ती : चाळिशीच्या आतले 45 जण टाइमने जाहीर केली यादी.

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या विद्यार्थ्यांनी निदर्शने केली होती - Divya Marathi
या विद्यार्थ्यांनी निदर्शने केली होती

‘टाइम’ मासिकाच्या वर्ष २०१८ च्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत या वेळी विविध क्षेत्रांत बहुमूल्य याेगदान देणाऱ्या चर्चित लाेकांनी स्थान मिळवले.  त्यातील ४५ नावे ४० वर्षांहून कमी वय असलेल्यांची अाहेत. यात प्रथमच महिलांची संख्या ४५ एवढी अाहे. या यादीत भारतातून प्रथमच दीपिका पदुकाेण, विराट काेहली, मायक्राेसाॅफ्टचे सत्या नाडेला, अाेलाचे भाविश अग्रवाल यांचा समावेश करण्यात अाला अाहे. समाजावर माेठ्या प्रमाणात प्रभाव पाडणाऱ्या ‘मी टू’ अभियान चालवणाऱ्या महिलांना मात्र प्राधान्याने स्थान देण्यात अाले अाहे.  

 

 केमरन कास्की, जॅकलिन कोरिन, डेव्हिड हॉग, एमा गोंजालेस आणि अॅलेक्स विंड  
या विद्यार्थ्यांनी निदर्शने केली होती. 

  
बराक ओबामा -
हे सर्व १७ ते १९ वर्षांदरम्यानचे किशोरवयीन आहेत. पार्कलँड गोळीबाराच्या विरोधात त्यांनी मोर्चा काढला. यात बहुतांश अद्याप मतदारही नाहीत. आपल्या भूमिकेचा प्रचार करण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही. मी याबाबतीत काहीच करू शकलो नाही याचे शल्य मला आहे. शस्त्र बाळगण्यावर नियंत्रण आणू शकलो नाही. या मुलांनी सर्व जुन्या रूढींना फाटा देत आपले म्हणणे प्रभावीपणे मांडले. तरुणांनी एखादा मुद्दा हाती घेतला तर देशाचा कायदा अधिक सक्षम झाला असल्याचा इतिहास आहे.  
- बराक आेबामा, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष

 

या भारतीयांचा समावेश

 विराट कोहली, दीपिका पदुकोण, सत्या नाडेला आणि आेलाप्रमुख भाविश अग्रवाल.   
यांची नावे अनेकदा

 चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग ९ वेळा, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन ८ वेळा, तर आेप्रा विनफ्रे १० वेळा यादीत झळकले.  

 

पुढील स्लाईडवर वाचा इतर प्रभावशाली व्यक्तींविषयी अधिक माहिती. 

 

बातम्या आणखी आहेत...